Get it on Google Play
Download on the App Store

भाग ३

https://jobryantnz.files.wordpress.com/2011/07/born_free.jpg

Born Free या नावाचा एक सिनेमा खूप गाजला होता. मानवसमाजात जन्मलेल्या व वाढलेल्या एका सिंहिणीची ती कहाणी होती. त्या सिंहिणीला पुन्हा मुक्त नैसर्गिक जीवन कसे मिळवून दिले गेले हा त्या सिनेमाचा विषय होता. जॉय आणि जॉर्ज ऍडॅमसन या जोडीने त्या मानवसान्निद्ध्यांत जन्मलेल्या व वाढलेल्या सिंहिणीला निसर्गात मोकळे सोडण्याचा प्रयोग यशस्वी केला होता. त्याचीच कथा Born Free या जॉयच्या पुस्तकात व सिनेमात मांडलेली होती. सिनेमात जॉय आणि जॉर्जच्या भूमिका Bill Travers and Virginia Mckenna यांनी केल्या होत्या. त्या दोघांनी ख्रिश्चनला पाहिले व एस आणि जॉनची अडचण त्याना समजली. त्यानाहि मनापासून वाटले कीं ख्रिश्चनला झू किंवा सर्कशीत आयुष्य काढावे लागूं नये. त्यानी जॉर्ज ऍडॅमसन व एस/जॉन यांची ओळख करून दिली. जॉर्ज आतां असा एक मोठा प्रयोग करणार होता कीं मानवसमाजात जन्मलेल्या सिंहांचा एक जथाच केनियाच्या जंगलात नैसर्गिक मुक्त जीवन जगण्यासाठी सोडावयाचा. त्यांत ख्रिश्चनचाहि समावेश करण्याचे त्याने मान्य केले. एस आणि जॉन याना अत्यानंद झाला. हा प्रयोग पार पाडणे सोपे नव्हते. त्यातील अनेक अडचणी व केलेले अनेक प्रयोग यांची कहाणी अतिशय रोचक आणि मूळ पुस्तकांतूनच वाचण्यासारखी आहे. ख्रिश्चन एक वर्षाचा होईपर्यंत त्याचा प्रेमाने संभाळ करून अखेर त्याला केनियांतील जंगलात सोडण्यासाठी त्याचेबरोबर ते दोघे तेथे गेले व जड अंत:करणाने जॉर्ज ऍडॅमसनचा व ख्रिश्चनचा निरोप घेऊन परतले. एक वर्षभर ख्रिश्चनची हकिगत व प्रगति त्याना कळत होती. वर्षानंतर ते पुन्हा केनियाला ख्रिश्चनला पाहण्यासाठी गेले. ख्रिश्चन आता मुक्त होता व एक सिंहीण व काही छाव्यांच्या छोट्या कळपाचा प्रमुख बनला होप्ता. त्याची पूर्ण वाढ झाली होती. त्यांना सांगण्यात आले कीं ख्रिश्चन आतां तुम्हाला ओळखणार नाही. मात्र प्रत्यक्षात, जेव्हां उघड्या मैदानात ख्रिश्चन त्यांचेसमोर आला तेव्हां त्याने दोघांना लगेच ओळखले व अंगावर उड्या मारमारून व चेहेरे जिभेने चाटून त्यांचे प्रचंड स्वागत केले. आपल्या जोडीच्या सिंहिणीशीं त्यांची ओळखही करून दिली!