Get it on Google Play
Download on the App Store

सायको रमण

रमण राघव (१९२९-१९९५ ), सायको रमण या नावाने हि ओळखला जायचा जो कि एक सायको - मनोरुग्ण सीरिअल किलर होता, ज्याने त्याची कामगिरी भारतात मुंबईमध्ये १९६० च्या मध्यामध्ये केली होती. रमण च्या पूर्वायुष्य बद्दल किंवा अशा काय घटना त्याच्या आधीच्या आयुष्यामध्ये घडल्या जेणेकरून तो गुन्हेगारीकडे वळाला याची फारच कमी माहिती उपलब्ध आहे. त्याच्या गुन्ह्यामध्ये हत्या, प्राणघातक हल्ले आणि बर्याच इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.

मुंबईमध्ये १९६८ मध्ये घडून आलेली एक खून मालिका. फुटपाथ आणि झोपड्यांमध्ये राहण्र्याना ते झोपेत असताना मारून टाकण्यात आले होते. या सगळ्या घटना रात्री च घडलेल्या होत्या आणि हत्ये साठी एका बोथट वस्तूचा वापर करण्यात आला होता. कृतिका हि या घटनेची साक्षीदार होती जिने नंतर हि माहिती मुंबई पोलिसांना दिली.

अशाच पद्धतीचे खून काही वर्षांपूर्वी ( १९६५ - १९६६ ) मध्ये मुंबई च्या पूर्व भागेतील उपनगरांमध्ये घडले होते. त्या वर्षी, किमान १९ लोकांवर असे प्राणघातक हल्ले झाले होते आणि त्यांपैकी ९ जन मृत्यूला बळी पडले होते. या व्यतिरिक्त यांपैकी एक बळी कृतिका चा नातेवाईक होता, त्या वेळी एक संशयित पोलिसांनी तिथल्या सार्वजनिक मुतारीमधून अटक केला होता. त्याच नाव रमण राघव होत, जो कि आधीपासून च पोलिसांच्या फील मध्ये नमूद होता आणि त्याने पाच वर्षाचा तुरुंगवास एका दरोड्याच्या गुण्यासाठी भोगलेला होता. त्याने त्याच्या बहिणीवर हि तिला मारून टाकण्यापूर्वी बलात्कार केलेला होता, तिच्या अंगावर अनेक वार केल्याच्या खुणा मिळालेल्या होत्या. असे असले तरी कोणताही ठोस पुरावा त्याच्या विरुद्ध न मिळाल्या मुळे ( बचावलेल्या कोणी हि याला पाहिलेले नव्हते. ) पोलिसांनी त्याला पुराव्या अभावी सोडून द्यावे लागले.

जेंव्हा या हत्याराने १९६८ मध्ये गुण्याची पुनरावृत्ती केली तेंव्हा पोलिसांनी या माणसाचा शोध घेण्यास सुरुवात केली. सीआयडी चे पोलिस उपायुक्त, रमाकांत कुलकर्णी यांनी हि केस स्वतःच्या हातात घेतली आणि शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर एक योजना आखून याचा शोध घेण्यास चालू केले. या वेळी पोलिसांना त्याला पाकाद्यामध्ये यश आले आणि त्यांनी त्याचा गुन्हा त्याच्या स्वतःच्या तोंडून वदवून हि घेतला..

त्याने कबुली दिली कि, १९६६ मध्ये GIP (ग्रेट इंडिअन पेनिसुलन रेल्वे नंतर जी सेन्ट्रल रेल्वे या नावाने ओळखली गेली) लगत राहत असलेल्या २३ जनाची हत्या त्याने केलेली होती आणि १९६८ मध्ये उपनगरांमध्ये राहणाऱ्या जवळपास डझनभर लोकांची हत्या केली होती. असे असले तरी, नक्कीच त्याने या पेक्षा जास्त लोकांना मारले होते, या घटने प्रती त्याचे इतके सहज असलेले धोरण पाहून ओलीसना या गोष्टीची खात्री पटली कि त्याला त्याने किती लोकांना मारून टाकले होते याचा नेमका आकडा हि त्याच्या लक्षात नव्हता.

