Get it on Google Play
Download on the App Store

अंत १

बर्याच आठवड्यांनी हा भाग प्रकाशित करण्यात येत आहे. जितका वेळ जास्त लागतो इतकी कथा जास्त चांगली लिहिली जाते. हा भाग शेवटचा असेल असे सांगितले होते पण कथा थोडीशी लांबली आहे आणि किमान आणखीन एक भाग तरी इत कथा संपवण्यासाठी लागेल.

अनेक वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. काही लोकांनी काही चुका सुद्धा दाखवून दिल्या आहेत. सर्वांचे आभार. कथा पूर्ण झाल्या नंतर संपादकीय संस्कार करून ती पुन्हा प्रकाशित करण्यात येईल.

-------
युद्ध म्हणजे नक्की काय असते ह्याचा अनुभव सोमनाथला आधी नव्हता. प्रशिक्षण शाळेंत सोमनाथ फार उजवा विद्यार्थी होता पण अजून कोणाचा त्याने जीव घेतला नव्हता. त्याचा घोडा भरदाव वेगाने युद्ध भूमीकडे पळत होता आणि त्याच वेळी त्याच्या पोटांत कालवा कालाव होत होती. युसुफचे सैन्य समोर येतंच काही मराठी सैनिकांचे धैर्य खचले. इतक्या लवकर शत्रू पुढे येयील ह्याची कुणालाच कल्पना नव्हती. शत्रू समोर दिसतंच सरदारांनी आपापली रणशिंग फुकायला सुरवात केली.

त्यांच्या आवाजावरून चौकोन निर्मितीत व्युह रचना होणार होती हे सोमनाथला समजले. पण सैन्यात एकाच अंधाधुंदी माजली होती. सरदार लोक आपल्या सैनिकांना ओरडून आदेश देत होते. काही पळणारे सैनिक सोमनाथला दिसले. "मुर्खानो पळताय कुठे ? मागून आणखीन मदत येत आहे त्यांनी पहिले तर तुम्हाला कापून टाकले जाईल" सोमनाथ ने ओरडून खोटेच सांगितले.

इतके सांगूनही जेंव्हा काही सैनिक पळत होते त्यांच्या पुढे सोमनाथने घोडा घेवून त्यांना अडवले. "युद्धांतून पळून जाणे तुम्हाला शोभत नाही, पळून गेलात तरी जिवंत वाचणार नाहीत. वर आमचे आणखीन सैनिक आहेत आणि पळून गेलेल्या सैनिकांना ते मारतील, तुमच्या बायको मुलांना तुमच्या मागे अपमान सहन करावा लागेल."
सोमनाथचे बोल ऐकून काही सैनिक मागे तर फिरले पण काही जन तरी सुद्धा पळून गेले.

सोमनाथने घोडा धुमश्चक्रीत घुसवला. एक सैनिक छातीत भला घुसून जमिनीवर व्हीवळत पडला होता. एक सैनिकाचा हात तुटला असून तो वेड्या प्रमाणे आक्रंदत फिरत होता.सोमनाथ घोडा दौडवत युद्धाच्या अगदी मधोमध जावू इच्छित होता. एक गनीम त्याला भाला घेवून आपल्या दिशेने येताना दिसला. ते पाहून क्षणभर सोमनाथ स्तब्ध झाला. शिकत असताना अश्या क्षणी नक्की काय करावे ह्याचा त्याला अभ्यास होता पण इथे त्याचा पूर्ण विसर पडला.  त्याच्या लक्षांत आले कि प्रशिक्षण शाळेंत तलवार फिरवणे आणि युद्धभूमीवर कुणाचा जीव घेणे ह्यांत फार फरक आहे.

आपल्या दिशेने चालून येणार्या गनिमाचा भाला कसा चुकवावा ह्या विचारांत असताना कुणी तर दुसर्याने त्या गनिमाचे मुंडके उडवले. अश्या प्रकारे भांबावून जावून आपण जास्त वेळ जिवंत राहू शकणार नाही असे सोमनाथला वाटले पण त्याच वेळी त्याच्यावर एका शत्रूच्या घोडेस्वाराने हल्ला केला, साधारण स्वाराने त्याच्यावर तलवार फिरवली आणि सोमनाथने कशीबशी आपल्या तलवारीने तो घाव उलटवला. तलवारीला तलवार भिडताच त्याच्या हातांतून वीज गेल्याप्रमाणे त्याला वाटले. तो स्वार वेगांत पुढे गेला होता. सोमनाथ ने पुढील स्वारावर लक्ष केंद्रित केले. सोमनाथ चा घोडा युद्धा साठी पारंगत नव्हता त्यामुळे त्याला ताभ्यंत ठेवणे मुश्किल होते. दुसर्या स्वराने सोमनाथच्या दिशेने चाल केली पण सोमनाथ चा घोडा काही पुढे जाईना, सोमनाथने डाव्या हाताने कमरेला असलेला छोटा चाकू काढला आणि त्या स्वरावर फेकला, त्याच्या गालवर लागून त्याचा गाल कापला गेला पण तो स्वर काही पडला नाही.

