वैशिष्ट्ये
ओला एस १ तसेच ओला एस १ प्रो यांना
ऑल-एल.ई.डी. लाइटिंग सिस्टीम,
३६ लिटर अंडरसीट स्टोरेज,
स्मार्टफोनसह टी.एफ.टी. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर,
ब्लूटूथ,
वायफाय आणि जी.पी.एस. कनेक्टिव्हिटीसह सुसज्ज आहेत.
इतर उल्लेखनीय मानक वैशिष्ट्यांमध्ये
साईड-स्टँड-डाउन
अँटी-थेफ्ट (चोरी) अलर्ट
जिओ-फेन्सिंग
रिव्हर्स मोड
गेट होम मोड
टेक मी होम लाइट्स
लिम्प होम मोड यांचा समावेश आहे.
एस 1 प्रो प्रकार हिल-होल्ड फंक्शन, व्हॉईस असिस्टंट आणि क्रूझ कंट्रोलसह येतो. ही ई-स्कूटर अनेक प्रोफाइलसह येते, आणि पेट्रोल-चालित स्कूटरचे अनुकरण करण्यासाठी रिव्हॉल्ट आरव्ही ४०० मधील वैशिष्ट्यपूर्ण एक साउंड सिस्टमही लावण्यात आली आहे.