परिशिष्ट १ 1
परिशिष्ट १
(१सिगालसुत्ताचें मराठी रूपांतर)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१- ‘दीघनिकाय’ या पालिग्रंथांत जीं ३४ सूत्रें आहेत त्यांपैकीं सिगालसुत्त हें एक होय.)

भगवान् बुद्ध राजगृहनगरांत वेणुवनांत राहात असतां सिगाल नांवाचा एका गृहस्थाचा मुलगा सकाळी लवकर उठून स्नान क्ररून ओल्यानेंच पूर्व, पच्शिम, दक्षिण, उत्तर, वरची व खालची ह्या सहा दिशांची पूजा करित असे. त्या दिवसीं वेणुवनांतून राजगृहनगरांत भगवान् बुद्ध भिक्षेस जात असतां त्यांनीं सिगालाला पाहून प्रश्न केला “हे गृहपतिपुत्र। ओल्या वस्त्रांनीं व ओल्या केशांनीं तूं जो सहा दिशांनां नमस्कार कंरतोय हें काय ?”
त्यावर सिगाल ह्मणाला “भगवान्। माझ्या बापानें अंतकाळीं ‘बाळ, दिशांची पूजा करित जा’ असें सांगितलें आहे. त्याप्रमाणें त्याच्या वचनाला मान देऊन हा नमस्कारविधि मीं चालविला आहे.”
तें ऐकून बुद्ध ह्मणाले “गृहपतिपुत्र. आर्यधर्माप्रमाणे सहा दिशांचा नमस्कारविधि फार निराळा आहे.”
यावर सिगालानें आर्यधर्मांत कोणता नमस्कारविधि सांगितला आहे हें सांगण्याची विनंति केल्यावर बुध्दांनीं त्याला पुढील उपदेश केलाः-
“ज्याला सहा दिशांची पूजा करावयाची असेल त्यानें चार कर्मक्लेशांचा त्याग केला पाहिजे. चार कारणांस्तव त्यानें पापकर्म करतां नये आणि सहा संपत्तिनाशाच्या द्वारांचे त्याने सेवन करतां नये. ह्या चौदा गोष्टींचा त्याग करून जे सहा दिशांची पूजा करितात त्यांनांच इहपरलोक मिळतात.
“प्राण्याचा वध, अदत्तादान (चोरी), परदारगमन (व्याभिचार), व असत्य भाषण ह्या चार कर्मक्लेशांचा त्यानें त्याग केला पाहिजे.
“मला हें बरें वाटतें, असा भलताच छंद धरून त्यानें पापकर्म करतां नये; दुसर्याच्या द्वेषानें पापकर्म करतां नये; अज्ञानामुळें पापकर्म करतां नये; आणि दुसर्याच्या भयानें पापकर्म करतां नये. ह्या चार कारणांस्तव त्यानें पापकर्म करतां नये.
छंदा दोसा भया मोहा, यो धम्मं अतिवत्तति।
निहीयाति यसो तस्स काळपक्खेव चन्दिमा।।
छन्दामुळें, द्वेषामुळें, मोहामुळें किंवा भयामुळें जो धर्माचें अतिक्रमण करतो, त्याचें यश कृष्णपक्षांतील चंद्राप्रमाणें नाश पावतें. परंतु -