जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : मोस बीच डिस्टिलरी – मोस बीच कैलिफ़ोर्निया
मोस बीच कैलिफ़ोर्निया मध्ये स्थित मोस बीच डिस्टिलरी कैलिफ़ोर्निया तट प्रसिद्ध आहे,आपल्या पर्यटन स्थळासाठी आणि तेथील भुतांसाठी सुद्धा
!मोस बीच डिस्टिलरी सुरुवातीला १९२७ मध्ये फ्र्नक्स पेलेस या नावाने सुरु केली होती. निषेध युगाच्या काळात आपले विचार उघडपणे मांडण्यासाठी ती सिनेकलाकार, नेते आणि गुंड यांची आवडीची जागा होती. असे म्हटले जाते कि तिकडे एक कोठा सुद्धा होता. हि एक अशी जागा होती जिकडे बरीच चुकीची कामे आणि चुकीचे व्यवहार केले जात असत.
डिस्टिलरी मधील सर्वात प्रसिद्ध भूत आहे, “ द लेडी इन ब्लू”. ते एका मेरी एलेन नावाच्या तरुणीचे भूत आहे जिला निळे कपडे घालण्याचा शौक होता. तिची भेट तरुण पियानो वादक जोन जॉन कोन्तिना सोबत झाली. विवाहित असून देखील मेरी एलेन ला कोन्तिना खूप आवडला आणि त्यांचे प्रेमप्रकरण सुरु झाले. दोघे नेहमी चांदण्या रात्री बीच वर फिरत आणि प्रेम करण्यासाठी मरीन व्यू होटेलात भेटत जे डिस्टिलरी च्या समोर होते. या प्रकरणाचा दु:खद अंत झाला जेव्हा मेरी एलेन चा बय्शोरे हाईवे जवळ अपघाती मृत्यू झाला. त्याचवेळी कोन्तिना चे एका स्थानीक स्त्री अन्ना फिल्ब्रिक शी सुद्धा संबंध होते. अन्नाला जोन च्या खोटारडेपणाची हकीकत कळली आणि तिने जवळच्या दरीत उडी मारून जीव दिला. त्यानंतर कोन्तिना चा सुद्धा भयंकर मृत्यू झाला ज्यात त्याचे डोके कापून टाकले होते. असे म्हणतात कि एका ईर्ष्या करण्याऱ्या पतीने त्याचा बदल घेतला परंतु कोन्तिना चा मृत्यू आजही न उलगडलेलं रहस्य आहे.
लेडी इन ब्लू अनेकांना दिसते. खासकरून दरीजवळ लहान मुले आणि पाहुणे यांनी जाऊ नये अशी चेतावनी दिली जाते. याशिवाय पुन्हा पुन्हा फोन वाजणे आणि पलीकडे कोणीच नसणे, वाईन केस ची जागा विनाकारण बदलणे, वस्तूंची इकडेतिकडे फेकाफेक, दरवाजे आपोआप बंद होणे उघडणे इत्यादी.