जेंव्हा रमण राघव योजना शहरामध्ये चालू होती तेंव्हा मुंबईच्या किती तरी भागामध्ये लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिंता आणि भीती पसरलेली होती. झोपडपट्टी आणि अपर्त मेंट मध्ये राहणाऱ्या किती तरी लोकांनी बाहेर उघड्यावर किंवा बालकनी आणि खिडक्या उघड्या ठेवून झोपायला सुरुवात केली होती.

पोलिस उपनिरीक्षक अलेक्स फ़िअलो याने रमण राघव ला संग्रही असलेल्या छायाचित्रावरून ओळखले आणि त्याला पहिले असणाऱ्या लोकांकडून त्याचे वर्णन घेतले. फ़िअलो नि संबधित भागातून त्याला पाहिलेल्या दोघा साक्षीदारांना ताब्यात घेतले आणि त्यांच्या सोबत त्याचा शोध घेतला. संशयितांनी त्याचे नाव रमण राघव असे सांगितले असले तरी पोलिस नोंदीमध्ये सापडलेल्या संग्रहावरून त्याला बर्याच दुसर्या बोगस नावाने हि ओळखले जात होते, जसे कि "सिंधी दलवाई ", "तलवाइ", " अण्णा". "थम्बि " आणि "वेळू स्वामी"

संशायीताकडे, स्वतःकडे, एक चष्म्याची जोडी, दोन कंगवे, एक कात्रीची जोडी, धूप जाळण्या साठी चा एक स्तंड, साबण, आल्याचा तुकडा, चहा पावडर आणि दोन कागदाची कात्रणे ज्यांवर काही गणिती आकडेमोड केलेली होती. त्याने घातलेल्या टी शर्ट आणि खाकी चड्डी वर रक्ताचे डाग होते आणि त्याचे बूट चिखलामध्ये बरबटलेले होते. या संशयिताच्या बोटांच्या ठश्यांवरून हा रमण राघव उर्फ सिंधी दलवाई असल्याचे स्पष्ट झाले. भारतीय दंड संहिता ३०२ नुसार त्याला चिंचवली गावातील, मालाड ग्रेटर बॉम्बे येथील दोन माणसांच्या, लालचंद जगन्नाथ यादव आणि दुलार जग्गी यादव, यांच्या हत्येसाठी अटक करण्यात आली.[1] त्याचे वर्णन उंच, दणकट अंगकाठी असलेला आणि सावळा असे करण्यात आले होते.

प्राथमिक चाचणी अतिरिक्त मुख्य प्रांतातील दंडाधिकारी यांच्या न्यायालयात आयोजित करण्यात आली होती. बराच वेळ राघवने कोणत्याही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. असे असले तरी त्याने प्रश्न उत्तरे द्यायला सुरुवात केली जेंव्हा पोलिसांनी त्याची एक डिश चिकन खाण्याची मागणी पूर्ण केली. त्या नंतर त्याने त्याची तपशीलवार साक्ष दिली, त्याच्या हत्येच्या शास्त्राचे वर्णन आणि त्याची हत्या करण्याची विशेष पद्धती याचे हि वर्णन केले. या नंतर हि केस मुंबई सेशन कोर्टाकडे सुपूर्द करण्यात आली. जेंव्हा, २ जुने १९६९ रोजी, अतिरिक्त सत्र न्यायाधीशाकडे हि केस चालू केली गेली तेंव्हा बचाव पक्षाने त्यांचे फिर्यादी प्रती अर्ज दाखल केला ज्यामध्ये त्यांनी असा बचाव केला कि, फिर्यादी हा स्वतःचा बचाव करण्यास असमर्थ आहे आणि त्याचे मानसिक संतुलन ताळ्यावर नाही, एवढेच नाही तर गुन्हा घडताना हि त्याचे मानसिक संतुलन त्याने हरवलेले होते आणि त्या याची कल्पना नव्हती कि तो काय करत आहे किंवा तो करत असलेले कृत्य हे नियम शास्त्रा च्या विरुद्ध आहे.

