Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण ३

रात्र निघून जाते सकाळ होते पण वाड्यातली ही सकाळ म्हणावी तशी प्रसन्न नसते.दरवाज्यावरच्या खटखट आवाजाने निलेश दचकून जागा होतो. रात्री चा प्रसंग त्याला आठवुन त्याला आणखी घाबरायला होत. पुन्हा तो खटखट असा आवज येतो.  निलेश थरथरत सगळ्यांना उठवतो.

निलेश: ए अभ्या ,अम्या, सम्या उठा रे बाहेर दार कोणी तरी वाजवत आहे.

तिघेही झोपत असतात.

अमोल: निल्या जा तू उघड दार..

निलेश: ( घाबरत) नाही मी एकटा खाली नाही जाणार तुम्ही सगळे खाली चला. अभ्या ,सम्या उठा .

शेवटी वैतागुन ते उठतात.आणि खाली येतात.


बैठकीच दार उघडून बघतात तर जनाकाका आलेले असतात. त्यांना बघून निलेशच्या जीवात जीव येतो.जनाकाका आत येतात.
निलेश: हुश्श काका तुम्ही आहात मला वाटलं..

जनाकाका:काय वाटलं अन तुम्ही त लय घाबरलेले दिसता ?.काही घडलं व्हय रातच्याला?  झोप लागली न व?

अमोल: हो काका नीट झोप लागली आम्हाला आणि काल रात्री एक काळी मांजर आली होती बस बाकी काही नाही .तिलाच निल्या घाबरला तो तसही फार भित्रा तुम्ही लक्ष नका देऊ.

जनाकाका: बरं पोरांनो लवकर लवकर आटपा म्या चहा अन नाश्ता आणला हाय तुमच्यासाठी

चौघेही पटकन फ्रेश होऊन येतात आणि चहा नाश्ता करतात.

समीर: काका  आम्ही आज चिखलदरा जायचा विचार करतो आहे संध्याकाळी परत येऊ.

जनाकाका: व्हय चालत की, तुम्ही फिरून या समधं पण गाडी दमान चालवसाल कारण घाटाचा रस्ता हाय म्हणून म्हणलं.

समीर : हो काका आम्ही सावकाश जातो.

 
पटापट अंघोळी आटपून चौघे चिखलदरा जाण्यासाठी निघतात .दिवस तर धमाल करण्यात आणि निसर्ग पाहण्यात जातो. परतायला जवळपास रात्रीचे नऊ वाजतात बाहेरच जेवण करून ते येतात. पुन्हा तो भयाण वाडा पाहून उदास वाटायला लागतं. ओसरी मधली ती बंगळी आज कालपेक्षा जास्त वेगाने हलत असते.जणू काही त्यावर बसून कोणीतरी झोका घेत आहे. समीर दरवाजा उघडतो सगळे आत येतात आणि सरळ वर जातात. फ्रेश होऊन गप्पा मारत बसतात तेवढ्यात समीरच लक्ष मागच्या अंगणातील खोलीकडे जात. आणि तिथल्या खोली  जवळ कोणी असल्या सारख जाणवते  तो एकटक नजर लावून तिकडे बघत असतो.तिकडे अंधारात फक्त दोन डोळे चमकत असतात जे रोखून समीरकडे बघत असतात. त्याच्या मनात चर्रर्र होतं पण तो कोणाला काहीच सांगत नाही. रात्र पुढे सरकते सगळे झोपतात .समीरला मात्र झोप येत नाही.मगाचं ते दृश्य सारखं त्याच्या समोर येत असते. कडाक्याच्या थंडीत त्याला घाम फुटतो.कोणी तरी आपल्याला तिथे बोलवत असल्याचा भास त्याला होतो. तहान लागते म्हणून तो पाणी  पिण्यासाठी उठतो पण जवळच पाणी संपल्याने खाली जाऊन त्याला खाली जाऊन पाणी आणायचं असतं. त्याचे मित्र थकल्यामुळे गाढ झोपलेले असतात म्हणून तो कोणालाही न उठवता एकटाच खाली जायला निघतो, मोठ्या हिमतीने स्वयंपाक घरात येउन पाणी घेतो आणि वर जायला वळतो तसा कोणीतरी त्याच्या मागून गेल्यासारखं वाटते .समीर घाबरतो समोर पाऊल टाकायची त्याची हिंमत होत नाही. थोडा पुढे येतो मागच्या अंगणातील दरवाजा उघडा होता तो दरवाजा बंद करायला पुढे सरकतो .  त्याच लक्ष त्या बंद खोली कडे जाते ,तसा तो खेचल्या सारखा पुढे जातो . वातावरण खुप भयाण आणि गंभीर झालेले असते.समीर त्या बंद खोली जवळ पोहचतो आणि न राहवून तो दरवाजा उघडतो. आत खूप काळोख असतो .त्याचे हात पाय भीतीने लटपटत असतात . तो खोलीत पाउल टाकतो तशी आकाशात एक कडकडून वीज चमकते आणि काही क्षणासाठी त्या विजेचा प्रकाश त्या खोलीत पसरतो . आणि त्या प्रकाशात काहीतरी  भयंकर  समीरच्या समोर येते.  हाड गोठून जाईल अशी थंडी.आणि त्या खोलीत येणारा कुबट वास .काही वेळ समीर त्या खोलीतच असतो आणि अचानकपणे समीरला कोणीतरी बाहेर लोटत.