सोमनाथने आपल्या घोड्यावरून खाली उडी मारली. आता त्याचा सामना पायदळी येणार्या गानिमाशी होता पण बहुतेक शत्रू स्वार होते. सोमनाथने एका स्वराच्या घोड्याचे मागचे पाय छाटून टाकले तर एक पडलेला भला घेवून एका स्वराला खाली टाकले. "घोड्याला घेरा" सोमनाथने इतर सैनिकांना आदेश दिला. "दोन्ही बाजूनी स्वारावर हल्ला करा" सोमनाथ ओरडत होता. त्याच्या कडे युद्ध कौशल्य होते ह्याची त्यालाच जाणीव होत होती. पण शत्रूचे सैनिक पतायीत घोडेस्वार होते ते मराठी सैनिकांना गावात कापल्या प्रमाणे कापत होते. सोमनाथने बराच वेळ काही सैनिकांचे नेतृत्वे केले. किती एल गेला ह्याची कल्पना त्याला सुद्धा नव्हती काळोख पडला होता आणि मराठी सैनिक कमी कमी होत होते. पण काही वेळाने काही मराठी सैनिकांचा जम बसला होता. अनेक घोडेस्वार खाली पडतो होते.

सोमनाथने आजूबाजूला पहायचा प्रयत्न केला सर्वच युद्धभूमी जंगलाच्या जवळ आली होती. दुरून त्याला मल्हारराव आणि त्यांचे अंगरक्षक दिसले शत्रू सैनिक त्यांच्यावर सागरांच्या लाटा प्रमाणे आदळत होते. "तिकडे चला "सोमनाथने जे काही सैनिक वाचले होते त्यांना आदेश दिला.

सोमनाथने एक शत्रुचा घोडा बळकावला आणि तो महाराजांच्या मदती साठि गेला. सोमनाथ जो पर्यंत मल्हार रावाकडे पोचला तो पर्यंत त्याला अनेक ओळखीचे चेहरे दिसत होते. सगळेच रक्त बम्बळ झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर निराशा आणि आवेश एकाबरोबर दिसत होता. आजूबाजूला शत्रूच्या सैनिकांचे प्रमाण वाढत होते आणि मराठ सैनिकांचे प्रमाण कमी होत होते.

"महाराज कुठे आहेत ? " सोमनाथने लढता लढता एका सरदाराला प्रश्न केला.

"सुरक्षित आहेत." त्याने उत्तर दिले.

सोमनाथ एव्हा पर्यंत सोमनाथच्या डाव्या बाजूवर आणि दोन्ही पायां वर वर बसले होते. पण युद्धाच्या धामधुमीत त्याला वेदना जाणवत नव्हत्या. युसुफचे घोडेस्वार घोडे हाताळण्यात प्रवीण असले तरी तलवार चालविण्यात त्यांना विशेष प्राविण्य होते असे वाटत नव्हते. ते उंचीने आणि ताकदीने जास्त असल्याने घोडा दौडवत एक जबरदस्त वार करण्याचा प्रयत्न करत. सोमनाथला असे वर चुकविण्याची फार चांगली सवय होती. तलवारीला तलवार भिडवीण्या ऐवजी वार चुकवत प्रतिवार करण्याचा त्याचा प्रयत्न होता आणि म्हणून अजून पर्यंत तो जिवंत होता.

सोमनाथने आजू बाजूच्या सैनिकांचा वेध घेतला चौकोनी रचना जावून आता गोलाकार रचना बनली होती. आतून तिरंदाज युसूफच्या स्वरांचा वेध घेत होते. बहुतेक वाचलेले मराठी सैनिक अतिशय कौशल्यवान वाटत होते. रात्रीचा तिसरा प्रहर होता कदाचित आणि युद्धाचा रोख जंगलाच्या दिशेने चालला होता.

