राजकारण आणि भूत
भूत, आत्मे आणि अतींद्रिय अनुभव वाचक आम्हाला पाठवत आहेत. हा अनुभव विशेष आहे कारण ह्यावेळी ह्यांत राजकारण समावीत आहे. नावे आणि स्थळे बदलून दिली आहेत. कथेला आम्ही थोडे इंटरेस्टिंग बनवले आहे. . घटना २० वर्षे जुनी आहे.
गुरुचंद्र तुकाराम पाटील साहेबना सारे शहर अप्पा म्हणत असे. अनेक वर्षे अप्पासाहेबानी अनेक पदे भूषवली होत. आमदार, खासदार आणखीन काही. शहरभर ह्यांचे पेट्रोल पम्प, रिसॉर्ट आणि काय काय उद्योग होते. पैसे अक्षरशः पाण्यासारखे वाहत असत. अप्पासाहेबाना तीन मुले. एक मुलगा अपंग होता, मुलीचे लग्न दूर विदेशांत झाले होते आणि तिसरा मुलगा वारस होता. अप्पासाहेबाना जग तसे भ्रष्टाचारी म्हणून ओळखत नव्हते. अर्थांत आपण एकदा आमदार झाला तर पैसे काय कुठूनही येतात.
पण फार कमी जणांना ठाऊक होते कि अप्पा साहेबाना अनेक नाद होते. बाईचा आणि जुगाराचा. अप्पासाहेबानी दोन्ही गोष्टी मात्र अगदी लपवून केल्या होत्या. शहरांत कुठेतरी एक त्यांचा एक क्लब होता जिथे फक्त त्यांच्या खास लोकांनाच प्रवेश होता. तिथे अप्पासाहेब जुगाराचा अड्डा चालवत. अक्षरशः कोट्यवधी रुपये ते उधळत असत. तिथे प्रवेश देशांतील फार कमी लोकांनाच होता. अप्पासाहेबाना जुगारात हार मानवी लागली तर प्रचंड संताप यायचा. अश्या वेळी ते कुणाला गोळी घालायला सुद्धा पुढे मागे पाहत नसत. संताप काढण्यासाठी नंतर क्लब मध्येच त्याची विशेष खोली होती. त्यांचे खास आदमी तिथे त्यांच्या साठी तरुण मुलींची सोय करायचे. एक मुलगी तिथे आली कि पुन्हा तिला तिथे प्रवेश नसे. बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका इत्यादी भागांतून भाषा सुद्धा ना येणाऱ्या मुली तिथे आणल्या जायच्या. तरुण असताना अप्पासाहेब थोडे जास्तच जोशांत असत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांचे सचिव पांडे साहेब ह्यांची होती. अप्पासाहेबाच्या व्यसनाच्या पायी अनेक मुली जखमी झाल्या होत्या.
एक वर्षी लक्ष्मीपूजन होते. अप्पासाहेब त्यावेळी पहिल्यांदाच आमदार झाले होते आणि नवीन होते. अप्पासाहेबानच्या शहराच्या जवळ एअरपोर्ट निर्माण व्हावा असे प्रपोसल होते. अप्पासाहेबाना त्यातून कोट्यवधींचा फायदा झाला असता. पण त्याच प्रोजेकट साठी दुसऱ्या एका मोठ्या राजकारण्याने सेटिंग केले होते. अप्पासाहेबानी त्या राजकारण्याला आपल्या क्लब वर बोलावले. एक मोठ्या रकमेवर जुगार ठरला आणि जो जिंकेल त्याचा मान राखून दुसरा ह्या प्रकल्पातून माघार घेईल असे ठरले. अप्पासाहेब त्या जुगारात अतिशय वाईट पणे हरले. ती हार अप्पासाहेबाना जीवाला लागली. त्यांनी तो राग त्या दिवशी उपलब्ध असलेल्या एक मुलीवर काढला. इतका कि त्यांनी तिला गोळी घालून मारले. निम्मित इतके कि ती मुलगी थोडी वयस्क होती आणि त्याच शहरांतील होती. त्यांच्या हस्तकांनी तिच्या शवाला कुठे तरी गायब केले. प्रकरण मिटून गेले. विमानतळ प्रकल्प सुद्धा शेवटी शीतपेटीत पडला. दशके उलटून गेली. अप्पासाहेबाना शहराचे सर्वेसर्वा मानले जात होते.
अप्पासाहेबांच्या छोटा मुलगा राजकारणात हिरीरीने भाग घेत होता आणि पांडे साहेबानी आपला मानलेला मुलगा आकाश ह्याला त्याच्या सोबत ठेवले होते. आकाश हा अतिशय भरवशाचा पार्टी कार्यकर्ता बनला. काही काळांतच दुसऱ्या प्रभागातून अप्पा साहेबाचा मुलगा आमदार म्हणून निवडून आला आणि आकाशने त्याचं मदतीने आपले छोटेसे आर्थिक साम्राज्य उभारले.
अगदी पांच वर्षात दृष्ट लागावी अशी प्रगती आकाशने केली. काही लोकांच्या मते अप्पा साहेबाना आकाश शेवटी दगा देणार अश्या गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या. अप्पा साहेबाच्या मुलाला हे खटकू लागले. पांडे साहेबानी मध्यस्ती करून आकाश नेहमीच अप्पा साहेबाना प्रामाणिक राहील असे वचन घेतले. आकाश सुद्धा राजकारणात येण्यास अजिबात इच्छुक नव्हते आणि त्याने तसे वचन सुद्धा दिले.
