Get it on Google Play
Download on the App Store

अंताचा पूर्वार्ध

रात्रभर छावणीची तयारी करून सोमनाथ आपल्या तात्पुरत्या बिछान्यावर पडला होता. सकाळी तुतारीच्या हाकेने त्याला जाग आली. जणू काही काहीही वेळ गेलाच नव्हता असे त्याला वाटले. सूर्याची किरणे झाडांच्या पानावरून प्रतिबिंबित होत होती. रक्षक सैनिक पुढे जाण्याची तयारी करत होते. सेवक मंडळीनी आधीच उठून पुढे चाल करण्याची तयारी केली होती. सोमनाथला त्यांचा हेवा वाटला. त्याला नेहमीच आपली झोप फार प्रिय होती. "आपण उशिरा झोपल्याने मी आपणास उठवले नाही", शंभूने सोमनाथला सांगितले. महाराजांचा आदेश सूर्योदयापूर्वी वाटचाल करायचा होता त्यामुळे वेळ काढणे सुद्धा शक्य नव्हते. युद्ध किमान ३ दिवस तरी दूर असेल असे सोमनाथला वाटत होते, त्याआधी एकदा चांगली झोप आणि चांगले जेवण भेटले कि युद्धांत जीव गेला तरी हरकत नाही असे त्याला वाटत होते. मरायच्या आधी भाजलेला रानडुक्कर किंवा खुल्या आकाशाखाली बिनधास्त काढलेली झोप भेटली नाही तर आपण अतृप्त आत्म्या प्रमाणे भटकू असा विचार त्याच्या मनात आला. आपल्याच विचारावर त्याला हसू आले.

इतक्यांत अश्वदलाची एक कुमक दुरून येताना त्याला दिसली. हाती भगवा असल्याने आपलेच सैनिक आहेत हे स्पष्ट होते. सुमारे ३० घोडेस्वार दाखल झाले.

"सोमनाथ, इथे वार्ता काय आहे ? रात्र कशी गेली ?" सरदाराने प्रश्न केला. पांढरया घोडीवर बसलेल्या सरदाराला सोमनाथने ओळखले नाही पण सरदार फारच चिंतीत दिसत होता.

"काही विशेष घडले नाही सरदार, आपला काय समाचार आहे ? " सोमनाथने प्रश्न केला.

"शत्रू जवळ आला आहे सोमनाथ.  आज संध्याकाळी पर्यंत युद्धाला तोंड फुटणे शक्य आहे. युसुफ प्रचंड सेनेसकट अपम्च्या दिशेने येत आहे आणि पेंढारी लोकांचा अजून पर्यंत पत्ता नाही. "

"महाराजांनी तत्काळ पुढे वाटचाल करण्याचा आदेश दिला आहे. युसूफची सेना चांदोली मध्ये पोचली आहे आम्हाला किमान पाथे गावापर्यंत पोचायचे आहे, युद्धाला तोंड फुटले तर पाथे गावाच्या सपाट प्रदेशांत झाले तर चांगले होयील. महाराजांनी एक तुकडी आधीच पाठवून दिली आहे. तिथे मोर्चा बांधणी चालू केली जायील. "

"तुला आदेश आहे कि सर्व शस्त्र कारागिरांना आणि सुतार लोकांना पुढे पाठवून दे. तर शिकार लोकांना इथेच शक्य तितकी शिकार करून नंतर यायला सांग."

"शत्रूच्या बळाचा अंदाज आहे का ? " सोमनाथने विचारले.

"आमच्या तलवारीची धार त्यांना मारण्यासाठी पुरेशी आहे सोमनाथ" असे म्हणून सरदाराने घोडा फिरविला.

