Get it on Google Play
Download on the App Store

पंढरी पुण्यभूमी ॥ दक्षिण ...

पंढरी पुण्यभूमी ॥ दक्षिण दिग्वाहिनी ॥
तीर्थ ते चंद्रभागा ॥ महापातकधूणी ॥
उतरलें वैकुंठ महासुख मेदीनी ॥ १ ॥
जय देवा पांडुरंगा जय अनाथनाथा ॥
आरती ओवाळीन ॥ तुम्हां लक्ष्मीच्या कांता ॥ धृ. ॥
नित्य नवा सोहळा हो ॥ महावाद्यांचा गजर ॥
सन्मुख गरूडपारी ॥ उभा जोडोनी कर ॥
मंडित चतुर्भूज ॥ कटिं मिरवती कर ॥ २ ॥
हरिनाम कीर्तने हो ॥ आनंद महाद्वारी ॥
नाचती प्रेमसुखे ॥ नर तेथिच्या नारी ॥
जीवनमुक्त लोक ॥ नित्य पाहती हरी ॥ ३ ॥
आषाढी कार्तिकी हो ॥ गरुड टक्याचे भार ॥
गर्जती नामघोषे ॥ महावैष्णववीर ॥
पापासी रीग नाहीं ॥ असुर कांपती शूर ॥ ४ ॥
हें सुख पुंडलीके कैसें आणिले बापें ॥
निर्गुण साकारलें ॥ आम्हालागीं हें सोपें ॥
म्हणोंनी चरण धरुनी ॥ तुका राहिला सूखे ॥ जय. ॥ ५ ॥

पांडुरंग आरती संग्रह

भगवान दादा
Chapters
युगें अठ्ठावीस विटेवर उभा... येई हो विठ्ठले माझे माऊली... विठ्ठला मायबापा । वारीं ... जय जय कटिकर विठ्ठल चिन्मय... आरती अनंतभुजा ॥ विठो पंढर... धन्य दिवस अजि दर्शन संतां... जगदीश जगदीश देव तुज म्हणत... ऎसीया पायालागी मंगळ आरती ... ऎसीया पायालागी मंगळ आरती ... ओवाळूं आरती माझ्या पंढरीर... भक्तीचे पोटीं बोध कांकडा ... ओंवाळूं गे माये विठ्ठल सब... सुंदर अंगकांती मू... गावों नाचों विठी करुं तुझ... पंचदशीचे सारीं पंडितभी भ्... निर्जरवर स्मरहधर भीमातिरव... काय तुझा महिमा वर्णूं मी ... सुकुमार मुखकमल । निजसार न... पंढरी पुण्यभूमी ॥ दक्षिण ... जय पांडुरंग देवानंददुमकंप... फळलें भाग्य माझें । धन्य ... संत सनकादिक भक्त मिळाले अ... प्रेम सप्रेम आरती । गोविं... जय जगज्जननि , विठाबाई । उ...