Get it on Google Play
Download on the App Store

मस्तानी

मस्तानी (१७०० - १७४०) या बाजीराव पेशवे पहिले मराठा सेनापती, मराठा साम्राज्यच्या चौथ्या मराठा छत्रपती ( साम्राज्य ) शाही जी राजे भोसले चे प्रधान मंत्री, यांच्या दुसर्या पत्नी होत्या. त्या एक  अतिशय सुंदर आणि शूर स्त्रीव्यक्तिमत्व होत्या असे म्हटले जाते.

पूर्व आयुष्य
मस्तानी या छत्रसाल महाराजांच्या कन्या म्हणून जन्माला आल्या. ऐकिवात कथेनुसार त्या छत्रसालांच्या दत्तक मुलगी होत्या.मध्य प्रदेश राज्यामध्ये , छत्रसाल जिल्ह्यापासून १५ किलोमेटेर दूर असलेल्या मौ सहनीय इथे त्यांचा जन्म झाला. धुबेला इथे आज इ मस्तानी  यांचा निवासी महाल आहे जिथे त्या नृत्य करत असत.

जीवनचरित्र
बाजीराव पेशवे पहिले मस्तानिंशी निगडीत अनेक आख्यायिका आहेत. त्यांपैकी सर्वात जास्त माहितीत असणारी कथा म्हणजे त्या बुंदेल येथील राजपूत  नेते  छत्रसाल ( १६४९ - १७३१) जे कि बुंदेल खंड प्रांताच्या पन्ना संथानाचे संस्थापक होते , त्यांच्या  कन्या होत्या, ज्यांचा जन्म रुहानी बाई नामक अर्ध पर्शियन , हैदराबाद निझाम न्यायालयात असणाऱ्या नृत्यांगानेपासून झाला होता. जेंव्हा अलाहाबाद चे मुघल प्रमुख , मोहम्मद खान बंगश नि १७२७ - २८ मध्ये छत्रसाल वर आक्रमण केले , तेन्व्या चात्रासालांकडून बाजीराव पेशवे पहिले यांना मदतीच्या आशयाचा एक गुप्त संदेश धाडला गेला, त्यावेळी बाजीराव बुंदेल खंडांच्या परिसरामध्ये लष्करी मोहिमेवर होते. बाजीराव छत्रसालांच्या मदतीसाठी धावून आले. कृतज्ञते ची जान ठेवून  छत्रासालानी त्यांची कन्या मस्तानी सह आपल्या साम्राज्याचा तिसरा भाग , ज्यामध्ये झांसी , सागर आणि कल्पि चा हि समावेश होता , बाजीरावांना भेट केला. त्यांनी बाजीरावांना ३३ लाख सोन्याची नाणी देऊ केली. मस्तानी आणि बाजीरावांच्या लग्नामध्ये , काही गावांच्या नजराण्या बरोबर बाजीरावांना एक हिर्याची खान हि भेटी दाखल मिळाली.

असे असले तरी सुत्रानाम्ध्ये या बाबतीत तफावत आहे. छत्रासालांच्या दुसर्या दृष्टीकोनातून पाहिले असता त्या हैदराबाद निजामांच्या कन्या होत्या. १६९८ मध्ये निजामाचा छत्रसाल कडून पराभव झाला त्यावेळी निझामाच्या बायको कडून असा सल्ला मिळाला कि त्यांनी छत्रासालन च्या मुलीशी विवाह करावा जेणेकरून , त्या काळी मध्य भारतात प्रबळ साम्राज्य शक्ती बनलेल्या बुंदेला शी  सलोखा जपत येईल. आणि एका तिसर्या मूळ आख्यायिके नुसार , मस्तानी छत्रासालांच्या दरबारी नृत्यांगना  होत्या , बाजीराव आणि चात्रासाला यांच्या झालेल्या बैठकी नंतर  बाजीरावांनी छत्रासालांची मैत्री स्वीकारली त्यावेळी ते मस्तानी च्या प्रेमात पडले आणि त्यांनी त्यांच्याशी विवाह केला परंतु बाजीराव हे उच्च वर्णीय ब्राह्मण असल्या कारणाने तत्कालीन ब्राह्मण समाज आणि इतर हिंदू धर्मीय यांना हा विवाह मंजूर नव्हता..

तरीही , सर्वात जास्त स्वीकार्य कथेनुसार त्या छत्रासाल महाराजांच्या आणि त्यांच्या अर्ध पर्शियन मुस्लिम पत्नींच्या कन्या होत्या. मस्तानी चा सहसा उल्लेख बाजीरावांची प्रेमिका किंवा रखेल असाच केला जातो. असे असले तरी त्यांचा धार्मिक रीतीरिवाजांनी विवाह झालेला होता. घोडेस्वारी, भालाफेक आणि तलवारबाजी या युद्ध कलांमध्ये मस्तानी निपुण होत्या त्याच बरोबर त्या निष्णात गायिका आणि नृत्यांगणा होत्या. त्यांनी लष्करी मोहिमांमध्ये बाजीरावांना साथ दिलेली होती. काही महिन्यांच्या कालावधी मधेच बाजीरावांच्या पहिल्या पत्नी काशीबाई आणि मस्तानी या दोघींनीही बाजीरावांना मुलगे दिले. काशीबाईं च्या मुलावर फार लहानपणीच मृत्यू ओढावला. मस्तानी च्या मुलाचे नाव शमशेर बहादूर असे ठेवण्यात आले.