अप्पासाहेब जुन्या पद्धतीचे नेते होते. त्यांना इतरांना तुच्छ लेखण्यास आवडायचे. पावर त्यांच्या डोक्यांत होती. काळ्या पोरा बरोबर मांडवली करणे त्यांना पसंद नव्हते. त्याने एक प्लॅन आखला. शहरांतील सर्व मोठ्या व्यक्ती, पार्टीचे ह्यांना अप्पा साहेबानी आपल्या जुगाराच्या अड्ड्यावर बोलावले. पांडे साहेबाना त्यांनी आधीच समजावून ठेवले होते. आकाश इथे आपली बहुतेक संपत्ती जुगारात जाणून बुजून हरेल आणि नंतर अप्पा साहेबांच्या पायापडून अप्पा साहेब मोठ्या मनाने त्याला माफ करतील आणि इतर सर्व लोकां पुढे आकाश अप्पा साहेबाना किती प्रामाणिक आहे हे समजेल असा प्लॅन होता. नाहीतर अप्पा साहेब कुठल्याही थराला जाऊ शकतात हे पांडे साहेबाना ठाऊक होते. त्यांनी आकाशला त्या प्रमाणे समजावले सुद्धा.
दिवस लक्ष्मीपूजनाचा होता. आकाश आणि इतर मंडळी जुगार खेळण्यास बसली. ३ डाव आकाश सलग हरला. अप्पा साहेबानी त्याला मुद्दाम मुद्दाम डिवचले. असे म्हटले जायचे कि आकाश पांडे साहेबांच्या एका ठेवलेल्या बाईचा मुलगा होता. अप्पा साहेबानी तो विषय वर काढला आणि आकाश सुद्धा निमूट पाने ऐकून घेण्याशिवाय काहीही करू शकला नाही. पण चौथा डाव आकाश जिंकला. पाचव्या डावांत आकाशने आपल्या जवळील सर्व टोकन टेबलवर ठेवले. पांडे साहेब त्याच्या कानात कुजबुजले पण ह्या वेळी आकाश च्या डोळ्यांत वेगळीच चमक होती. "तुम्ही हराल अप्पा साहेब, पैसेच नाहीत तर खूप काही हराल, चतुर असाल तर फोल्ड करून चला" आकाशें प्रचंड आत्मविश्वासांत सागिंतले. आकाशला विशेष जुगार खेळात सुद्धा येत नव्हता. अप्पा साहेबांचा डोळ्यांत अंगार होता. ते पाहून इतर सर्व जणांनी फोल्ड केले. पट्टे दाखवतंच आकाश जिंकला होता. अप्पा साहेब हरले होते आणि त्यांना ती हार सहन नाही झाली. अप्पा साहेबानी उठून सरळ आकाशावर गोळी झाडली. पण जुगारा प्रमाणे आकाशचे नशीब इथे सुद्धा चांगले होते. गोळी चुकली आणि पुढील भिंतीवरून रिकोचॅट होऊन अप्पासाहेबांच्या धाकट्या मुलाच्या मानेत घुसली. मुलगा तात्काळ गतप्राण झाला. प्रचंड गोंधळांत इतर लोकांनी काढता पाय घेतला. अप्पा साहेबाना इतका धक्का लागला कि ते त्यातून सावरले नाहीतच.
आकाशला पांडे साहेबानी बाहेर काढले. प्रकरण कसे बसे लपवले गेले. मुलगा कार अपघातांत मेला असे मीडियाला कळवण्यात आले.
आकाश आणि पांडेसाहेबांची भेट झाली आणि त्यांनी आकाशाला देश सोडून जाण्याची विनंती केली. पण आकाशने वेगळाच विषय काढला. जे काही घडले ते मला स्वप्नात दिसले होते असे तो म्हणून लागला. मी खरोखरच आपली अनौरस औलाद आहे काय ? असे त्याने पांडे साहेबाना विचारले.
पांडे साहेबानी शेवटी हकीकत स्पष्ट केली. खूप वर्षा आधी ज्या स्त्रीला अप्पा साहेबानी गोळी घालून मारले होते ती पांडे साहेबांच्या ओळखीची होती. आकाश तिचा मुलगा होता आणि पांडे साहेबांच्या फार्म हाऊस वर ते राहायचे. त्या दिवशी आणखीन कुणीही बाहेरील स्त्री मुलांनी नाही म्हणून पांडे साहेबानी तिची व्यवस्था केली होती. तिचा मृत्यू झाल्यावर पांडेसाहेबानी वाईट वाटून आकाशाची जबाबदारी घेतली होती. आकाशचे वडील कोण होते ह्याची माहिती कुणालाच नव्हती पण आकाशला जुगारात आणि धंद्यांत जे अद्वितीय यश मिळत होते त्यांत कदाचित अतृप्त आईच्या आत्म्याचा हाथ असावा असे त्यांना वाटत होते.
आकाश देश सोडून गेला कि त्याचे काय झाले कुणालाच ठाऊक नाही. हृदयविकाराच्या झटक्याने अप्पा साहेबाना मृत्यू आला आणि पांडे साहेब आपल्या मुलाकडे अमेरिकेत राहायला गेले.