Get it on Google Play
Download on the App Store

ओला इलेक्ट्रिक स्कूटर

ओला इलेक्ट्रिक स्कूटर

ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीची स्थापना २०१७ मध्ये ओला कंपनीने केली. मार्च २०१९ रोजी ओला इलेक्ट्रिक एक संस्था म्हणून बंद झाली होती, संस्थापक भविश अग्रवाल यांनी ओला इलेक्ट्रिकमधील मूळ कंपनीचा हिस्सा विकत घेतला. ओला इलेक्ट्रिकने जुलै 2019 मध्ये सीरीज बी राउंड फंडिंग दरम्यान सॉफ्टबँकमधून २५० दशलक्ष डॉलर्स उभारले आणि १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्य मिळवले. ओला इलेक्ट्रिकने २०२० मध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची स्वतःची उत्पादन कार्यप्रणाली सुरू करण्यासाठी २७ मे २०२० रोजी अॅमस्टरडॅम स्थित ई.वी स्टार्टअप इटेर्गो विकत घेतले. 

डिसेंबर २०२० मध्ये, कंपनीने तामिळनाडूमध्ये तमिळनाडू सरकारसोबत निवेदन स्वाक्षरी केल्यानंतर तमिळ २,४०० कोटी (यु.एस $ ३४० दशलक्ष) खर्च करून तामिळनाडूमध्ये आपला उत्पादन प्रकल्प उभारण्याची योजना जाहीर केली. जानेवारी २०२१ मध्ये त्याने पोचमपल्ली येथे पाचशे एकर जमीन खरेदी केली. कारखान्याचे बांधकाम फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झाले. तामिळनाडूच्या कृष्णागिरी जिल्ह्यातील पोचमपल्ली शहरात हा कारखाना ५०० एकर मध्ये पसरलेला, पूर्णपणे स्वयंचलित कारखाना आहे, कंपनीचा दावा केला होता की हा १ कोटी युनिट वार्षिक उत्पादन क्षमता असलेला जगातील सर्वात मोठा दुचाकी कारखाना असेल. ओला फ्यूचरफॅक्टरी नावाच्या कारखान्याने १५ ऑगस्ट २०२१ रोजी आपली पहिली इलेक्ट्रिक दुचाकी तयार केली. 

या कारखान्यात १० रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या एस १ आणि एस १ प्रो या दोन मॉडेल्सची निर्मिती होते. ऑक्टोबर २०२१ पर्यंत प्री-ऑर्डर दिलेल्या ग्राहकांना वाहने देण्यास सुरुवात केली जाणार आहे.

ओला इलेक्ट्रिकने १५ ऑगस्ट रोजी भारतात आपले पहिले इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची तयारी करत असल्याचे घोषित केले होते. ज्या ठिकाणी हे इलेक्ट्रिक स्कूटर तयार केले जातील ते कारखानाही पूर्णत्वाच्या जवळ आहेत अशी ट्वीट केली होती. ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भविश अग्रवाल यांनी ट्विटरवर कारखान्याची स्थिती शेअर केली जी ओला फ्यूचरफॅक्टरीची प्रतिमा दर्शवते.

"ग्राउंड झिरो!" असे अग्रवाल यांनी लिहिले शिवाय त्यांनी भविष्यातील कारखान्याची प्रतिमा सोशल मीडियावर शेअर केली. त्यांचे ट्विट स्वातंत्र्यदिनी देशात ओला इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणायचे आहे. हे उघड केल्यावर काहीच दिवसानंतर स्कूटर्सचे बुकिंग जुलैच्या अखेरीस ४९९ रु. मध्ये चालू करण्यात आले होते. ई-स्कूटरची किंमत १ लाखांपेक्षा कमी असणे अपेक्षित होते.

ओला इलेक्ट्रिक भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची तयारी करत होते.

या वर्षाच्या सुरुवातीला, ओला इलेक्ट्रिकने जाहीर केले होते की कंपनी 500 एकर क्षेत्रावर मेगा फॅक्टरी बांधत आहे. दुचाकींसाठी जगातील सर्वात मोठा उत्पादन प्रकल्प विकसित करण्यासाठी डिसेंबरमध्ये तामिळनाडू सरकारसोबत ₹ २४०० कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. प्लांटसाठी भूसंपादन या वर्षी जानेवारीमध्ये पूर्ण झाले आणि बांधकामाचे काम फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झाले.

इलेक्ट्रिक स्कूटर प्लांटचा पहिला टप्पा लवकरच सुरू झाले. कारखाना विक्रमी वेळेत कार्यान्वित करण्यासाठी 10 दशलक्षाहून अधिक कार्यरत तासांचे  नियोजन करण्यात आले, अशी माहिती कॅब-एग्रीगेटर बनलेल्या ईव्ही मेकरने दिली होती. कारखाना सुरुवातीच्या टप्प्यात २० लाख इलेक्ट्रिक स्कूटर आणू शकेल. ही मेगा फॅक्टरी ओलाचे जागतिक उत्पादन केंद्र म्हणून काम करेल. इलेक्ट्रिक दुचाकींच्या श्रेणीसाठी जी संपूर्ण भारतात विकली जाईल आणि युरोप, यू.के., लॅटिन अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात केली जाईल.

ओला कारखाना भारतातील सर्वात मोठा स्वयंचलित कारखाना असल्याचा दावा केला जातो कारण ते ओलाचे स्वतःचे ए.आय. इंजिन आणि टेक स्टॅकद्वारे समर्थित असेल. जे सर्व कारखाना कार्यात केले जाईल. कारखाना पूर्णपणे चालू झाल्यावर सुमारे पाच हजार रोबोट आणि स्वयंचलित मार्गदर्शित वाहने तैनात केली जातील. पुढे, कंपनीचा दावा आहे की उद्योग ४.0 तंत्रज्ञानाचा समावेश असूनही कारखाना १०००० लोकांना रोजगार निर्माण करेल.