बाजीरावांनी बंद च्या जहागीरीने शमशेर ( पेशवा ) ला सन्मानित केले. बाजीरावांच्या या मुलाने पानिपत च्या तिसर्या युद्धात , १७६१ मध्ये मराठ्यान कडून अहमद शह आणि अब्दाली यांच्या विरोधात युद्ध लढले , आणि असे म्हटले जाते कि या युद्ध मधेच तो मृत्युमुखी पडला.

बाजीरावांचे त्यांच्या अर्ध मुस्लिम असलेल्या पत्नी , मस्तानी साठीचे प्रेम त्यांच्या पहिल्या पत्नी काशीबाई यांच्याकडे दुर्लक्ष होण्यास कारणीभूत ठरत असलेल पाहून त्यांच्या आईंचा , राधा बाईंचा रोष बाजीरावांवर आला. राधा बाईंच्या आदाब खातीर बाजीरावांचे धाकटे बंधू चिमाजी आप्पा यांनी मस्तानीला हद्दपार केले. बाजीरावांच्या मुलाने , बालाजी याने हि , मस्तानी ला त्यांच्या वडिलांना सोडण्य साठी जबरदस्ती करू पहिली पण मस्तानीने या हि गोष्टीला नकार दिला.  मस्तानिवारचा बाजीरावांचा वाढता प्रभाव आणि काशीबाई कडे झालेले दुर्लक्ष पाहून, बाजीराव लष्करी मोहिमे वर असताना , संतप्त बालाजीने ,मस्तानीला काही काळासाठी घरामध्ये नजरकैदेत ठेवले.

पुणे शहरामध्ये काही काळासाठी मस्तानी बाजीरावांसोबत त्यांच्या घरी राहिल्या. महालाच्या उत्तर - पूर्व दिशेला मस्तानी महाल होता आणि बाहेर जाण्यासाठी वेगळे असे बाह्य प्रवेशद्वार होते,  ज्याला मस्तानी दरवाजा म्हणून ओळखले जाते. घरातील आणि कुटुंबातील वाढता संताप पाहून , १७३४ मध्ये , शनिवार वाड्यापासून काही अंतरावर च कोथरूड मध्ये बाजीरावांनी मस्तानी साठी स्वंतत्र निवास स्थान  बांधून घेतले. आज हि ती विद्यमान वास्तू कोथरूड येथील मृत्युंजय मंदिर येथे आहे. कालांतराने महाल मोडण टाकण्यात आला आणि त्याचे अवशेष राजा केळकर संग्रहालय येथे स्वंतत्र विशेष भागामध्ये आज हि पहावयास मिळतात. कोर्ट नोंदींमध्ये ( बखर ) बाजीराव सरकारच्या दरम्यान  मस्तानीचे कोणतेही संदर्भ समाविष्ट करण्यात आले नाहीत. इतिहासकारांनी असे नमूद केले आहे कि राजा केळकर संग्रहालय मध्ये आणि वाई च्या संग्रहालय मध्ये असलेली मस्तानीची चित्रे हि अस्सल नाही आहेत.

मस्तानी या अत्यंत निष्णात घोडेस्वार आणि योद्धा होत्या असे मानले जाते. त्या बाजीरावांना दैनदिन न्यायालयीन कामांमध्ये हि साहाय्य करायच्या असे म्हटले जाते. स्थानिक लोकांच्या दंतकथेनुसार, पुणे - सासवड रस्त्यालगत दिवे गावाजवळ असणारे तळ्याला मस्तानीने गावातील लोकांची पाण्याची सोय भागवण्या करिता बांधकामासाठी अनुदान केले होते.

मृत्यू
एप्रिल १७४० मध्ये, जेंव्हा बाजीराव त्यांच्या खारघर येथील जमिनीची पाहणी करत होते तेंव्हा ते अचानक आजारी झाले आणि मृत्युमुखी  पडले. काशीबाई, चिमाजी आप्पा, बालाजी    (नानासाहेब ) आणि मस्तानी खारगाव येथे आले.रावर खेड येथे,  नर्मदा नदीच्या काठावर २८ एप्रिल १७४० रोजी बाजीरावांच्या मर्त्य अवशेषाला अग्नीस सुपूर्द करण्यास आले. पुण्या जवळ च्या पाबळ गावात मस्तानी हि त्यानंतर लवकरच  मरण पावली.

मृत्यूचे कारण
एका प्रसिद्ध अशा लोक आख्यायिके नुसार , बाजीरावांच्या मृत्यूची बातमी काळातच , मस्तानीने स्वतःच्या बोटात घातलेल्या अंगातीतील विष प्रश्न करून आत्महत्या केली असे म्हणतात. काहीजानाचे असे हि म्हणे आहे कि तिने नवर्याच्या जळत्या चीतेमध्ये उडी घेऊन , ती सती गेली. खरे कारण जाऊन घेण्यासाठी कोणत्या हि प्रकारचे दस्तऐवज उपलब्ध नाहीत. तरी, हि गोष्ट तर खरी आहे कि बाजीरावांच्या मृत्युनंतर मस्तानी फार काळ जगली नाही आणि १७४० मध्ये मरण पावली.

मस्तानीची समाधी
मस्तानी ची समाधी पाबळ येथे आहे. तिला मस्तानी ची समाधी असे ओळखले जाते. श्री मोहम्मद इनामदार हे त्या समाधीची देखरेख करतात.

काशीबाई नि मस्तानी च्या सहा वर्षीय मुलाला शमशेर ला (ज्याला कृष्णराव म्हणून हि ओळखले जाते ) स्वतःसोबत घरी नेले आणि स्वतःच्या मुलांच्या बरोबरीने त्याचे हि पालन पोषण केले.