त्यामुळे आरोपी ला नंतर पोलिस सर्जन कडे तपासणी करिता पाठवण्यात आले, त्यांनी २८ जुने १९६९ ते २३ जुलै १९६९ पर्यंत त्याला ठेवून तपासणी केली आणि नंतर असे मत प्रदर्शित केले कि, त्यामुळे आरोपी ला नंतर पोलिस सर्जन कडे तपासणी करिता पाठवण्यात आले, त्यांनी २८ जुने १९६९ ते २३ जुलै १९६९ पर्यंत त्याला ठेवून तपासणी केली आणि नंतर असे मत प्रदर्शित केले कि, " आरोपी हा सुदृढ असून कॉत्यहि प्रकारच्या मानसिक विकाराचा बळी नाही आहे. त्याची स्मरणशक्ती चांगली असून, त्याचा बुध्यांक सरासरी आहे आणि त्यला आपण केलेल्या कृत्याचे महत्व आणि उद्देश्य यांची हि जाणीव आहे"त्याच्या विरुद्ध होणार्या करावी ची जाणीव समजण्या इतपत तो सक्षम आहे आणि प्रमाणित करण्यात येते कि तो वेडा नाही आहे."

या वैद्यकीय मतानुसार पुढची कारवाई झाली. The accused pleaded guilty. चाचणी दरम्यान मुंबई येथील नायर हॉस्पिटल चे मानस तज्ञ सरंक्षक साक्षीदार म्हणून होते. त्यांनी आरोपीची आर्थर रोड च्या जेल मध्ये ५ ऑगस्ट १९६९ रोजी मुलाखत घेतली आणि असा खुलासा केला कि आरोपी हा तीव्र प्रकारच्या पेरनोइद स्क्रीझोफ्रेनिया ने बर्याच काळासाठी पिडीत आहे आणि त्यला आपण करत असल्याचे कृत्य हे नियम शास्त्रविरुद्ध असल्याचे भान नव्हते..

बचावामध्ये असे हि म्हंटले गेले कि, "आरोपीने त्याच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्य प्रमाणे हत्येचा गुन्हा केला आहे. त्याला त्याच्या कृत्याची जाणीव आहे. उदाहरणार्थ लोकांची हत्या करणे परंतु त्याला हे ठाऊक नव्हते किंवा याची जाणीव नव्हती कि हे नियम शास्त्रा चूं किंवा निसर्गा च्या विरुद्ध आहे. " मुंबई अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी आरोपीला दोषी ठरवले आणि त्याला मरे पर्यंत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. रमण ने या विरुद्ध कोणतेही अपील करण्यास नकार दिला.

त्याच्या शिक्षेची खात्री करण्या पूर्वी, मुंबई हाय कोर्टाने असे आदेश दिले कि, मुंबई सर्जन जनरल ने पहिले म्हणजे तीन मानस तज्ञ लोकांची समिती नेमावी जे कि आरोपी खरोखरीच मानसिक रित्या सक्षम आहे कि नाही याचा निर्णय घेतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरोपीला त्याच्या मानसिक असतुलानामौले स्वतःचा बचाव करता येत नाही आहे.

विशेष मेडिकल समिती च्या तज्ञांनी राघवाचे प्रत्येक वेळी दोन तास असे पाच वेगवेगळ्या दिवशी मुलाखती घेतल्या.त्यांच्या शेवटच्या भेटी वेळेस जेंव्हा त्यांनी त्याला शेवटचे गुड बाय केले आणि त्याच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला तेंव्हा त्याने तसे करण्यास नकार दिला आणि सांगितले कि तो कानून (law ) चा प्रतिनिधी आहे आणि या दुष्ट जगामधल्या लोकांना स्पर्श करणार नाही. परीक्षा अहवाल खालील प्रमाणे होता.

"बालपणाबद्दल माहिती उपलब्ध नाही, त्याच्या कुटुंबामध्ये कोणतीही अनुवांशिक मानसिक विकाराची विश्वसनीय माहिती संपादित नाही. उपलब्ध असलेल्या माहितीनुसार तो लहानपणापासून च उचलेगिरी करत होता. त्याचे खचित च कुठले शालेय शिक्षण झालेले आहे. तो एकलकोंडा म्हणून ओळखला जायचा. १९६८ मध्ये पुण्याहून परतल्या नंतर तो मुंबई च्या उपनगरांमध्ये जंगलात राहत होता."[2]

"डोक्याचा एक्स-रे, नियमित रक्त तपासणी, सिफिलिस साठी अभ्यासासंबंधीचा चाचण्या, सिफिलास सह मेंदू व मज्जारज्जू द्रवपदार्थ परीक्षा, युरीन आणि स्टूल परीक्षा, आणि EEG परीक्षा यांचा निष्कर्ष मुळे काहीही सध्या नाही झाले.."

