Get it on Google Play
Download on the App Store

प्रेक्षकांना हसवा.

प्रेक्षकांना हसवणे हा श्रोत्यांना आणि वक्त्याला आराम मिळण्याचा एक चांगला मार्ग आहे.  बराच वेळ चालू असलेले भाषण एका काळानंतर कंटाळवाणे होते.

ते टाळण्यासाठी तुम्ही मध्ये मध्ये विनोद निर्मिती करा. याने वातावरण हलके होईल आणि भाषणाच्या सुरूवातीस विनोद सांगणे हा एक चांगला आइसब्रेकर असू शकतो.

आईसब्रेकर म्हणजे आपण कशी सुरुवात करायची असा संभ्रम असताना उचललेले पहिले पाउल. भाषण चालू करण्यापूर्वी आपल्या विनोदांच्या वेळा आणि वितरणाचा सराव करा. हे भाषण आपल्या मित्राला किंव्हा मैत्रिणीला ऐकवा आणि त्यांचा अभिप्राय विचारा.

आपण सुरुवात करण्यापूर्वी ते विनोद आपल्या विषयासाठी योग्य आहेत का? याची खात्री करा. 

आपले भाषण आपल्यालाच माहिती असते. तरीही त्यात काही चूक झाली कि आपल्याच गडबडण्यावर स्वतःच एक स्मित हास्य करा.

आपले सहकारी किंवा श्रोते आपल्याला एक वाकचातुर्य असलेला मनुष्य आणि विनोदी वक्त्याप्रमाणे समजतील.

असे केल्यामुळे आपल्या म्हणण्याकडे अधिक लक्ष वेधले जाईल.