झोप नसल्याने सोमनाथ आधीच त्रासाला होता पण त्यांत तत्काळ सुर्व प्रमुखांना गोळा करून पुढे जाण्याचा आदेश दिला. सर्व बैलगाड्या भरून सुतार आणि शस्त्र गिरांना पुढे जाण्याचा आदेश दिला. जंगल घनदाट असल्याने बैलगाड्या जावू शकतील अशी वाट रात्रीच तयार केली गेली होती. आपल्यासाठी एक बैलगाडी सोमनाथने मागे ठेवून घेतली, शिकार केल्यानंतर मांस टाकून नेण्यासाठी ती उपयुक्त ठरली असती. प्रमुख शिकारी महादेव भिल्ल होता. त्याला सोमनाथने दिवसभर भरपूर शिकार करून रात्री वाटचाल कार्याला सांगितले.

दुपार पर्यंत सर्व सेवक मंडळी आवश्यक ते साधन घेवून वाटेला लागली होती तर शिकार शिकार पकडण्यासाठी जंगल भर विखुरले गेले होते. आता छावणीत फक्त काही भिल्ल जमातीच्या स्वयंपाकी होत्या. सोमनाथ त्यांच्या तंबू जवळ गेल्या. एका तरुण भिल्लीणीने सोमनाथला पाहून तंबूत आंत प्रवेश केला. सोमनाथने तंबूच्या बाहेरूनच हाक दिली. भिल्ल जातीच्या स्त्रिया शक्यतो इतर गावांत येत नाहीत आणि इतर पुरुषां पासून त्या दोन हात लांबच राहतात हे सोमनाथला ठावूक होते.

तंबूच्या आतून एक म्हातारी भिल्ल स्त्री बाहेर आली, तिच्या चेहऱ्याच्या सुरकुत्या तिने कित्येक पावसाळे पहिले असतील ह्याची साक्ष देत होत्या. तेचे कान टोचलेले असून त्यांत लाल रंगाची लाकडी कुंडले होती. हातांत कसली तरी कडी होती आणि एका हाताने ती आपला भर एका काठीवर टेकवून चालत होती. तिचा एकूण अवतार एखाद्या चेटकिणी प्रमाणे भासत होता.

"ह्या वयांत युद्धावर जाणे म्हणजे चांगलच मोठा पराक्रम आहे आजीबाई" सोमनाथने वातावर हलके करण्याचा प्रयत्नात तिला म्हटले. वास्तविक पाहता त्याने सेवकांच्या मध्ये असलेल्या महिलांना जास्त ध्यान दिले नव्हते आणि आपल्या सोबत एखादी म्हातारी आहे हे सुद्धा त्याला ठावून नव्हते.

"मला पाहून आश्चर्य वाटल्या सारखा चेहरा का केलास बाळा ? आम्ही लोकं तुम्हा सरदाराना कधीच दिसत नाहीत, हा एकटी तरणी ताठी पोरगी मात्र तुमच्या लक्षांत लवकर भरते." म्हातारीने म्हटले.

सोमनाथ क्षणभर गोंधळला. "आजीबाई, मी काही सरदार वगैरे नाही. साधा शिपाई आहे. आणि त्या पोरीला घाबरविण्याचा माझा उद्धेश नव्हता, तुम्ही स्वयंपाकी ना ? तर मी काल दुपार पासून काहीही खाल्ल नाही तर काही खायला मिळेल का ह्या उद्देशाने इथे आलो होतो."

म्हातारी संशयास्पद नजरेने पुढे आली, तिने सोमनाथच्या चेहर्या कडे काही क्षण रोखून पाहिलं. "आहे न खायला आहे, काल रात्री काही ससे मारून आणले होते. त्यांची सागुती चालेल का? आंत ये."

तंबूत अंत यायला सोमनाथची तयारी नव्हती, जिथे महिला असताते तिथून काही हात दूरच राहावे असे त्याचे संस्कार होते.  त्यांत महिलांच्या तंबूत जाने तर त्याच्या दृष्टीने पाप होते.

पण म्हातारीने हात धरून त्याला अंत ओढून नेले. तंबूच्या अंत काही जमिनीवर मागची ती पोरगी जेवण वाढत होती. मसाल्यांचा वास हवेत दरवळत होता. तंबूच्या अंत एका कोपर्यांत प्रचंड तपेले ठेवले होते तर दुसर्या कोपर्यांत सश्यांच्या चामड्याचा ढीग. एक मोठा कुत्रा एक हाड चाबत तिसर्या कोपर्यांत होता.