" पाच हि मुलाखतींमध्ये त्याने संदर्भ कल्पना आणि निश्चितता यांच्या प्रणालीने केलेला छळ यांमधून आरोपीला जी भ्रमित अवस्था प्राप्त झाली होती त्या मध्ये त्यांनी खालील गोष्टी अनुभवल्या. 

• दोन भिन्न जगांचे अस्तित्व आहे. एक म्हणजे कानून चे जग आणि दुसरे ज्यामध्ये तो राहत आहे.

• एक निश्चित आणि पक्का विश्वास कि लोक त्याचे लिंग बदलण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना ते शक्य झाले नाही कारण तो ‘कानून’ चा प्रतिनिधी होता.

• एक निश्चित आणि पक्का विश्वास कि तो एक शक्ती आहे.

• ठाम विश्वास कि लोक त्याच्या मार्गामध्ये समलैंगिक होण्याचे लालूच दाखवत होते जेणेकरून तो त्यांना वश व्हावा आणि त्याने स्त्री व्हावे.

• अशा समलैंगिक सम्बधांमुळे तो स्त्रीमध्ये रुपांतरीत होईल.

• तो १०१ % पुरुष आहे, हे तो पुन्हापुन्हा म्हणत होता.

• असा विश्वास कि सरकार ने त्याला मुंबई ला चोरीचे गुन्हे करायला आणि गुन्हेगारी कृत्ये करायला आणले आहे.

• ठाम विश्वास कि या देशामध्ये अकबर सरकार, ब्रिटीश सरकार आणि कोन्ग्रेस सरकार अशी तीन सरकार आहेत आणि ते त्याचा छळ करण्यासाठी प्रयतन करत आहेत आणि त्याच्या मार्गामध्ये परीक्षा घेत आहेत."

• रमण राघव ची शिक्षा कमी करून त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती कारण तो बरा होणार नाही अशा पद्धतीचा मानसिक आजार त्याला जडला होता. त्याला पुण्याच्या येरवडा जेल मध्ये ठेवण्यात आले होते आणि त्याचे उपचार मानसिक आरोग्य आणि संशोधन च्या मध्यवर्ती संस्थेमध्ये चालू करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला एका मानस तज्ञ डॉक्टर समितीने तपासले तेंव्हा असे लक्षात आले कि तो कधीच बरा नाही होऊ शकणार आणि म्हणून न्यायालयाने घेतलेल्या ४ ऑगस्ट १९८७ च्या निर्णयानुसार त्याची शिक्षा कमी करून त्याला जन्म ठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. काही वर्षानंतर १९९५ मध्ये रमन राघव चा पुण्या च्या ससून हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला. तो मूत्रपिंडा च्या आजाराने त्रस्त होता.

"रमण राघव हा आजपावेतो भारतातील सर्वात जास्त वाईट आणि भयानक सीरिअल खुनी होता." भारतीय चित्रपट निर्माते श्रीराम राघवन यांनी ७० मिनिटांचा रमण राघव वरती चित्रपट केला होता ज्यामध्ये रघुवीर यादव ने मुख्य भूमिका साकारली होती.

१९८० च्या मध्य दशकामध्ये आणि एका सीरिअल किलर चा मुंबई मध्ये उदय झाला ज्याने सायन आणि जवपास च्या परिसरातील लोकांना हादरवून सोडले. त्याला स्टोनमान असे नाव देण्यात आले होते. पोलिसांच्या अथक मेहनती नंतर हि त्याला पकडण्यात यश नव्हते आले.

१९७० च्या सुरुवातीला दाक्षिणात्य तमिळ चित्रपट निर्माते भारतीराजा यांनी सिग्गाप्पू रोज्जाक्कल चित्रपटाची निर्मिती केली, जो कि रमण राघवा वर बेतलेला होता, आधीच्या काल्पनिक आयुष्याला फाटा न देत या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका कमल हसन ने साकारली होती. निर्माते अनुराग कश्यप यांनी हि नावाझुद्दिन सिद्दिकी याला घेऊन या विषयावर चित्रपट बनवण्याचे योजिले आहे.