Get it on Google Play
Download on the App Store

बाहुली

नमस्कार मित्रांनो

मी गणेश जाधव राहणार खारघर (नवी मुंबई)

मी मुळचा सताऱ्याचा पण माझं आजोबा कामानिमित्त मुंबईत आले नंतर माझे वडीलही येथेच शिक्षण पूर्ण कले, आता मी हि येथेच राहतोय.
माझं लग्न 2015 ला झालं हि तेंव्हाची गोष्ट आहे
माझं लग्न सातार्याला झालं
माझी बायको सुषमा बारामती मधील ती M.Com झाली आहे. माझ्या आत्याने लग्न जमवलं होत. ती खूप सुंदर आणि समजूतदार आहे.
माझ्या साताऱ्याच्या गावी लग्नाला खूप धमाल असते, माझं हि लग्न खूप धूम-धडक्यातच झालं.
लग्नात कोणतीही अडचण झाली नाही पण लग्नानंतर मी जेव्हा मुंबईत आलो तेंव्हा फार विचित्र प्रकार घडू लागलं
त्या दिवशी रविवार होता, माझे मम्मी आणि पप्पा काही कामानिमित्त गावी गेले होते. मला सुट्टीच होती त्यामुळे मी संपूर्ण दिवस बायकोबरोबर घालवायचा असं ठरवलं.
दुपारचा पिच्चरच्या शो ची तिकीट मी आगोदरच काढली होती.

मी आणि माझी जाण्यासाठी तयार झालो ती खूपच खुश होती, अचानक तिला चक्कर आली आणि तिचा तोल जाऊन जमिनीवर पडणार इतक्यात मी तिला कस-बस सावरलं तिला हॉल मधील कोचवर झोपवून शेजारील छाया काकूंना आवाज दिला, काका हि आज रविवार असल्याने घरीच होते मग काकूंन सोबत ते हि माझ्या घरात आले.

काकूंनी सुषमा च्या तोंडावर पाणी शिंपडलं पण ती शुद्धीवर नाही आली मग काका म्हणाले एक कांदा घेऊन ये , मी किचन मधून धावत जाऊन कांदा घेऊन आलो, काकांनी कांडा फोडला व सुषमा च्या नाकाला धरला तरी ती थोडी शुद्धीवर आली पण पूर्ण शुद्धीवर नाही आली काहीतरी बाडबडू लागली मी तिला उचलून माझ्या accent कार ने डॉक्टर कडे नेली तेथे ती थोड्या वेळाने शुद्धीवर आली. डॉक्टर ने चेक करून सांघितलं कि लग्न झाल्यावर तिच्या हवामानात बदल झालाय म्हणून चक्कर आली असेल आणि मलाही तेच खरं वाटलं

मग आम्ही घरी आलो, रात्री जेवण झालं आणि टीव्ही पाहत असताना पुन्हा तिला बसल्या जागेवर चक्कर आली आणि ती पडली मी घाबरलो म्हणून मग मी काका आणि काकूंना परत बोलावलं काकींनी तिच्या तोंडावर पाणी शिंपडलं तसं ती तर ती काहीतरी फूट-फुटू लागली मग काकांना वेगळाच संशय आला ते त्यांच्या रूमवर गेले आणि साई बाबाचा अंगारा आणला आणि "ओम साई राम" म्हणत तिच्या कपाळाला लावला तर ती खूप रागीट झाली आणि हातपाय झटकू लागली मी तिचा असं वागणं पाहून हैरानाच झालो. रागाने उठली आणि मला मारायला धावली, काकूंनी आणि काकांनी तिला धरलं तसं ती शांत झाली आणि परत बेशुद्ध झाली.

काकांनी मला बाहेर नेऊन सांघितलं कि सुषमा ला कोणीतरी झपाटळय हे डॉक्टर ने होणार नाही तर मांत्रिकानेच होऊ शकत, आजची रात्र जाऊदे उद्या आपण सकाळी मला माहित असलेल्या मंत्रिकाकडे जाऊ.

मी सुषमा ला कस-बस झोपेच्या गोळी देऊन झोपवलं व काका आणि काकूंनाही आमच्याकडं झोपायला सांघितलं कारण घरी दुसरं कोणी नव्हतं शिवाय काकांनी सांघितल्या पासून मला सुषमा ची भीती वाटू लागली होती.
सकाळी उठलो तर सुषमा शांत वाटत होती रात्रीसारखं काहीच जाणवलं नाही तिला काहीच न सांगता काकूंनी तयार केलं आणि माझ्या कारने काका व काकूंना घेऊन मंत्रिकाकडे गेलो.
गाडीतून उतरून मंत्रिकाच्या घराच्या जवळ आल्यावर सुषमा भडकली मला कुठे घेऊन चाललात असं म्हणून ती पळू लागली काकांनी मला म्हणाले पकड तिला तसं आम्ही दोघांनी तीला पकडलं आणि मंत्रिकाच्या घरात नेलं.
मंत्रिकाच्या घरात जाताच ती अजूनही भयानक ओरडू लागली,

तिचे केस मोकळे झाले होते, डोळे लालभडक झाले होते, दोघांनी पकडलं होत तरी ती बाहेर पळून जाण्यासाठी तिच्या सर्व ताकतीनिशी जोर लावत होती. मांत्रिक आले मांत्रिक हे जवळपास 60 वर्षाचे बाबा होते त्यांनी तिच्या कपाळावर काहीतरी अंगारा लावला आणि म्हणाले ' ये गप जाऊन त्या रिंगणात बस नाहीतर बघ ' एवढं म्हणताच ती जाऊन बसली.

