Get it on Google Play
Download on the App Store

फ्लायिंग डच्मन : एक शापित जहाज

फ्लायिंग डच्मन हे एका शापित जहाजाचे नाव आहे जे कधीही किनाऱ्या पर्यंत पोहोचू शकत नाही. ह्या जहाजाच्या दंतकथा सतराव्या साधीपासून प्रसिध्द आहेत.  कित्तेक नाविकांनी ह्या जहाजाला पहिल्याचा उल्लेख करताना असे म्हंटले आहे की जहाजाला लांबून पाहताना एक पिशाच्च प्रकाश दिसतो. जर कोणतं जहाज फ्लायिंग डच्मनच्या संपर्कात आले तर डच्मनमधील नाविक आपल्या मृत नातेवाहिकांसाठी पत्र पाठवितात असे ही काही नविकान्नी सांगितले आहे. नाविक दान्त्काथांच्या आधारे हे जहाज समुद्रात दिसणं हा मृत्यूचा इशाराच.

 

ह्या जहाजअच्य संदर्भात लेखक जॉन मँकडोनाल्ड आपल्या पुस्तकात म्हणतात: "जोरदार वादळात नाविक म्हणाले की त्यांनी फ्लायिंग डच्मनला पाहिले. सर्वसामान्य गोष्टींप्रमाणे डच्मन वादळामध्ये अडकून केपला पोहोचलं पण कोणीही मार्गदर्शन देण्यासाठी नसल्यामुळे तटावर पोहोचू शकले नाही आणि त्यामुळे समुद्रात वादळ आले की डच्मन  दिसून येतं."

 

 

साहित्यिक संदर्भात ह्या जाहाजाचा दुसरा उल्लेख जॉर्ज बॅरिंगटन ह्यान्ने अ वायेज टू बॉटेनी बे ह्या पुस्तकात करताना म्हंटले: "मी खूपदा नाविकांकडून भूतांबद्धल आणि मृत्यूबद्धल लोकभ्रम ऐकलेले पण कधीही त्या गोष्टींवर विश्वास बसला नाही. असे ऐकण्यात आले की एका डच युध्जाहाजाच्या केप ऑफ गुड होपमध्ये हरवल्याच्या काही वर्षांनंतर जहाजावरील सैनिक तीक्ष्ण थंडीमुळे गारठले, ते जहाज जिथे दिसले तिथे वादळाचे वारे सुटू लागले, पण कसे तरी ते जहाज केप ऑफ गुड होपला पोहोचले. त्यानंतर त्या जहाजाची दुरुस्ती झाली आणि ते युरोपच्या दिशेने परत जात असताना अजून एका वादळाला ते जहाज बळी पडले. त्या रात्री काही नाविकांनी असे सांगितले की त्यांनी एका जहाजाला, किंवा त्या जहाजाच्या भूताला समुद्रातून त्यांच्यादिशेने हिंस्रपणे येताना पाहिले. पण जसे जसे वादळ थांबू लागले, ते छायाचित्र एखाद्या दाठ ढगासारखे आकाशात विस्खारून गेले. त्या नाविकांवर ह्या गोष्टीचा भयंकर परिणाम झाला आणि त्यांने ही गोष्ट बंदरावर पोहोचून सर्वांना सांगितली. गोष्ट काय, भडकत्या आगीसारखी पसरली आणि त्या काल्पनिक छायाचित्राला फ्लायिंग डच्मन हे नाव मिळाले."

 

 

जॉन लेडनच्या सीन्स ऑफ इन्फेन्सीप्रमाणे: "फ्लायिंग डच्मन हे एक नाविकांमधील सामान्य लोकभ्रम आहे की आफ्रिकेच्या उंच दक्षिणी आक्षांसावर एका जाह्जाचा छायाचित्र दिसल्यामुळे समुद्रात वादळ सुटतं आणि त्या जहाजाच्या छायाचित्राला फ्लायिंग डच्मन म्हणतात. मानला जातं की ह्या जहाजावरील नाविकांनी कोणतं तरी भयंकर पाप केलेले आहे आणि त्यामुळे कोणत्या तरी गंभीर रोगाचे शिकार झाले आहेत. ह्यावरून, त्या पापामुळे त्या लोकांना त्यांच्या चुकीची जाणीव होईपर्यंत त्यांना त्याच समुद्रात भटकण्याचा शाप मिळाला आहे."

 

 

एकोणिसाव्या आणि विसाव्या सधीत हे जहाज दिसल्याचे भरपूर उल्लेख केलेले आहेत. ह्या उल्लेखांपैकी एक म्हणजे प्रिन्स जॉर्ज ऑफ वेल्स, जे पुढच्या काही वर्षात इंग्लंड चे राजा, किंग जॉर्ज V म्हणून नावाजले गेले, यांचा.सन १८८० मध्ये, प्रिन्स जॉर्ज त्यांचे मोठे भाऊ, प्रिन्स आल्बर्ट विक्टर, आणि  त्यांचे शिक्षक जॉन नील डॉल्टन, तीन वर्षाच्या समुद्री प्रवासावर  निघालेले. ह्या दरम्यान, ११ जुलै १८८१ रोजी ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टी जवळ असताना, प्रिन्स जॉर्जने काही असे लिहिले: "११ जुलै रोजी, पहाटे सुमारे ४ वाजता फ्लायिंग डच्मन आमच्या जाहाजासामोरून गेले.  जहाजाला एक विचित्र लाल प्रकाश होता, आमच्यापासून फक्त काही अंतर लांब असताना आमच्या जहाजाच्या चालकाने ही डच्मनला बघितले. आम्ही एका माणसालासुद्धा जवळ जाऊन तपास करेल पाठविले, पण तो तिथे पोहोचे पर्यंत जहाज अदृश्य झाले. त्याच दिवशी सुमारे १०;४५ वाजता, एका साधारण नाविकाने सांगितले की त्याने फ्लायिंग डच्मनला काही झाडांमधून खाली पडताना पाहिले. खाली पडल्यावर डच्मनचा अक्षरशः चुरा झाला असे ही त्या नाविकाने सांगितले.

 

 

डच्मनच्या ह्या अद्भुत गोष्टीचा एक समजूतदार स्पष्टीकरण असे असू शकते की हे जहाज अनंत समुद्रात एखाद्या मृग्जालासारखे आहे, किवा डच्मन एखादा सूर्याच्या किरणांमुळे बनलेला एक प्रतिबिंब ही असू शकतो. किवा असं सुद्धा असू शकता की एखाद्या लांबून जाणाऱ्या जाहजाच्या प्रतिबिंबाला पाहून लोकांना हा भास झला असावा की त्यांनी फ्लायिंग डच्मनला पाहिले....

 

किंवा असे ही असू शक्त की फ्लायिंग डच्मन एक खरं-खुरं जहाज आहे आणि त्यातील नाविक खरच एक शाप भोगत समुद्रात फिरत आहेत.