सोमनाथ चा घोडा थकला होता आणि सोमनाथच्या अंगांत त्राण राहिले नव्हते. गती मंदावल्याने तो एक वार चुकवू शकला नाही. शत्रूच्या स्वाराचा वार त्याच्या छातीवर बसला. चिलखत असल्याने घाव झाला नाही तरी किमान २ बरगड्या मोडल्या होत्या. सोमनाथ घोड्यावरून कोसळला. सोमनाथ उठून उभा राहण्याचा प्रयत्न करत होता पण पाळणाऱ्या घोड्याची टांच त्याच्या डोक्यावर आदळून तो बेशुद्ध पडला.

सोमनाथला जाग आली तेंव्हा युद्ध संपले होते. त्याच्या अंगांत प्रचंड कळ भरली होती. बहुतेक रात्री अनेक सैनिक आणि घोड्यांनी त्याला तुडवले होते. त्याचा आजूबाजूला प्रेतांचा आणि जखमेने ओरडणार्य सैनिकांचा खच पडला होता. सोमनाथने उठण्याचा प्रयत्न केला पण त्याला ते शक्य झाले नाही. दूरवरून युसुफचे घोडदळ युद्धीभूमीला प्रदक्षिणा घालत होते. काही सैनिक आपल्या जखमीना शोधत होते  तर मराठी सैन्यातील जखमी सैनिकांना यमसदनी पाठवत होते.

सोमनाथने बाजूला पहिले, एक ओळखीचा जखमी सैनिक सोमनाथला दिसला. नाव ठावूक नव्हते पण शिकारीच्या वेळी एक दोनदा सोमनाथने त्याला पहिले होते. त्याचा पाय गुडघ्यातून मोडला होता. "आई … " तो ओरडत होता. सोमनाथने आजू बाजूच्या परीस्तिथीचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. मागून काही गनीम सैनिक मराठी जखमी लोकांचा शोध घेत येत होते, कुठली मराठी सैनिक दिसला कि त्याच्या छातीत भाला घुसवत होते. ते कदाचित सरदार आणि मोठ्या मराठी सैनिकांचा शोध सुद्धा घेत होते. एक स्वार आणि सुमारे चार चालत येणारे सैनिक होते.

सोमनाथच्या अंगावर चिलखत असल्याने तो त्यांच्या डोळ्यांत भरणार होताच पण ओरडणार्या ह्या सैनिका मुले सुद्धा ते इथे येणार होते. सोमनाथने आजूबाजूला पहिले एका सैनिकाच्या कमरेला खंजीर होता तो त्याने हातांत घेतला. उठायला त्रास होत असल्याने त्याने आधी आपले चिलखत काढले. आणि गनिमी सैनिक जवळ येण्याची वाट पाहत तो बसला. सूर्य वर चढत होता आणि आपण युद्धांत हरलो आहोत हे सोमनाथ समजून चुकला होता. कदाचित त्याचे सर्व मित्र आणि महाराज सुद्धा युद्धांत मारले गेले होते.

"हा पोरटा बघ कसा ओरडत आहे," हे शब्द ऐकून सोमनाथ सावध झाला.

"मदत करा मला, पाया पडतो मी, मला मारायचे नाही आहे, मी पुन्हा कधीही नाही लढणार" तो युवा सैनिक विनाविण्या करत होता.

"मंजूर है " गनीम सैनिकाने ज्याने मोठी दाढी ठेवली होती आणि हातांत एक वजनदार समशेर होती त्याने म्हटले. जखमी सैनिकाच्या चेहेर्यावर आशेचा किरण उमटला पण पुढच्या क्षणी त्या गानिमाने त्याचे डोके उडविले.

"हा बघ चिलखत वाला आहे, मेला आहे वाटते. " दुसर्या सैनिकाने म्हटले. आजूबाजूच्या सैनिकांच्या छातीत भला घुसवून एक सैनिक सोमनाथच्या जवळ आला. त्याने आपला भाला उंचावला आणि सोमनाथ च्या छातीत घुसवला पण सोमनाथ आपली संपूर्ण शक्ती वापरून बाजूला सरला आणि त्याने हातांतील खंजीर त्या सैनिकाच्या मांडीत घुसवला. त्या सैनिअच्य तोंडातून किंकाळी बाहेर पडली आणि पुढच्या क्षणी सोमनाथने आपला खंजीर त्याच्या गळ्यांत घुसवला.