"युद्ध पूर्वी मस्त जेवण करावे अशी इच्छा होती न तुझी ? " म्हातारीने विचारले.

"हो" आपला विचार तिला कसा कळला ह्या विचाराने सोमनाथ थोडा ओशाळून गेला. त्या शिवाय युद्धाच्या मध्ये जेवणाची आठवण व्हावी हे त्याला थोड्या स्वार्थी पानाचे लक्षण वाटत होते.

"पोटभर जेवण, चांदण्या रात्री लहान बाळा प्रमाणे मिळालेली झोप, तहानलेल्या तळ्यावर पडलेले घोटभर पाणी ह्या गोष्टींची किमत समजण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे मृत्यूची चाहूल असते बाळा" म्हातारीने आपल्या थरथरत्या आवाजांत सोमनाथला म्हटले.

युद्धांत मृत्यू हि एक शक्यता असते हे सोमनाथला ठावूक असते पण म्हातारीने ज्या शब्दाने ती भावना व्यक्त केली ते सोमनाथला विशेष आवडले नाही.

"तुम्हाला मृत्यू बाबत काय माहिती आजीबाई ? तुम्ही त्याच्या पासून अजून तरी खूपच दूर आहात असे वाटते" सोमनाथने पुन्हा तिची खिल्ली उडविण्याचा उद्धेशाने म्हटले.

"म्हातारी आणि स्त्री ला कमी लेखण्याचा स्वभाव, तू वाचलास तर सरदार नक्कीच होशील. हे म्हातारे हात बघतोयस ना, ह्या हातानी जीव घेतलाय बाळा. शेकडो आई आणि शेकडो मुलें जन्म देताना मारताना ह्या हातानी पाहिलंय मी. तुझ्या साठी आज युद्ध असेल पण माझ्यासाठी जवळ जवळ प्रत्येक दिवस युद्ध होता. माझ्या पतीला, वडिलांना, मुलांना आणि नातवडांना मी मारताना ह्या हातानी पाहिलेय. माझा १६ वर्षांचा पोरगा मारत असताना पाणी मागत होता, तेंव्हा ह्या हातानी मी पाणी त्याच्या तोंडात टाकले आहे. " म्हातारी सोमनाथ कडे पाहत बोलत होती.

सोमनाथला भावुकता पसंद नव्हती. बाळंतपणात मारणारी माणस आणि युद्धांत पोटांत तलवार जावून मारणारी माणस ह्यांत फरक आहे असेल त्याला वाटत होते. म्हातारीला आणखीन उत्तेजन देवून नये असे त्याला वाटले.

"आपण डोळ्या पेक्षा हातानी जास्त पाहता असे वाटते," त्याने आणखीन उपहासाने म्हटले. त्याच्या शब्दांनी अजून पर्यंत काहीही हव भाव न दाखवणारी ती पोरगी अचानक चमकली तर म्हातारीचा बोलका चेहरा जास्तच भावना विरहित झाला.

"कंदीआईना डोळ्यांनी दिसत नाही" त्या पोरीने दबक्या आवाजांत म्हटले.

सोमनाथ आश्चर्य चकित झाला अजून पर्यंत तसे वाटावे असे म्हातारीने काहीही दाखवले नव्हते, उलट तिचे डोळे आपल्याला आर पार पाहत आहेत असे सोमनाथला आधी वाटले होते.

"माफ करा आजीबाई तुम्हाला दुखविण्याचा माझा उद्धेश नव्हता" सोमनाथने माफी मागितली.

"माफी मागू नकोस सोमनाथ, उद्या तुला सरदार व्हावे लागेल, लोकांचा नायक बनून तू पुढे जाशील त्या वेळी भावुकता उपयोगी नाही. तुम्हा सैनिकांना ज्या वाटेवर चालायचे आहे त्या वाटेवर समाधान आणि शांती कधीही भेटणार नाही. पण तुझे नशीब चांगले असेल तर कदाचित योग्य ते निर्णय कठोर हृदयाने घेण्याची ताकत तुला कदाचित भेटेल." म्हातारीने बोलत बोलत कमरेच्या एक थैलीतून एक दोरा काढला आणि सोमनाथच्या गळया भोवती बांधला.

