शतदा प्रेम करावे.....!!
"या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे"
या ओळी जगण्याचे सार सांगून जातात नकळत या शब्दांमधेच शंभरी गाठण्याचे वचन घेतले जाते. आयुष्य खूप सुंदर आहे अशा आशयाचे अनेक सुविचार सतत अवतीभवती बोलले जातात पण कधी कधी वाटते खरच नुसतं बोलणं कृती यात फरक तर आहेच ..
आता हेच बघा ना ,एखाद्या ला माझ्या या रोजच्या नकळत सहजच सुचलेल्या याष लेखरुपी वाचाळतेत नुसतं शब्दांच गाठोडे सोडतीये मी असचं वाटत असेल.... हो पण शंभरात एखादी व्यक्ती जरी वाचून आनंदीत झाली हे माझ्या च मनातील शब्दांच गाठोडं सोडल्याचं समाधान हीच पावती .. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हा मानस ठेवत काही तरी सकारात्मक ताच देण्याचा माझा माझ्या साठीचा विचार असतो तो तुमच्या पर्यत पोहचवण्याचा प्रयास इतकेच..हो ,तर मी या शतदा प्रेम करावे विषयी मांडत होते
जगण्याला मृत्यूचा शाप असतोच मृत्यूचे स्वागत करा असे कुणालाच वाटत नसते ..पण या अशा मृत्यूला सन्मान देण्याचे काम नुकतेच इच्छामरण"या निर्णयाने दिले . खरतरं अरुणा शानबाग यांनी गेली पंचेचाळीस वर्षे मृत्युशी झुंज देणाऱ्या या गोष्टीने हा इच्छामरणाचा निर्णय झाला व्यक्ती सापेक्षता ही यात असूच शकते.
कृतार्थाने आयुष्याच्या संध्याकाळी याची देहा याची डोळा मोक्ष मिळवा तर दुसरीकडे शारिरीक यातना असह्य झाल्यामुळे पत्करलेली शरणागती तर नसेल अजून काही राहिलं तर नाही ना ही हुरहुर करणारा विचार मृत्यूच्या कवेत घेण्याच्या क्षणी काय बळ देईल असे अनेक विचार येवून जातात.
न्यायालयाने" इच्छामरणाचा "मार्ग मोकळा केला खरे तो योग्य कि अयोग्य कि केवळ एक विकल्प हाही विचार ..इच्छामरणावर अनेक वर्षे वेगवेगळी मत्यांतरे मंथन झालेले दिसते. पण नुकतेच " जगण्याच्या सन्मानाचा हक्क" हे पुस्तक वाचनत आले ...इच्छामरण खरेच योग्य का? प्रत्येकाने सन्मानाने आयुष्याचे मार्गक्रमण केले नसेल कुणाला आर्थिक विवंचना मृत्यूला झुंज देण्याबाबतीत अडथळा वाटत असतील तर कुणाला एकाकीपणाचा कंटाळा तर कुणाला कृतार्थता वाटून आता बस्स ही भावना होवून मृत्यूला सामोरे जाण्याची ओढ म्हणजे इच्छामरण हवे असेल ...पण विज्ञानयुगात अशा विचारांना जवळ करणे थोडे नकारात्मकच वाटते . जैविक वैज्ञानिक तंत्रज्ञानाने बरीच प्रगती केली असताना इच्छामरण किंवा दयामरण स्वीकारणे कितपत योग्य ....व्यक्ती सापेक्षता आहेच फक्त न्यायालयाने त्यावर आपली मोहोर उमटवली अन् इच्छामरणाचा मार्ग खुला केला अनेक स्वातंत्र्याबरोबरच इच्छामरणाचे स्वातंत्र्य या लोकशाहीत प्राप्त झाले अन् माणूस ख-या अर्थाने स्वतंत्र झाला.
