Get it on Google Play
Download on the App Store

प्रसंग 19

फ्लॅशबॅक

आतल्या बाजूस. एक रूम. प्रसंगाची वेळ 9am. ( सकाळ.)

( रवी न नाष्टा करता तसाचं जातो, कशानेतरी तो रागावल्याची प्रचिती रमाला येते.)

रमा अहो, नाष्टा टाकलायं करूनच जा आता.
( रमाने गॅसवर उपमा/पोहे बनवायला ठेवलेत.)

अशोक हो, मी आणि रवी आता सोबतचं करतो.

सुमन (रवीची बायको) आत्या मी केला असता, तुम्ही कशाला?

रवी हो ना, करू दिला असतासं आई तिलाच.
( रवी चा चेहरा थोडासा पडलेला आहे.)

रमा अरे नाही, नवीन आहे ती. हळूहळू करेल की पुढं चालून.

अशोक हो आणि सुमनला तिला हवं ते ती करू शकते या घरात, बंधन नाही.

सुमन माझ्यासाठी चांगलच आहे हे.

रमा रवी नाष्टा करून घे, तुलाही निघायचं असेल कामाला.

रवी मला नाष्टा नको, तुम्ही करा.

रमा अरे थोडा कर की नाष्टा, कशाचा राग आलायं का तुला?

रवी नाही आला राग, नको मला नाष्टा, मी निघतोयं मला उशीर झालायं आज.

( रवी निघून जातो आणि रमा त्याला तशीच पाहत राहते.)

            प्रसंग समाप्त