——

पोटभर जेवण घेवून सोमनाथने दोघांचे आभार मानले आणि तो तंबूतून बाहेर आला. त्याने आपल्या तंबूत जावून २ तास झोप काढली, दुपार झाली असली तरी युद्धाच्या आधी थोडी झोप घ्यावी असे त्याचे मन त्याला सांगत होते. तो उठला तेंव्हा सूर्य अस्ताला जायला आणखीन ३-४ तासांचा अवकाश होता. अनेक शिकारी शिकार घेवून परत आले होते. सोमनाथने त्यांच्याशी बोलून त्यांना पुढील वाटचाल रात्री करायला सांगितली किमान ५०० सैनिकांना पुरेल इतकी शिकार आवश्यक होती.

त्याचा घोडा तयार होता, त्याने घोड्यावर बैठक जमवून घोडा महाराजांच्या कफ़िल्याचा दिशेने दौडवला. वेगाने गेलो तर सेवकांच्या आधीच आपण महाराजांना जावून भेटू असा त्याच्या अंदाज होता. सेवकांचा काफिला किमान ४ तासांच्या दौडीवर असेल असा त्याचा विचार होता. पण जंगल जास्तच दाट होते. बैलगाड्या बर्याच कष्टाने पुढे गेल्या होत्या ह्याच्या खुणा जागो जाग होत्या. ह्या जंगलांत कोणी मनसून अनेक वर्षे आला नसेल हे स्पष्ट होते. सर्वांचीच चाल ह्या मुळें मंदावली असेल असे त्याला वाटले. सुमारे २ तासांनी सोमनाथ महाराजांनी जिथे छावणी टाकली होती तिथे पोचला. महाराजांचा काफिला आधीच पुढे गेला होता. सोमनाथने उतरून मंदिरांत जावून देवाच्या चरणी फुले वाहिली.

त्याने आपली वाटचाल पुढे सुरु केली अंधार होण्याच्या आधी इतर लोकांना भेटलो तर चांगले होयील ह्या उद्देशाने त्याने घोडा जास्तच वेगाने दौडविला. बर्याच वेळाने त्याला डोंगरमाथ्यावर सेवक लोकांच्या बैलगाड्या दिसल्या. पण त्या पुढे जात नव्हत्या पण तिथेच उभ्या होत्या. "हे लोक विश्रांती घेण्यासाठी तर थांबले नसेल ना " असे सोमनाथला वाटले.  त्याने विश्रांती न घेत वाटचाल करण्याचा आदेश सर्वाना दिला होता. त्याने घोड्याला पुन्हा टांच दिली.

दुरून सोमनाथला येताना पाहून थांबलेल्या सेवक मंडळीत एकाच खळबळ माचली. सोमनाथला दुरून सुद्धा ते स्पष्ट दिसत होते. रक्षक मंडली सुद्धा बरोबर स्तब्ध उभी होती. इतक्यांत उलट दिशेने येणारा स्वार सोमनाथला दिसला. त्याने जवळ येवून घोडा थांबविला, सोमनाथने लगाम खेचून आपल्या घोड्याला थांबविले.

"सर्वजण का थांबले आहेत ? काही समस्या आहे का ? " सोमनाथने दरडावून विचारले.

"आपण येवून बघावे हुजूर  " स्वर घाबरलेल्या आवाजांत बोलला. "आम्ही आपलीच वाट बघत होतो" स्वर पुढे बोलला.

त्याचा घाबरलेला चेहरा पाहून पुढे काही तरी बिनसले आहे हे त्याच्या लक्षांत आले आणि त्याने आपला घोडा पुन्हा पुढे फेकला.

