Get it on Google Play
Download on the App Store

प्रसंग 11

फ्लॅशबॅक

Ext. मोकळी जागा. प्रसंगाची वेळ 5pm. ( सायंकाळ.)

( अशोक व एक बिल्डर अशा दोघांमधे घरासाठीच्या लोनवरून संवाद चालू आहे, दोघे ऊभे राहून बोलत आहेत.)

बिल्डर काय मग आं, काय करायचं म्हणले तुम्ही?

( बिल्डर थोडा पुढे आणि अशोक त्याच्या थोडा मागे ऊभा असतो, हे बोलल्यावर अशोक बिल्डरच्या समोर येत बोलतो.)

अशोक ते वन बीएचके चा प्लॅन घ्यायचा चाललायं, तर...

( अशोक चं बोलण अर्धवट तोडत मधेच तो.)

बिल्डर हां तर, मी काय करू? मी काय फुकट देऊ तुला? आं...
( स्वत:च हसायला लागतो.)

अशोक नाही तसं नाही.

बिल्डर मग कसं? तुझ्यासारख्या माणसानं थेट आभाळ हेपलायची स्वप्न पाहू नयेत रे, आं लक्षात येतयं का?

अशोक खरयं तुमचं पण मग माझं म्हणणं तर ऐका.

बिल्डर तुझं म्हणणं आधीच कळालयं मला, तुला बॅंक नाही म्हणली, तुला दुसरीकडून लोन पण भेटनायं सध्या... तर मग इकडं आलायं तर एका अटीवर देऊ शकतो मी तुला पैसे पण मग...

अशोक पण? काय कसली अट? मी मान्य करेल, ते वन बीएचके खुप मोठ्ठ स्वप्नयं, त्यासाठी करेन की...
( जरासा खुश झाल्याच्या स्वरात बोलतो.)

बिल्डर आम्ही पैसे देऊ लोनवर, पण जमिन गहाण ठेवावी लागलं.

अशोक जमीन?
( चेहऱ्यावर प्रश्नार्थक आट्या.)

बिल्डर हो जमीन. आहे का एखादी स्वत:ची, असेल तर गहाण ठेव आणि पाहिजे तेवढं लोन घेऊन जा.

अशोक जमीन, साॅरी नाही जमणार, येतो मी. बघतो काहीतरी.

बिल्डर हो याच तुम्ही.
( बिल्डर नमस्कार करतो. अशोक निघून जातो. तो जाताना बिल्डर.)

बिल्डर दहा रूपयाचे चणे खायची औकात नाही, आणि वन बीएचकेची स्वप्न, व्वा.

            प्रसंग समाप्त