स्वपन देबर्मा
एक साधासुधा गरीब पण संवेदना जिवंत असणारा भारतीय नागरिक सुद्धा हजारो जणांचे प्राण वाचवू शकतो यार....
मित्रा तुझे सव्वाशे कोटी आभार.....
या फाटक्या दिसणाऱ्या माणसाने शुक्रवारी संध्याकाळी ५.२५ वाजता त्रिपुरात वाचवले अगणित लोकांचे प्राण....
गेले अनेक दिवसात त्रिपुरात कोसळणाऱ्या धुवाधार पावसामुळे रेल्वेमार्गाच्या शेजारची माती भुसभुशीत झाल्याने एका अत्यंत अडचणीच्या ठिकाणी रेल्वेमार्गावर इथली दरड कोसळली असल्याचे स्वपन देबर्मा या गरीब शेतमजुराने पहिली. स्वपन तेव्हा दुपारचे जेवण करून आपल्या शेतीच्या रोजंदारीच्या कामावर आपल्या लहानग्या मुलीसोबत निघाला होता.
गावापासून खूप लांब असलेल्या या ठिकाणी काही तासातच अंबासा वरून आगरतळाला जाणारी रेल्वे धडधडत जाणार होती.
काय भीषण प्रकार होऊ शकतो हे लक्षात आल्यावर लगेच स्वपन आपल्या मुलीला घेऊन अर्ध्या दिवसाच्या रोजंदारीच्या त्याला मिळणाऱ्या पैशांचा विचार न करता धावत पुढे निघाला आणि एका मोकळ्या ठिकाणी थांबला.
जवळपास ३ तासांनी बहुधा पावसामुळे नेहमी वेळेवर येणारी ही रेल्वे त्या दिवशी मात्र अजून उशिरा धडधडत येताना स्वपनला दुरूनच दिसली.
स्वपनने आपल्या कमरेचा छोटासा फाटका टॉवेल रेल्वेमार्गावर उभा राहून इशारा म्हणून जोरजोरात हलवायला सुरुवात केली. पण हे इतके बहुधा पुरेसे नाही असे लक्षात आल्यावर आता त्याने आपल्या हातातली पिशवी एका हातात आणि टॉवेल एका हातात असे धरून आता रेल्वेमार्गावर उड्या मारायला सुरुवात केली.
वेगात धडधडत येणाऱ्या रेल्वेच्या मार्गात उभे राहून हे जीवावरचे काम करताना आधी स्वपनने आपल्या लहानगीला रेल्वेमार्गापासून दूर उभे केले होते.
डोंगर दर्यांनी भरलेल्या पण कदाचित उशीर झाल्याने त्रिपुरातल्या रेल्वेमार्गावरून वेगात सुसाटत निघालेल्या रेल्वेच्या चालकाने हातात काहीतरी धरून हलवत उड्या मारणाऱ्या एका बारीक चणीच्या इसमाला बर्यापैकी जवळ आल्यावर पाहिले आणि ताकतीचे आयत्या वेळचे ब्रेक्स लावत हजारो प्रवाशांना घेऊन सुसाटत निघालेली रेल्वे कशीबशी स्वपनच्या समोर काही अंतरावर येऊन थांबवली.
स्थानिक भाषा न येणाऱ्या चालकाला स्वपन याने पुढे रेल्वेमार्गावर दरड कोसळली असल्याचे हातवाऱ्यांनी सांगितले.
चालकाने घडलेल्या प्रकारची कल्पना त्वरित संबंधीत कार्यालयात पोचवली आणि मागून येणाऱ्या गाड्या थांबवण्याची व्यवस्था केली.
आता स्वपनला घेऊन चालक पुढे चालत निघाला आणि मार्गावर कोसळलेली दरड पाहून स्वपन नसता तर काय भीषण प्रकार घडला असता हे समजून अंतर्बाह्य हादरला.
दरड पाहिल्यावर स्वपनची भाषा येत नसल्याने पहिली काय गोष्ट चालकाने केली असेल तर स्वपनला अत्य्नंदाने मिठी मारली आणि त्याचे कौतुक केले.
धन्यवाद स्वपन.... पहिलं म्हणजे तू एक जबऱ्या पिता आहेस कारण छायाचित्रात दिसते आहेस त्यावरून तुझ्या पायातली स्लीपर तू आपल्या लहानग्या मुलीच्या पायात घातली आहेस आणि तू मात्र अनवाणी चालत आहेस....
आणि दुसरं म्हणजे....
...हातावर स्वतःचे आणि स्वतःच्या मुलीचे पोट असूनही, अर्ध्या दिवसाची पूर्ण मजुरी वाया जाणार आणि कदाचित घरी संध्याकाळची भाकरी शिजणार नाही हे पक्के ठाऊक असूनही, रेल्वे थांबली नाहीतर स्वतःचा जीव धोक्यात येऊ शकतो याची पूर्ण जाणीव असूनही, स्वतःच्या मुलीचे भवितव्य पणाला लावून प्रसंगावधान राखून रेल्वेमार्गावर जीवाच्या आकांताने धावत निघालेला स्वपन या धाडसी भारतीय नागरिकाने शुक्रवारी संध्याकाळी केवळ शेकडो प्राण वाचवले असे नाही तर या घरी परतणाऱ्या जीवांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या हजारोंचे आशीर्वाद सुद्धा मिळवले....
स्वपन देबर्मा...तुला आम्हां देशवासीयांकडून करोडो मुजरे
मिलिंद वेर्लेकर,
“टीम भारतीयन्स’