रामायणाचा तर्किक विचार
रामायण आपण नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने पाहिले आहे. कधी रामानंद सागार यांचा अरुण गोयल यांनी केलेला राम पाहिलाय. कधी ग.दि माडगुळगरांच्या गीतरामायणातुन समजलेला राम ऐकलाय. कधी कधी कोकणात रामनवमीला पाहिलेला कोकणी राम. तर कधी बनारसच्या घाटावर फिरणारा चिमुरडा राम. आता देशात राम मंदिराचाही मुद्दा फार जोर धरुन आहे. ज्या ठिकाणी बाबरीचा ढाचा जबरदस्तीने बांधला गेला होता. तेथे आता हक्काचे राम मंदिर होणार आहे. रामायण पाहिले, अनेक राम पाहिले परंतु आपण रामायणचा अर्थ काय समजलो आहोत हा प्रश्न आहे.
चैत्र शुद्ध नवमीला रामाचा जन्म झाला. लहान असताना रामाने आकाशातला चंद्र मागितला. तेंव्हा महालात कुणालाही काय करावे कळले नाही. तेंव्हा कैकयीने आपल्या दासीला एक मोठी परात आणायला सांगितली. तिने त्यात पाणी भरले आणि चंद्राचे त्यात पडलेले प्रतिबिंब पाहुन चिमुकल्या रामाला आनंद झाला. त्याचे हसु पाहुन महालात सगळे आनंदित झाले. लहानपणापासुनच राम सगळ्यांचा लाडका होता. हे सगळे आपल्याला माहिती आहे. पुढचे रामायणही माहिती आहे.
आपण सगळ्यांनी रामायणाची दुसरी बाजु कधी विचारात घेतली आहे का??
भगवान श्रीराम यांना वनवासात जायचे होते तर ते सरळ चालत चालत किंवा त्याकाळच्या वहानाने एखाद्या जवळच्या वनराईत गेले असते. त्याकाळी नेपाळ, चीन, बांग्लादेश येथे खुप घनदाट वन होते. परंतु राम, सीता, लक्ष्मण हे तिघे त्याकाळी प्रयाग (प्रयागराज/इलाहबाद, यु.पी), चित्रकुट (मध्यप्रदेश), दंडकारण्य (बस्तार, छत्तीसगड), पंचवटी (नाशिक, महाराष्ट्र) ह्या मार्गाने पंचवटीमध्ये शेवटी थांबले. ते नेपाळ. नैऋत्येतल्या राज्यात गेले नाही कारण तो प्रभाग दशरथाच्या राज्याचाच एक भाग होता. या उपर त्यांनी दक्षिणेस प्रस्थान केले. हे तिघे चालत चालत अयोध्येतुन नाशिक पर्यंत आले. राम हा विष्णु अवतारातील संपुर्ण मानव अवतार आहे असे मानले जाते. परशुराम ही होते असे म्हणतात. पण परशुराम नेहमी वनात राहिले आणि त्याचे शस्त्र परशु म्हणजेच एक मोठी कुर्हाड होते. तसं पाहिले तर त्यांनी कधीही गृहास्थश्रमाचा उपभोग घेतला नाही. त्यामुळे राम हा संपुर्ण मानव अवतार आहे असे म्हणु शकतो. श्रीरामचे शस्त्र धनुष्यबाण हे होते. मानवाची उत्क्रांती ही त्याने वापरलेल्या शस्त्रांवरुन कळते. मनुष्यप्राणी हा स्वतःच्या जमिनीच्या मालकिविषयी जरा जास्तच हव्यासी आहे. त्यातुनच पुढे त्याच्या वंशजासाठी धन दौलत किंवा जमिन जुमला राखला जाणे हे येते. परशुरामांना वंश, संपत्ती याचा हव्यास नव्हता म्हणुन त्यांना वनमानव म्हणने चुकिचे ठरणार नाही. त्यामुळे राम हा संपुर्ण मानव अवतार होता. त्यामुळे त्याला आपले राज्य पुढे वाढवण्याची ईच्छा असणे रास्त आहे.
रावण लंकेत दक्षिणेला राहात असल्याने त्याचे उत्तरेतील राज्याकडे दुर्लक्ष होत असावे. रामाचे असे फिरत फिरत जाणे कदाचित रामाच्या राज्याचा विस्तार करण्यासाठी रयतेची माहिती करत जाणे असेल. वनवास हे केवळ एक कारण असेल. जी आई आपल्या मुलापेक्षा रामावर जास्त प्रेम करायची ती राज्यासाठी त्याच मुलाला महालातुन काढुन टाकेल का??? हा कदाचित आपले राज्य दक्षिणेकडे वाढवण्याचा एक प्रयत्न असावा. रामाचे युग हे त्रेता युग होते. या काळात संपत्ती आणि राज सिंहासनासाठी होणारे वाद वाढिस आले होते. त्यामुळेच वाली आणि सुग्रीव यांच्यात युद्ध झाले. विभिषण आणि रावण यांच्यात मतभेद होते. एखादे राज्य जेव्हा राजा बळकावतो तेंव्हा साम दाम दंड भेद यातील काही शस्त्रे वापरतो. यालाच राज्यनिती म्हणतात. त्यामुळे रामाही काहीसे असे करुन प्रत्येक राज्यातील राजाचा विश्वास जिंकला असावा.
रावणाने सीतेचे अपहरण केले. त्यामुळे पुढे लंका दहन, लंकापति रावणाचा वध हे सगळे झाले.
राम नवमी निमित्त काही रामायणाचे भाग असेही असु शकतात का? हा विचार मनात येतो. रामायण आपण ऐकले आहे पण किती वेळा विचार केला आहे की खरच राम उगीच इतक्या लांब येईल का?? रामाने दक्षिणेलाच का प्रस्थान केले?? रामाच्या शब्दाबाहेर लक्ष्मण कधीही नव्हता तरीही रामाने त्याला येण्यासाठी विरोध का केला नाही?? राम पुष्पक विमानाने अयोध्येला अवघ्या वीसच दिवसात परतला म्हणजे त्याकाळी भारतात विमान होते का ?? ह्याची उत्तरे आपल्या रामायणातच मिळतील ती फक्त आपण शोधायला हवी. बोला सिया वर रामचंद्र की जय...!!