पण पुढे याच जन्ममृत्यूच्या फे-याचा विचार अध्यात्माच्यादृष्टीने केला तर ...जन्माची चाहुल आपल्याला कळते पण मृत्यूचे येणे आकस्मिक असते यातील आश्चर्य ही संपले का ? या निर्णयाने असा विचार आला आता सगळ्याच शक्यता आपण आपल्याच हातात घेत तर नाही ना !! मग एक शक्ती जिने विश्व संकल्पना पूर्ण होते त्याचे काय? कदाचित सृष्टी निर्माण करणारा परमेश्वर ज्याने जन्माचे मूळ दिले तो....पुढे विज्ञानाचा आधार घेतप्रगती करत शोध लावणारा तो शास्त्रज्ञ ज्याने मृत्यूलाही जिंकले तो परमेश्वराचेच एक रुप, "मातीत जन्मले मातीत मिसळले हा प्राकृत सिद्धांत इच्छामरण निर्णयाने शाश्वतच राहील तत्व नेहमी चिरंतन असतात हा मूळ विचार.
इच्छामरण " सामाजिक राजकीय भाषेत वेगळे संदर्भ देईल मात्र अध्यात्मपातळीवर, ही संकल्पना जगण्याचा सन्मान करा हेच सांगेल.इच्छामरण मृत्यूलाही सन्मानित करेल असा मध्य साधता येईल.निर्णय विचाराधीन स्वागतार्ह नक्कीच पण पुन्हा एकदा आत्मसुखाचाच विचार करायला लावणाराच इच्छामरणाचा निर्णय ठरेल.
मग वृद्धांश्रमाप्रमाणेच अशी इच्छामरणाची इच्छा व्यक्त करणाऱ्या किंवा कोटुंबिक अवहेलनेमुळे दुर्लक्षतेमुळे वा कृतार्थतेमुळे अशा सर्व ज्येष्ठांसाठी आपलं असं हक्काचे घर निरोपांच्या क्षणांची वाट बघणारं अशी संकल्पना हे घर रुजवेल जिथे शेवटच्या क्षणी आपल्या सारख्या इच्छामरणाच्या भावना व्यक्त करणारी जागा मिळेल ही संकल्पना रुजू लागेल. असा विचार माझ्या मनात आला .
इच्छामरण योग्य कि अयोग्य याला अजून पैलू आहेत ते उलगडायला हवेत ही सकारात्मक संकल्पना रुजवणे त्या विधात्याच्या भाकीताला सार्थ करेल मानवी मनाला उभारी येण्याचे बळ मिळेल . इच्छामरण स्वेच्छामरण दयामरण याचे अर्थ सामान्य माणसांपर्यत उलगडायला हवेत कारण कायदा मनाला ओळखत नाही पण या निर्णयाबाबतीत उलट बोलावे लागेल मनाचाही विचार कायद्याने केला .
सन्मानाने जगलेल्यांना आपले कुणाला ओझे वाटू नये अगदी मृत्यूलाही सन्मानाने सामोरे जाता यावं अशी मुभा देवून मृत्यूलाही जिंकण्याचे समाधान या इच्छामरणाने मिळेल का??? असा प्रश्न आहेच...
या जन्मावर जगण्यावर शतदा प्रेम करावे.....!!म्हणत आता मृत्यूवरही प्रेम करायला शिकायला हवे .
यशस्वीततेतही भावनांकाचा वाटा महत्वाचाच याचा विचार असला तरी यश मिळूनही आत्महत्या का होते ?? हा भावनांकावर मात ,स्विकार करता येणं, अपेक्षा न ठेवणं ब-याच गोष्टी चा विचार होतो तो वेगळ भाग ताजे उदाहरण डोळ्यासमोर...म्हणून बोलले आपण इच्छामरण अन् यात फरक आहे ...हेच सांगूयात शेवटी सगळे आपल्याच हाती ?? ...
स्वत: दूर राहून स्वत:ला साक्षीभावाने पाहण्याचा मार्ग स्विकारणे आपल्याला कठिण वाटते. त्यापेक्षा परमात्मा , तो माझ्या प्रत्येक कृतीकडे पाहातो, असा भाव धारण करता आला तर हळु हळु सगळीकडे ईश्वरतत्वच. त्यामुळे प्रत्येक घटना ही नवीन घटना, प्रत्येक दिवस हा नवीन दिवस, आनंदाचा प्रत्यय देतोच.
सहजच सुचलेलं मांडलं ...
व्यक्ती सापेक्षतेचा सन्मान
© मधुरा धायगुडे