प्रकरण तिसरे - लोणावळा
आज ते लोणावळ्याला फार्महाऊस बघायला आले होतो. अश्विनीला नेहमीच एक असं फार्महाऊस हवं होतं. हिल टॉपला..! दोन बाजुला मस्त गर्द झाडी आहे. एका बाजुला सुर्य उगवताना दिसतो. मावळताना मात्र तो त्या दुरवर असणार्या कड्यांच्या मध्ये जातो. हे असं चित्र आम्ही फक्त पुस्तकात आणि ईंटरमिजेटच्या परिक्षेत पाहिलं होतं. हे फार्म हाऊस जरा सायमाळच्या जंगलात होतं. तसं आजुबाजुला दोन बंगले होते एक वझेंचा आणि दुसरा कदमांचा. ते दोन्ही परिवार फक्त शनिवार रविवार येत होते. त्यामुळे त्यांच्या घरात रहाणारी वॉचमनची फॅमिली हाच काय तो शेजार होता. शंतनु पण विकेंडलाच यायचं म्हणत होता.
"अरे सुधाकर, काय मस्त मेंटेन ठेवलंय ना घर?" अश्विनी म्हणाली.
"अगं मी मागच्या आठवड्यात रखमाला सांगुन स्वच्छ करुन घेतलंय..! आम्ही हे रिसेल मध्ये घेतलं ना.. आमचे फॅमिली डॉक्टर आहेत ना त्यांचा आहे. ते जाणार आहेत लेकाकडे अमेरिकेला कायमचे."
आत किचन दाखवताना मिता म्हणाली.
"मला म्हणाले माझ्या घराची आपल्या पोटच्या पोरासारखी काळजी घेणारी फॅमिली हवी. मी खुप कष्ट घेतलेत या घराला सजवायला..!!"
मिता सांगत होती. अश्विनीने वळुन घर पाहिलं
" हो खरच गं..! हे असं डिझाईन कोण करतं आज काल...?? पण तुम्हाला नाही सुट करंत जरा जुनं झालंय. इतके वॉलपेपर त्याकाळात म्हणजे चिक्कार पैसा खर्च केलाय तुझ्या डॉक्टरांनी..!!"
भिंतींवरुन हात फिरवत अश्विनी म्हणाली.
"हे बघ ईथे ना मी एक छत्री लावणार अाहे आणि त्याबरोबर चार पाच खुर्च्या. आपल्याला पार्टी करायला रे..!" शंतनु खुपच उत्साहात सुधाकर ला सांगत होता.
"हि बघ त्या डॉक्टरांनी कशी फुलांची बाग केली आहे. भारीच काळजी घ्यायचे. जैविक खत घालायचे हो. आम्हाला पण दिलेलं एकदा. पण आमच्या मिताला त्याच्या वासाने उलटी आली त्यामुळे तिने मला तडक जाऊन फेकायला सांगितले. मी काय पडत्या फळाची आज्ञा. पण ते खत घातलं असतं तर आज अामचा पण गुलाब असाच डवरला असता हो कि नाही रे..??"
शंतनुची आपली अविरत बडबड चालु होती. जेवणाची वेळ झाली.
"काय मग झालं का प्लॅनिंग कुठे काय ठेवायचं..?? " सुधाकरने अश्विनीला विचारलं.
"हो अगदीच... जे ठेवणार त्याचा रंगही ठरला हो...!" मिताने चिडवण्याच्या स्वरातच उत्तर दिलं