डोंगर माथ्यावर पोचताच सोमनाथने घोड्यावरून उडी मारली. सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. "काय समस्या आहे तुकाराम ? त्याने सेवकांच्या प्रमुखाला विचारले." कहीही न बोलत तुकारामने घळीच्या खाली बोट दाखविले, सूर्य अस्तास जात असल्याने काळोख वाढत होता. सोमनाथने कड्याच्या जवळ जायला सुरवात केली एका दगडाच्या आडोश्याने त्याने खाली पहिले.

महाराजाची अश्वसेना ज्या वाटेने गेली होती ती वाट मळली होती, नजर पुढे नेतनच दुरून पथे गांव दिसत होते आणि त्याच्या पुढे असलेला प्रचंड सपाट प्रदेश, महाराजांची सेना एखाद्या प्रचंड काळ्या ढगा प्रमाणे वेगाने मार्गक्रमण करताना दिसत होती. इतक्यांत सोमनाथ ची नजर पुढे गेली. पुढे महाराजांच्या सेनेला कपाळाच्या कुंकू प्रमाणे छोटी भासवणारी मोठी सेना महाराजांच्या दिशेने येताना दिसत होती. युसूफची सेना किमान १२ तास आधीच पोचली होती. महाराजांची सेना आणि युसूफची सेना ह्यांच्या मध्यॆ एक लहान टेकडी होती त्यामुळे कदाचित महाराजांना युसूफच्या सेनेचा पत्ता सुद्धा नव्हता.

टेहळणी स्वार पुढे गेले होते पण कदाचित युसुफने आधीच पुढे तिरंदाज पाठवून त्यांना मारले असावे.

"मुर्खानो, तुम्ही महाराजांना सतर्क करण्यासाठी पुढे स्वर पाठविला कि नाही ?" सोमनाथने विचारले

बरोबर असलेल्या एका रक्षकाने घाबरलेल्या स्वरातच डोके होकार्थी हलविले. ३ स्वर गेले आहेत कदाचित पोचले सुद्धा असावेत.

युसुफचे सैन्य प्रचंड होते आणि अश्या सैन्यापुढे मराठी सैन्याचा टिकाव कुठल्याही परिस्थितींत शक्य नव्हता. सगळे सैनिक मारले जातील हे नक्की होते. डाव्या बाजूला नदी होती तर उजव्या बाजूला जंगल. त्या जंगलांत सुद्धा युसुफ चे सैनिक दबा धरून बसले असतील हि शक्यता होती. समजा मराठी सैन्याने जंगलात माघार घेतली तर त्याच्या आधी युसुफचे अश्वदळ त्यांना सामोरे गेले असते.

सोमनाथने बरोबर असलेल्या सामानाचा अंदाज घेतला, दोघा स्वराने त्याने शिकारी मंडळीना सतर्क करण्यासाठी मागे पाठविले. सर्व सेवकांना त्याने बैलगाड्या मधील शस्त्रे सडून तिअर सर्व समान खाली करण्यास सागितले. लवकरांत लवकर खाली पायथ्याशी जा. आणि जंगलाच्या दिशेने वाटचाल करा. शत्रू सैनिक आले तर शरणागती पत्करा, निशस्त्र सेवकांना ते मारणार नाहीत. पण महाराजांची सेना जंगलात पोचली तर हि शस्त्रें  आणि बैलगाड्या फार मोलाच्या ठरतील.

कुणाला जर इथे घाबरून माघार घ्यायची असेल तर ती आत्ताच घ्या एकदा पुढे गेलात तर नंतर मागे येणे शक्य नाही. इतर २ रक्षकांना सोमनाथने आपल्या बरोबर यायला सांगितले . सोमनाथने डोंगर माथ्यावरून आपला घोडा खाली भरधाव सोडला.

सूर्यखाली जात होता त्याच वेळी युसूफची सैन्य दोन भागांत विभागून दोन सर्पां प्रमाणे दोन्ही दिशातून येताना त्याला दिसत होते. सोमनाथ जसा जसा खाली आला त्याच प्रकारे त्याला शत्रूचे सैन्य दिसणे सुद्धा कमी झाले.