रामाचा जन्म
भगवान श्रीरामांचा राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या पोटी जन्म झाला.
कौशल्याचा अर्थ कुशलता आणि दशरथाचा अर्थ ज्याच्याकडे दहा रथ आहेत असा होतो. आपल्या शरिरात दहा अंग आहेत. त्यातले पंचेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय आहेत. ज्याचे या दहा इंद्रियांवर अधिपत्य आहे असा दशरथ. सुमित्रा म्हणजे जिच्या ठायी सदैव मैत्रीभाव आहे. कैकेयी म्हणजे जी निस्वार्थपणे आपले प्रेम देते. या दशरथाच्या तीन पत्नी अयोध्येत रहात होत्या. त्यांना अनेक वर्षे संतानप्राप्ती झाली नव्हती. ते एक दिवस एका ऋषींच्या आश्रमात गेले. ऋषींनी राजा दशरथाला आणि त्याच्या तीन भार्यांना प्रसाद दिला. तो प्रसाद कौशल्या, सुमित्रा , कैकयी यांनी ग्रहण केला. ईश्वराच्या कृपेने कौशल्येला राम, कैकयीला भरत झाला. असे सांगितले जाते की सुमित्राने प्रसाद दोनवेळा ग्रहण केल्याने तिला लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे दोन पुत्र झाले.
या चारही भावंडांचे एकमेकांवर प्रेम होते. राम म्हणजे स्वयंम प्रकाश, भरत म्हणजे योग्य, लक्ष्मण म्हणजे सजगता आणि शत्रुघ्न म्हणजे ज्याचे कुणीही शत्रु नाहीत. ज्या ठिकाणी यांचा जन्म झाला.त्याठिकाणाच्या नावाचाही एक अर्थ आहे. अयोध्या म्हणजे जे ठिकाण कधीही नष्ट होऊ शकत नाही.