Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण १

वाचक मित्रांनो, टाईम ट्रॅव्हल - द बिगिनिंग या कथेला आजपासून सुरुवात होत आहे. या कथेचे प्रत्येक प्रकरण दर शनिवारी प्रकाशित केले जाईल. सायन्स फिक्शन हा प्रकार मराठीत फार कमी आहे. या प्रकारच्या कथा समजण्यास थोड्या अवघड असल्या तरी त्या मनोरंजक असतात. जस हॉरर कथांमध्ये आपण तंत्र-मंत्र, भुतं-खेतं, जादू-टोणा या गोष्टींचा वापर करून अनेक  काल्पनिक गोष्टी तयार करतो, तसेच सायन्स फिक्शन प्रकार वापरून आपण अनेक काल्पनिक विज्ञान कथा तयार करू शकतो. टाईम मशीन, एलियन्स, कृष्णविवर अश्या काही वैज्ञानिकांनी वर्तवलेल्या शक्यतांवर आपण अनेक रंजक काल्पनिक  कथा  बनवलेल्या आहेत.


            टाईम ट्रॅव्हल - द बिगिनिंग हा सुद्धा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. ही कथा आहे प्रोफेसर भारद्वाज आणि त्यांचा असिस्टंट अभिजीत यांची. जे एक टाईम मशीन तयार करतात. मात्र अचानक झालेल्या बिघाडामुळे ते भूतकाळात एका अज्ञात ठिकाणी पोहोचतात आणि त्यानंतर सुरूवात होते एका रोमांचक साहसाची. त्यांच्या समोर अनेक अशी रहस्ये उघडी पडतात. जी हजारो वर्षांपासून कोणी सोडवू शकल नव्हतं. ऐतिहासिक तथ्यांचा आधार घेऊन एक काल्पनिक कथा लिहिली आहे. अनेक पुस्तके, इंटरनेट वरील ब्लॉग्स, युट्यूब व्हिडिओज यांचा आधार घेऊन ही कथा लिहिली आहे. यात कथेच्या मागणीप्रमाणे इतिहासात मी माझ्या पध्दतीने काही बदल केले आहेत. यात काही त्रुटी आढळल्यास नक्की सांगा, जेणेकरून येणार्या भागात मी काही सुधारणा करू शकेल. धन्यवाद


                        happy reading

                        ***************



  प्रोफेसर भारद्वाज रस्त्याने येड्यासारखे पळत सुटले होते. आजुबाजुचे लोक त्यांना पाहुन हसतायत याच त्यांना भानही नव्हत. त्यांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता.६५ वर्षाचे असूनही ते प्रोफेशनल अँथलीट सारखे पळत होते आणि पळतांना सारखे 'युरेका युरेका' ओरडत होते. त्यांना पाहुन आर्कीमीडीजचीच आठवण येत होती. फक्त फरक एवढा होता की आर्कीमीडीज हा बाथरूम मधून बिना कपड्यांचा पळाला होता तर प्रोफेसरांनी कपडे घातले होते. 


               प्रोफेसर पळत शहराच्या बाहेर आले होते. आता ते जंगलात घुसले. जंगलात थोड अंतर गेल्यानंतर एक झोपडीसारख घर दिसल. प्रोफेसर त्या झोपडीच्या दारापर्यंत येऊन थांबले. ते जोरजोरात धापा टाकत होते. काही वेळाच्या विश्रांनीनंतर प्रोफेसर हळूच उठले. थरथरत्या हातांनी त्यांनी झोपडीचा दरवाजा उघडला. मध्ये अजुन एक दरवाजा होता पण तो साधा दरवाजा नव्हता. त्याला कोणत्याही प्रकारचा कडीकोयंडा वगैरे नव्हता. फक्त दाराच्या वरच्या बाजुला एक तळहात मावेल एवढा गोल काचेचा आकार होता. त्या दाराच्याच उजव्या बाजुला एक स्क्रीन होती. त्या स्क्रीनच्या खाली काही बटन होते. प्रोफेसरांनी भराभर ते बटण दाबले. तसे त्या स्क्रीनवर काही आकडे उमटले. त्याबरोबर दारावरील त्या गोल काचेच्या आकाराचा रंग हिरवा झाला. आता प्रोफेसरांनी त्या गोल काचेवर आपला उजवा तळहात ठेवला. त्यासरशी तो दरवाजा उघडला गेला. जी बाहेरून पाहतांना एक साधारण झोपडी वाटते तीच आतून ऐक सुसज्ज अशी लॅबोरटरी होती. सर्व वैज्ञानिक साधनांनी लैस आणि परीपूर्ण अशी रीसर्च लॅब. एक त्यांचा असिस्टंट सोडला तर ही गोष्ट कोणालाही माहीत नव्हती. प्रोफेसरांनी चटकन आपला मोबाईल काढून असिस्टंटला फोन लावला.


           अभिजीत त्यावेळेस साखरझोपेत होता. अचानक मोबाईलच्या ट्रींग ट्रींगने त्याची निद्रा भंगली. तो चरफडतच उठला, 


"च्यायला, कोणाची शामत आलीय काय माहीत?" 


बडबडतच त्याने फोन उचलला, 


"हैलो, कोण आहे हे बे?


प्रोफेसरः अभिजीत, आताच्या आता लॅब वर ये. लवकर.


अभिजीतः सर, काय झाल? एनी प्रॉब्लेम?


प्रोफेसरः अरे आधी ये तर खरी.


अभिजीतः अहो सर, माझी अजुन अंघोळ बाकी आहे. 


प्रोफेसरः काही करू नको. तसाच ये. पण तु मल अर्ध्या तासात इथे हजर पाहीजे कळल.


अभिजीतः हैलो.... हैलो सर.


पण तोपर्यंत प्रोफेसरांनी फोन ठेवून दिला होता.


       

               अभिजीतची मोटरसायकल त्या जंगलाजवळ येऊन थांबली. त्याने मोटरसायकल एका झाडाच्या आडोशाला लावली आणि पायीपायीच त्या 

लॅब जवळ आला. त्याने झोपडीचा दरवाजा उघडला. दाराच्या डाव्या बाजुला एक बटण होत ते त्याने दाबल. आतून आवाज आला,


"कोण आहे?"


अभिजीतः सर मी अभिजीत.


प्रोफेसरः पासवर्ड सांग.


अभिजीतः 'वेळ मूल्यवान आहे.'


काही क्षणांत दरवाजा उघडला गेला. अभिजीत मध्ये शिरला. 


"काय झाल सर? एवढ तातडीने का बोलावलत?


प्रोफेसरः अभिजीत आपली रीसर्च सक्सेस झाली. ये इकडे


अस म्हणून प्रोफेसरांनी अभिजीतला मिठीच मारली. आजपर्यंत त्याने प्रोफेसरांना एवढ आनंदी कधीच पाहील नव्हत. प्रोफेसरांनी एका मोठ्या गोळ्यावर टाकलेल कापड ओढल. टाईम मशीन. प्रोफेसरांचा आनंद गगनात मावत नव्हता. मात्र अभिजीतच्या चेहर्यावर माशीही हलली नाही. तो मुर्खासारखा कधी प्रोफेसरांकडे तर कधी टाईम मशीनकडे बघत होता. 


क्रमशः