अचेतन मनाचे कार्य
जरी अचेतन मन हे आपण निद्राधीन असताना जागृत असले, तरी त्याची शक्ती सचेतन मनापेक्षा जास्त असते. त्याच्यात जास्त लक्षात ठेवण्याची आणि सूचना ग्रहण करण्याची क्षमता असते. हे मन येणाऱ्या संकटांची चाहूल आपल्याला आधीच देत असते. दुसऱ्या शब्दात त्याला सहावे इंद्रिय देखील म्हणता येईल. हे मन तुम्हाला सांगू शकते की तुम्ही केव्हा आजारी पडणार आहात. एवढेच नव्हे तर आजाराच्या दरम्याने तुम्हाला लवकर बरे होण्याची हिम्मत देखील हेच मन देत असते. संमोहनाद्वारे व्यक्ती आपली एकाग्रता, वाणीचा प्रभाव आणि दृशी यांच्यापासून विभिन्न प्रकारच्या गोष्टी समजून घेऊ शकतो.