Get it on Google Play
Download on the App Store

ऑडिओ व्हिज्युअल (दृक-श्राव्य)

आजकाल अनेक जण भाषणाच्या किंवा सादरीकरणाच्या सुरुवातीला दृक-श्राव्य फिती लाऊन  प्रेक्षकांशी आपला  थेट संवाद करण्याचा संबंध तोडून टाकतात. तुमच्या भाषणाच्या किंवा सादरीकरणाच्या थोड्या वेळाने दृक-श्राव्य फितींचा वापर करा. प्रेक्षकांना  किंवा श्रोत्यांना तुमच्या विषयाशी एकरूप होण्यासाठी थोडा वेळ द्या.

मग आपलं साहित्य बाजूला ठेवून दाखवलेल्या चित्रफितीवर स्पष्टीकरण द्या. याने तुम्ही दृक-श्राव्य फितीत गुंतलेल्या आपल्या प्रेक्षकांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेता.

नेहमी लक्षात ठेवा कि चांगले भाषण किवा संवाद असे काही अस्तित्वात नसते. आपले भाषणं कधी परिपूर्ण असू शकत नाही. आपण इतकीच काळजी घ्यावी कि ते सगळ्यांना आवडले पाहिजे. आपण परिपूर्ण असल्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. आपण आपल्या श्रोत्यांपर्यंत विषय पोहोचवू शकलो कि आपले भाषण परिपूर्ण होते.

सगळ्यांचे परिपूर्णतेचे ठोकताळे वेगवेगळे असतात.  तथापि, स्वतःला तयार करण्यासाठी आवश्यक वेळ देणे तितकेच महत्वाचे आहे. हे आपणास चांगले भाषण देण्यास मदत करेल. सगळ्यात महत्वाचे  म्हणजे आपल्या भाषणाच्या 

"आपण सगळ्यांनी मला आणि माझ्या टीमला तुमचा अमुल्य वेळ दिला आणि तुमच्या टाळ्यांचा कडकडाट देत आहात ही एक भेट आहे. मी आपला कृतज्ञ आहे." 

असे म्हणून भाषणाची सांगता करा.

तुमच्या भविष्यासाठी बुकस्ट्रककडून शुभेच्छा....!