मी शांतपणे सर्व प्रकार पाहत होतो.

मांत्रिकाने कडीळिंबाच्या झाडाची फांदी पानंसगट घेतली आणि त्या काठीने तिला जोरात मारलं आणि विचारलं "कोण आहेस तू,हिला का धरलंय" तर सुषमा त्याच्याकडे फक्त रागाने पाहू लागली मग परत मांत्रिकाने मारलं आणि तोच प्रश्न पुन्हा विचारलं तस मग तिने सांघितलं कि "मी सताऱ्याचा राहणारा असून साताऱ्याच्या बसमधून प्रवास करताना हार्ट आट्याक आला आणि माझा बस मधील सिटवरच मृत्यू झाला पण माझ्या बऱ्याच इच्छा अजून अपूर्ण आहेत म्हणून माझा आत्मा त्याच सीटवर होता एक दिवस हि आली आणि त्या सीटवर बसली हिच्या डोक्यात मोगऱ्याचा गजरा घातला होता त्या वासाने मी आकर्षित झालो आणि मी हिच्या शरीरात प्रवेश केलाय". मांत्रिकाने सुषमा च्या अंगावर अंगारा उडवला आणि म्हणाला "हिला सोड, तुला काय पाहिजे सांग"

तसं सुषमा जोरात माणसाच्या आवाजात ओरडली 'हि आता माझी आहे, माझं प्रेम जडलं आहे हिच्यात मी नाय सोडणार हिला'
तसं मग मांत्रिक चिडला त्याने एका डब्यातून एक बाहुली काढली आणि त्यावर अंगारा टाकला मंत्र म्हटले तिला हळद कुंकू लावले आणि सुशमा ला म्हणाला "तू सोड तिला आणि या बहुलीत जा नाहीतर तुला खूप पिडेंन"
सुषमा मधील ते भूत काय बाहुलीत जात नव्हते मग मांत्रिकाने विचारलं तुला काय पाहिजे मग सुषमा मधील भूत म्हणाला 'मला एक सिगारेट पाहिजे' मांत्रिकाने एकाला सिगारेट आणायला सांघितलं सिगारेट आणल्यावर तो पेटवून सुषमा च्या हातात दिला.
सुशामाने तो मंत्रिकाच्या घरातील सर्वांकडे रागाने पाहत-पाहत सिगारेट पूर्ण संपवला.
आणि बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली मांत्रिकाने तिच्या हातात एक ताविज बांधलं आणि माझ्याकडे एक अंगारा पुडी दिली आणि रोज सकाळी हिला लावायला सांघितलं

15 ते 20 मिनिटा नंतर ती शुद्धीवर आली मांत्रिकाला पाहून ती घाबरली आणि उठून धावत माझ्याकडे आली आणि मला म्हणाली आपण इथे कसे आलो आणि ती रडू लागली काकूंनी तुला शांत केलं आणि बाहेर घेऊन गेली. मग मी काकांना विचारलं मंत्रीकला किती फी द्यावी लागेल तसं काका मला म्हणाले हे बाबा फी घेत नाहीत भोंदू बाबा फी घेऊन लुटता हे त्यातले नाहीत. मग मी बाबांच्या पाय पडलो आणि तेथून निघालो आणि घरी आलो.

त्या बाहुलीच त्या मांत्रिकाने काय केलं ते नाही माहित पण
त्या नंतर कधी आजपर्यंत सुषमा ला काही जाणवलं नाही.
मी माझ्या उभ्या आयुष्यात असं भुताडकीचा प्रकार पहिला नव्हता पण जेव्हा कधी सुषमा केस मोकळे ठेवते तेंव्हा मला त्याच भुताची आठवण येते.

तुम्हाला हि गोष्ट कशी वाटली नक्की प्रतिक्रिया द्या

आभार:-गणेश जाधव.

सर्व वाचकांना एकच नम्र सूचना:-
1. आम्ही अंधश्रद्धा पसरवत नाही,
तर तुमचं निव्वळ मनोरंजन हाच आमचा हेतू आहे.
2. या पेजवरील गोष्ट म्हणजे कोणासोबत घडलेला प्रसंग असतो, ती लिहिणारा हा कुशल लेखक नसतो. वाचताना त्याच्या नजरेने वाचा आणि काहीही कमेंट करताना थोडं नीट विचार करा नाहीतर आपल्या पेजला कोणीच अनुभव पाठवणार नाही.

@#भुताच्या_गोष्टी