प्रकरण चौथे - परतीचा प्रवास
सुधाकर या विचारात खुश होता की,
"आपलं नसु दे पण जवळच्या मित्राचं फार्महाऊस झालं म्हणजे आपल्याला वेगळं घ्यायला नको.!" अश्विनीच्या मनातही विचारचक्र चालु होती,
"मिता सारखं आपलंही फार्महाऊस हवं. फार मोठं नको पण हवं ना ? विचारु का सुधाकरला..??"
"मी काय म्हणतो तु कधी काम चालु करणार अश्विनी?" शंतनुच्या प्रश्नाने अश्विनीची तंद्री तुटली.
"येत्या गुरुवार पासुनच करु म्हणते. असंही मंगळवारी त्या जेठमलानीच्या कामाला पुर्णविराम देणार आहे. नाहितर तिचं काम कधीच संपणार नाही." अश्विनी म्हणाली.
"अगं आणि साधारण बजेट काय होईल गं??" मिताने विचारलं.
"तु आज ज्या रिव्कायरमेंट दिल्यास, त्यानुसार पाच लाखात व्हायला हवं." अश्विनीने सांगितलं.
"पाच लाख काय चांदिचा मुलामा देताय का आतुन..??" सुधाकर म्हणाला.
"अरे ते जुने वॉलपेपर काढायलाच जास्त पैसे घेतील कामगार. हो ना अशु...?" मिताली म्हणाली.
"मी काय म्हणत होतो...!" शंतनुने विषय बदलला. "गुरुवार पासुन काम करत असशील तर आम्ही सगल सुट्टी काढतो. काय सुधाकर? "
"मला काहीच हरकत नाहिये. मी ही थकलोय आता रुटिनला..!" सुधाकर म्हणाला.
"ठरलं तर गुरुवारी शार्प सकाळी सहा वाजता तयार रहा..! तुझे कामगार कधी येतील..??" शंतनुने विचारले.
"सकाळी दहा वाजता पोहोचतील साईटवर आणि माझा मित्र पण येईल. त्याचेच कामगार आहेत ना..!" अश्विनी म्हणाली.
सगळे घरी पोहोचले. आता उद्यापासुन परत तेच रुटीन.