Get it on Google Play
Download on the App Store

उडुपीचा राजा

साधारणपणे पाच हजार वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रात महाभात घडले. हे युद्ध प्रचंड भव्य होते. शेकडो राजे महाराजे, सावकार, सेनापती, घोडदळ, लाखोंचं पायदळ, हत्तीसेना, अनेक रथ आणि त्यांचे सारथी, इतकि सगळी माणसे त्यात सामील होती. त्यात  उदुपिच्या राजाने मात्र युद्धात सहभागी होण्यास नकार दिला. त्याने कृष्णांस विनंती केली, “या म्हण युद्धात लाखोन शेकडो माणसे असतील. मी या सगळ्यांसाठी भोजनाचा प्रबंध करेन.” “राजन, आपला निर्णय मला पटला परंतु माझी एक अट आहे. देवी अन्नपूर्णेचा अपमान होता कामा नये.युद्धातील भोजन हे शिल्लक राहू नये.” कृष्णाने स्मितहास्य देत उदुपिच्या राजाला सांगितले.

अन्नपूर्णेचा आशिर्वाद

महाभारताचे युद्ध हे अठरा दिवस चालले. हजारो  दररोज सैनिक मेले. उदुपिचा राजा रोज इतकेच भोजन बनवयचा कि जे वाया जाणार नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नेहमी  राजाने बनवलेले जेवण संपायचे. अनेकांना आश्चर्य वाटले कि, “ उदुपिचा राजा अगदी तेवढयाच प्रमाणात कसे भोजन बनवतो??”

कृष्णाची माया

एकदा न राहून एका राजाने उडुपिच्या राजनला विचारले, “राजन आपण इतके प्रमाणात कसे भोजन बनवता?? आम्हाला माहितही नसते कधी कुणाचा मृत्यु झाला. कितीजण जिवंत आहेत. आपणाला हे प्रमाण कसे ज्ञात होते.??” राजा हसला आणि म्हणाला, “ रोज रात्री मी भगवान श्रीकृष्णाच्या शामियान्यात जातो. श्रीकृष्णाला रात्री उकडलेले शेंगदाणे खायला खूप आवडतात. त्यांना मी रोप्ज रात्री शेंगादाणे उकडून, सोलून  भरलेले भांडे नेऊन देतो. त्यांचे खून झाले कि मी त्या भांड्यातील शेंगदाणे मोजतो. जर श्रीकृष्णांनी दहा दाणे खाल्ले असतील तर, मी दहा हजार लोकांचे भोजन कमी बनवतो.” उदुपिच्या राजाने सांगितलेले ऐकून साग्क्यांना श्रीकृष्णाच्या मायेवर अधिकच विश्वास बसला. “करत करविता फक्त तोच आपण निमित्तमात्र याची अनुभूती आली.”