परब्रह्म निष्काम तो हा
परब्रह्म निष्काम तो हा गौळियां घरीं ।
वाक्या वाळे अंदु कृष्ण नवनीत चोरी ॥१॥
ह्मणती गौळणी हरीचीं पाउलें धरा ।
रांगतरांगत येतो हरी हा राजमंदिरा ॥२॥
लपतछपत येतो हरी हा राजभुवनीं ।
नंदासी टाकूनि आपण बैसे सिंहासनीं ॥३॥
सांपडला देव्हारीं यासी बांधी दाव्यांनीं ।
शंख चक्र गदा पद्म शारंगपाणी ॥४॥
बहुता कष्टें बहुता पुण्यें जोडलों देवा ।
अनंत पवाडे तुमचे न कळती मावा ॥५॥
नामा ह्मणे केशवा अहोजी तुह्मी दातारा ।
जन्मोजन्मीं द्यावी तुमची चरणसेवा ॥६॥
वाक्या वाळे अंदु कृष्ण नवनीत चोरी ॥१॥
ह्मणती गौळणी हरीचीं पाउलें धरा ।
रांगतरांगत येतो हरी हा राजमंदिरा ॥२॥
लपतछपत येतो हरी हा राजभुवनीं ।
नंदासी टाकूनि आपण बैसे सिंहासनीं ॥३॥
सांपडला देव्हारीं यासी बांधी दाव्यांनीं ।
शंख चक्र गदा पद्म शारंगपाणी ॥४॥
बहुता कष्टें बहुता पुण्यें जोडलों देवा ।
अनंत पवाडे तुमचे न कळती मावा ॥५॥
नामा ह्मणे केशवा अहोजी तुह्मी दातारा ।
जन्मोजन्मीं द्यावी तुमची चरणसेवा ॥६॥