सिद्दी सोबत हत्ती युद्ध
मराठा आणि सिद्दी (अबेशिनिअन मुस्लिम ) यांच्या मधला संघर्ष पुन्हा वर आला जेंव्हा सिद्दी (अबेशिनिअन ) फौजदार, सिद्दी सत्त याने कोकणातील परशुरामाच्या हिंदू मंदिराची विटंबना केलि आणि ब्रम्हेंद्र स्वामी नामक संताचा अपमान केला. सावनुर च्या नवाबांनी जंजिराच्या सिद्दी ला एक हत्ती भेट दिला जो मराठ्यांच्या प्रदेश हद्दीतून ब्रम्हेंद्र स्वामींच्या शिष्यांकडून वाहला जात असताना वाटेमध्ये मराठा सरखेल कान्होजी आंग्रे (नौसेनापती) यांच्या सैन्याकडून पकडला गेला, हि घटना १७२९ मध्ये घडली.हे सगळे स्वामीचे कारस्थान असल्याचे गृहीत धरून सिद्दी फौजदारांनी स्वामी शिष्यांशी भांडण केले आणि परशुराम मंदिराची तोडफोड केली.ब्रम्हेंद्र स्वामी अतिशय श्रद्धाळू गृहस्थ होते आणि यामुळे मराठा आणि सिद्दी यांच्या ऐतहासिक नात्यामध्ये तणाव निर्माण झाला. या दरम्यान सिद्दी नवाब, रसूल याकूत १७३३ मध्ये मरण पावले आणि त्यांच्या मुलांमध्ये वारसाहक्काचे युद्ध सुरु झाले. कान्होजी आंग्रे हि ४ जुलै, १७२९ मध्ये मरण पावले आणि मराठा सरखेल म्हणून त्यांचा वारसा हक्क त्यांच्या मुलाकडे सेखोजी आंग्रे कडे गेला. बाजीरावांनी अनुकूल वेळ पाहून आपल्या सैन्याला पाठवले आणि समुद्रावरून जंजिरा ला वेढा घातला. किल्ला आता पडायच्या बेतात होताच, पण १७३३ मध्ये सेखोजी च्या झालेल्या अकाली मृत्युनंतर, सेखोजी च्या भावाने, संभाजीने पेशवा कडून आदेश घेण्यास नकार दिला आणि त्याच्या असहकाराच्या वर्तणुकीमुळे वेढा काढून घ्यावा लागला. मराठ्यांच्या सुदैवाने , सिद्दीचा मुलगा अब्दुल रहमान याने आपल्या काका आणि चुलत भावांसोबत वारसाहक्काच्या समझोत्यासाठी बाजीरावांना विनंती केली आणि ज्यायोगे मराठ्यांनी त्याला हवी ती मदत देऊ केली. या बदल्यात सिद्दीचे आधीचे प्रदेश, जसे कि रायगड, रेवस, चौल आणि थल हे मराठ्यांचे प्रदेश म्हणून ओळखले जाऊ लागले(1736). बाकीच्या भावांनी हि मराठ्यांशी प्रतिकार करणे व्यर्थ आहे हे मान्य करून हार पत्करली. त्यांची सत्ता मोठ्या प्रमाणात संपुष्टात आल्यामुळे सिद्दी त्या नंतर केवळ जंजिरा, अंजनवेल आणि गोवळकोट च्या प्रदेश साठीच मर्यादित राहिले. त्यामुळे आता हत्ती युद्ध या नावाने या घटनेची सांगता झाली.