आपला एक साथीदार गमावला हे पाहून इतर चौघे सैनिक सोमनाथ कडे वळले. सोमनाथ ने मेलेल्या सैनिकाचा भाला घेतला आणि त्याच्या आधाराने तो उभा राहिला. ४ जनाशी लढण्याची त्याची टाकत नव्हती पण आपण मारतना किमान दोघांना तरी मारू असा त्याचा विचार होता.

एक सैनिक भला घेवून त्याच्यावर चालून आला. भाल्याच्या लढाई मध्ये चपळाई महतवाची असते पण सोमनाथ कडे ती नव्हती पण गनीम सैनिकाकडे युद्धाचा अनुभव सुद्धा नव्हता. सोमनाथने त्याच्या वर चुकविण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही त्याने फक्त आपला खंजीर फेकला. खंजीर त्याच्या मानेला लागला, त्याचा तोल गेला आणि तो सोमनाथच्या पायावर पडला. सोमनाथने आपल्या भाल्याने त्याचा अंत केला.

आता राहिलेलं दोघे सैनिक आणि एक घोडेस्वार सावध झाले. एका अर्धमेल्या सैनिकाने त्यांचे दोन मित्र मारले होते. त्यांनी भाला फेकून कमरेच्या समशेरी काढल्या.

"एकालाच उडव मी ह्या दोघांना बघतो" दुरून आवाज आला. सोमनाथ पहिले तर धाप टाकत महाराजांचे अंगरक्षक विष्णू पालकर मागे उभे राहिले. सोमनाथने त्यांना आवाजावरून ओळखले होते. त्यांनी सुद्धा आपले चिलखत काढून टाकले होते. केस विस्कटलेले होते, अंग रक्ताने माखलेले होते.

दोघे सैनिक सोमनाथवर एकाच वेळी चालून आले तर स्वर पालकरानच्या दिशेने चालून गेला. सोमनाथने फिरून भाल्याने एका सैनिकाचा वर रोखला आणि वाकून दुसर्याचा वर चुकवला. त्याने पायांत भाला टाकून एक सैनिकाला पाडले पण त्याला मारण्याच्या आधी दुसर्या सैनिकाने सोमनाथवर वर केला. तो चुकविण्याच्या नादात सोमनाथ खाली पडला. त्या सैनिकाने आपली समशेर सोमनाथच्या काळजांत घुसविण्याचा प्रयत्न केला पण ती त्याच्या खांद्यात घुसली.

प्रचंड वेदनेने सोमनाथ कळवळला आणि त्याने हातांत मिळेल ती वस्तू घेवून त्या सैनिकाच्या डोक्यांत मारली. ती वस्तू म्हणजे एक ढालीचा तुकडा होता. तो वर्मी लागून तो सैनिक पडला आणि राहिलेल्या सैनिकाच्या पाठींत पालकरनी भाला घुसवला होता.

सोमनाथ पुन्न्हा धडपडत उभा राहिला. घोडेस्वाराला त्यांनी कसा तरी मारला होता. पण त्यांच्या पोटांत शत्रूची जखम झाली होती.

"सोमनाथ … शक्य झाले तर जंगलच्या बाजूला जा. महाराज सुरक्षित पाने तिथे निसटले होते. …. ते कदाचित जिवंत असतील आणि त्यांना मदतीची गरज सुद्धां असेल. " असे म्हणून विष्णू कोसळले.

सोमंनाथ ने आजू बाजूला पहिले. प्रचंड युद्ध भूमीच्या सगळीकडे आरडा ओरडा इत्यादी चालू असल्याने हि छोटीशी चकमक कुणाच्याच लक्षांत गेली नव्हती. सोमनाथने जमिनीवर उडी घेतली त्याने आधी मिळेल त्या वस्त्रांनी आपल्या जखमा बांधल्या. बरगड्या मोडल्या असल्याने त्याला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत होता. पायातील हाड मोडले होते. त्याने भल्याचा एक तुकडा घेवून पायाला बांधले. शत्रू सैनिकाची वस्त्रें अंगावर चढवली आणि तो सरपटत मारल्या गेलेल्या स्वाराच्या घोड्या कडे गेला. घोड्याजवळ पोचतांच त्याने उठून घोड्यावर मांड ठोकली. घोड्याच्या प्रत्येक पावलावर त्याच्या सर्वांगातून कळा येत होत्या पण आजू बाजूला मराठी राज्याचे स्वप्न मातीत गेलेले पाहून जे दुक्ख होत होते त्यात हे काहीच नव्हते.