पंढरीची वारी जयाचिये
पंढरीची वारी जयाचिये कुळीं ।
त्याची पायधुळी लागो मज ॥१॥
तेणें त्रिभुवनीं होईन सरता ।
नलगे पुरुषार्था मुक्ति चारी ॥२॥
नामाची आवडी प्रेमाचा जिव्हाळा ।
क्षण जीवावेगळा न करीं त्यांसी ॥३॥
नामा ह्मणे माझा सोयरा-जिवलग ।
सदा पांडुरंग तया जवळीं ॥४॥
त्याची पायधुळी लागो मज ॥१॥
तेणें त्रिभुवनीं होईन सरता ।
नलगे पुरुषार्था मुक्ति चारी ॥२॥
नामाची आवडी प्रेमाचा जिव्हाळा ।
क्षण जीवावेगळा न करीं त्यांसी ॥३॥
नामा ह्मणे माझा सोयरा-जिवलग ।
सदा पांडुरंग तया जवळीं ॥४॥