Get it on Google Play
Download on the App Store

भाग २

समीर आता तिच्या Rpy ची वाट पहात होता. रात्रीचे दोन वाजत आले होते, तिला मॅसेज पाठवूनही आता बराच वेळ झाला होता. पण, अजूनही तिचा Rpy आला नव्हता. तिने कदाचित चूकूनंच मला मॅसेज पाठवला असेल असं स्वतःच्या मनाशी पक्क करून समीर हातातील मोबाईल खिश्यात ठेवायला लागतो. पण, तेवढ्यात मोबाईलची msg tone वाजते. ती tone ऐकल्याबरोबर समीरच्या चेह-यावर शंकेची लकेर उमटते.  तो तसाच गडबडीत मॅसेज open करून वाचायला लागतो. मॅसेज वाचून समीरला थोडा धक्का बसतो. त्या मॅसेजमध्ये असं लिहिलेलं होतं, " मी चुकीच्या नंबरवर कधीच मॅसेज करत नाही. मी तुला ओळखते..तु समीर..!! हो ना..?? "

ही मला कशी काय ओळखते..?? नक्की ही आहे तरी कोण..?? समीर एकामागोमाग एक असे अनेक प्रश्न स्वतःलाच विचारायला लागतो. पण कितीही विचार केला तरी त्याला  उत्तर काही सापडत नव्हतं..!! तिला Rpy करू की नको ह्या विचारात समीर बस स्टाॅपवर  येरझ-या मारायला लागतो. बराच वेळ विचार केल्यावर समीर तिला Rpy द्यायचं ठरवतो. तो पुन्हा एकदा मॅसेज Type करायला लागतो. " हे बघ सावित्री..आता खुप झालं. तु नक्की कोण आहेस हे मला खरं सांग. खरं सांगायचं असेल तरंच Rpy दे.." हे सारं Type करून तो मॅसेज send करतो. Send केल्याबरोबर तिला लगेचंच मॅसेज पोहोचतो, ते ही पुन्हा एकदा नेटवर्क नसताना..!!

मॅसेज send  केल्यावर समीरची बैचेनी प्रत्येक सेकंदाला वाढत जाते. तो प्रत्येक सेकंद त्याला एका तासाऐवढा वाटायला लागतो. काही केल्या ती वेळ लवकर जात नव्हती..!! म्हणून तो पुन्हा-पुन्हा मोबाईल check करून तिचा मॅसेज आला की नाही हे बघायला लागतो. बस स्टाॅपवर चकरा मारून-मारून आता त्याचे पायदेखील दुखायला लागतात. पायांना जरा आराम मिळावा म्हणून तो परत बाकड्यावर येवून बसतो. पण, तो बाकड्यावर येवून बसणारंच होता की तितक्यातच मोबाईलची रिंग वाजते. रिंग वाजल्यावर समीर मोबाईल बघायला लागतो. तेव्हा मोबाईलच्या screen वर त्याला Battery Low असं दिसतं आणि लगेचच त्याच्या दुस-याच सेकंदाला मोबाईल switch off देखील होतो..!!  समीर आता वैतागून कपाळाला हात लावून बसतो. एवढ्या सुमसाम वाटेवर त्याला आसपास कोणीच नसताना फक्त त्या मोबेईलचाच आधार होता. म्हणून, तो हतबल होवून स्वतःच्याच नशीबाला दोष देत मग त्या बाकड्यावर तसाच उदास बसून रहातो.

मोबाईल switch off झाला, त्यामुळे आता सावित्रीचा  मॅसेज येणार नाही. ती नक्की कोण होती हे आता कितीही प्रयत्न केला तरी कळणार नाही. ह्या विचाराने आता समीरसुद्धा बैचेन व्हायला लागतो. त्या बैचेनीतंच तो बंद झालेल्या मोबाईलला हातात घेवून सारखा बघत रहातो. बराच वेळ त्याचं असं बघणं चालू असतं. थोड्या वेळाने बंद पडलेल्या मोबाईल screen वर समीर स्वतःचा प्रवासाने आणि ईथल्या अनपेक्षीतपणे आलेल्या परिस्थिने थकून गेलेला चेहरा बघायला लागतो.

मोबाईल बघता-बघता मग अचानकंच मोबाईल screen वर त्याच्या चेह-याऐवजी केसांनी पूर्णपणे झाकून गेलेला चेहरा दिसतो..!! आणि मग दुस-याच क्षणी सावित्रीचा call येतो. तो चेहरा बघून आणि मोबाईल switch off असतानाही सावित्रीचा आलेला call बघून, आता नं घाबरणारा समीरसुद्धा थर-थर कापायला लागतो. पूर्णपणे घाबरून गेलेला समीर तिचा call घेत नाही. खरं तर तो call घेण्याची तशी त्याची हिम्मतंच होत नाही. शेवटी रिंग वाजून-वाजून मोबाईल पुन्हा बंद पडतो..!! ह्या अनपेक्षित आणि विचित्र घटनेमुळे समीर पार हादरून गेला होता. भितीमुळे आधारासाठी आजूबाजूला कोणी दिसतय का हे बघण्यासाठी त्याची नजर भराभर फिरू लागते. पण, दूरपर्यंत कोणी ऐण्याचं कसलंच चिन्ह दिसत नव्हतं. भितीपोटी आता त्याच्या घश्याला कोरड पडली होती. बॅगेची चैन घाई-घाईतंच उघडत तो बाॅटल काढतो. बाॅटल काढून गटागट पाणी पितो. ऐवढ्या थंडीतही घामाघूम झालेला चेहरा खिश्यातील रूमालाने पुसतो. स्वतःला सावरत, खोटा धीर देत शांत करण्याचा प्रयत्न करतो. पण, दुदैवाने आज त्याच्या नशिबात वेगळंच काहीतरी मांडून ठेवलेलं होतं. कारण, काही वेळ तसाच शांततेत गेल्यानंतर पुन्हा मोबाईलची रिंग वाजायला लागते..!! आता समीर आणखीनच थर-थर कापायला लागतो. कशीतरी हिम्मत एकटवून तो मोबाईल बघतो. मोबाईलच्या screen वर आता त्याला एक पूर्ण जळालेला चेहरा विचित्र हसताना दिसतो. तो भयाणक चेहरा बघितल्यामुळे घाबरून गेलेल्या समीरच्या हातातून मोबाईल खाली पडतो..!!!

( क्रमशः )

लेखक- सतीश रमेश कांबळे