देवगुरु बृहस्पती
देवतांचे गुरु बृहस्पती आहेत. महाभारताच्या आदि पर्वानुसार बृहस्पती हे महर्षी अंगिरा यांचे पुत्र आहेत. ते आपल्या ज्ञानाने देवताना यज्ञ भाग किंवा हवी प्राप्त करून देतात. असुर आणि दैत्य हे यज्ञात विघ्न आणून देवताना क्षीण करण्याचा प्रयत्न करत राहतात. देवगुरु बृहस्पती रक्षोघ्र मंत्राचा उपयोग करून देवतांचे पोषण आणि रक्षण करतात आणि दैत्यांपासून देवतांचे रक्षण करतात.
बृहस्पतीनी शचीला एक उपाय सांगितला होता
धर्म ग्रंथांनुसार एकदा देवराज इंद्र काही कारणाने स्वर्ग सोडून निघून गेला. त्याच्या जागेवर राजा नहुष याला स्वर्गाचे राज्य सोपवण्यात आले. स्वर्गाचे राज्य हातात येताच नहुष च्या मनात पाप आले आणि त्याने इंद्राची पत्नी शची हिच्यावर देखील अधिकार दाखवण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट शचीने देवगुरु बृहस्पती यांना सांगितली. देवगुरुनी तिला संगीतले की तू नहुष ला जाऊन संग की जर तो सप्तर्षींद्वारे उचललेल्या पालखीत बसून आला तरच तू त्याला आपला स्वामी मानशील. शचीने ही गोष्ट नहुष ला सांगितली. नहुष ने तसेच केले. सप्तर्षी जेव्हा पालखी उचलून नेत होते, तेव्हा नहुष ने एका ऋषींना लाथ मारली. त्यामुळे अतिशय रागावून अगस्ति ऋषींनी त्याला स्वर्गातून पडण्याचा शाप दिला. अशा प्रकारे देवगुरु बृहस्पती यांच्या सल्ल्याने शचीचे शील आणि पातिव्रत्य टिकून राहिले.