Get it on Google Play
Download on the App Store

भाग ४

मूळ पुस्तक येथे संपले होते. कित्येक वर्षे गेलीं. २००८ सालीं ख्रिश्चन एस/जॉन यांच्या अखेरच्या भेटीचे जे व्हिडिओ चित्रण केले गेले होते ते YOUTUBE वर कोणीतरी टाकले. ती व्हिडिओक्लिप अतिशय लोकप्रिय झाली लाखों लोकांनी ती पाहिली. आजतागायत क्लिप बघणारांचा आकडा दररोज वाढतो आहे. काही कोटींवर गेला आहे. हे क्लिप प्रकरण एस/जॉन जोडीला कळले त्या निमित्ताने त्यानी पुस्तकाची नवीन आवृत्ति काढली तींत ख्रिश्चनबरोबरचे त्यांचे इतर मित्रांचे अनेक फोटो ख्रिश्चनच्या अखेरच्या भेटीचेहि फोटो दिले आहेत. पुस्तक वाचून झाल्यावर मीहि YOUTUBE वर ती व्हिडिओक्लिप मुद्दाम पाहिली उतरून घेतली. ती लेखाचे शेवटी पहावयास मिळेल. त्यांत ख्रिश्चनचे लंडनमधील जीवन, मग केनियाकडे गमन अखेरची भेट असे सर्व आहे. एका अनोख्या विषयावरील हे पुस्तक मला खूप आवडले. आपणही ते वाचावे अशी माझी शिफारस आहे.