समीर जोरदार लोटल्या गेल्याने त्याला चांगलाच मार बसतो.तो उठू शकत नाही .जोऱ्याने विजा कडकडायला  लागतात .खिडकीच्या खडखड आवाजाने अभयला जाग येते तो उठून खिडकी बंद करायला जवळ जातो.त्याची नजर बाहेर पडते त्याला विहिरी जवळ कोणीतरी पडलेलं दिसत.पहिले तर तो घाबरतो पण त्याच्या मनात येतं की  मित्रांपैकी कोणी तर नसेल न म्हणून तो लाईट ऑन करतो आणि मित्रांजवळ येतो बघतो तर समीर तिथे नसतो.अभय अमोल आणि निलेश ला उठवतो..
अभय: अम्या, निल्या अरे उठा ..

अमोल: ( डोळे चोळत उठतो)  काय आहे रे अभ्या कशाला उठवलं ?

निलेश ही उठतो.

अभय: अरे सम्या इथे नाही आहे..

निलेश: काय???कुठे गेला सम्या??

अभय: तो बहुतेक खाली गेला आहे,त्या विहिरी जवळ .चला पटकन आपल्या ला खाली जायला हवं.

तिघेही धावत खाली येतात. विहिरी जवळ जातात समीर तिथे खाली पडलेला असतो .भीतीने थरथरत कापत असतो.

अभय: सम्या काय झालं तुला ? इकडे कसा आलास तू?

समीर काही बोलण्याच्या परिस्थितीत नसतो .त्याला उचलून ते वरच्या मजल्यावर घेऊन जातात. तो शांत व्हायची वाट पाहतात. समीर थोडा नॉर्मल होतो .त्याच्या मित्रांना पाहून त्याची भीती कमी होते.

अमोल: सम्या आता तरी सांग काय झालं ? तू इतका घाबरला का आहेस?

समीर: ( घाबरत सांगतो)  मला तहान लागली म्हणून मी पाणी पिण्यासाठी उठलो तर जवळ पाणी नव्हतं म्हणून खाली गेलो .माझ्यामागून कोणी तरी गेल्याचा भास मला झाला मी घाबरलो.समोर आलो तर मागचा दरवाजा उघडा होता तो लावायला मी गेलो. तर ती त्या बंद खोली कडे आपोआप  खेचल्या गेलो.त्या खोली जवळ गेलो तिथे खूप अंधार होता . मी कधी उघडून आत गेलो .जस आत पाऊल टाकलं तशी  वीज चमकली आणि त्या प्रकाशात मी जे पाहिलं ते खूप खूप भयंकर होत.

अभय: अस काय पाहिलं तू?

समीर: मी पाहिलं की एक बाई भिंतीवर उलटी चालत जात आहे आणि ती वर छतावर जाऊन उलटी लटकलेली होती .तिचा चेहरा पांढरा फट पडला होता. डोळे खोबणीतून बाहेर आल्यासारखे दिसत होते.तोंडातून कसला तरी द्रव गळत होता. तिची भेदक नजर माझं काळीज फाडत होती. मला पाहून छद्मी हसली अन म्हणाली " आला व्हय र तू शेवटी. तुहीच वाट पाहत होते म्या.त्या माधवराव चा नातू हायस न तू या वाड्याचा एकुलता एक वारस .तू मरणार माझ्या हातून ,तुला मारून म्या  मालकाले दिलेला शबुद पूर्ण करणार. इतकं वर्ष वाट पायली तू इथं येण्याची .आता तुला कोण बी वाचू शकणार नाय" अन जोरात हसायला लागली. त्या खोलीतला तो अंधार अन ती अमानवी शक्ती माझा जीव धडधडायला लागला .त्या बाईने माझ्या पुढ्यात उडी मारली आणि माझ्यावर जोरात धावून आली मला मारणारच की जोऱ्याचा झटका बसून मागे गेली. खूप संतापाने माझ्याकडे पाहत होती . तिनेच मला त्या खोलीतुन विहिरी जवळ ढकलून दिलं आणि म्हणाली " आज वाचलास पण जास्त दिवस नाय वाचणार ,आता तू या वाड्यातून कुठं बी जाऊ शकणार नाय ,कारण या खोलीच दार उघडून मुक्त केलं मला " . तसं त्या खोलीच दार पुन्हा लागलं .भीतीमुळे मी जागच हलु पण शकत नव्हतो.

निलेश( घाबरून जातो)  बघा त्या काकांनी सांगितलं होतं ते खरं आहे. सम्याच्या जीवाला धोका आहे .आपण आताच्या आत इथून निघून जाऊ.

समीर: नाही निल्या आपण आता या वाड्याबाहेर तिच्या मर्जी शिवाय जाउ शकत नाही. मी ते दार उघडून इतक्या वर्षांपासून त्या खोलीत बंद असलेल्या अमानवी शक्तीला मुक्त केलं आहे.तिचा एकच उद्देश आहे मला मारणं पण मला एक कळलं नाही की ती मला मारायला आली आणि काहीतरी भयंकर बघितल्या सारखी मागे सरकली अस काय झालं असेल?

अभय: सम्या तुला या रुद्राक्षाच्या माळे ने वाचवलं, जनाकाका म्हणाले होते ही माळ तुमच्या गळयात आहे तोवर तुम्हाला काहीही होणार नाही. आणि तीच माळ बघून ती भयानक आत्मा दूर झाली ,म्हणून तिने संतापाने तुला बाहेर लोटलं. सम्या ही माळ काहीही झाली तरी काढायची नाही हीच आपलं रक्षण करेल.

निलेश: आणि ती म्हणाली की,मालकाला दिलेला शब्द पूर्ण करणार.आता हा मालक कोण ? म्हणजे हा जिवंत आहे की अमानवी शक्ती?

समीर: तेच शोधायचं आहे की ही आत्मा आणि तिचा मालक कोण .

अमोल: सम्या त्या करता आपल्या ला या वाड्याचा पूर्ण इतिहास माहिती करायला हवा आहे. पण जनाकाकांना तर जास्त माहिती


नाही मग कस कळेल आपल्याला??
अभय: मला  काय वाटतं की वाड्यातच याच रहस्य दडलेलं आहे आणि नक्कीच काहीना काही अस असेल की ज्यातून माहिती मिळेल.

समीर: हो मलाही तेच वाटतं आहे.पण ते मिळवणं तितकं सोपं नाही कारण ती आत्मा खूप भयंकर आहे आणि नक्कीच अजून कोणीतरी तिचा साथीदार आहे.. पण कोण ???

 
काय रहस्य असेल त्या वाड्याच रहस्य आणि कोण असेल ती बाई अन तिचा मालक ???