Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण ५

सकाळी अभयला जाग येते . तो उठून बघतो तर अमोल त्याच्या जागेवर नसतो म्हणून तो खाली त्याला शोधायला निघतो. पायऱ्या पर्यंत आल्यावर दिसते की अमोल फारशी वर झोपलेला आहे .तो तसाच त्याचा जवळ जातो.त्याला उठवायचा प्रयत्न करतो पण अमोल काही केल्या उठत नाही.अभय घाबरतो आणि समीर व निलेश ला आवज देतो .त्याचा आवज ऐकून दोघेही झोपेतून उठतात आणि खाली येतात. अमोलला अस बेशुद्ध बघून तेही घाबरतात .निलेश पाणी आणून अमोलच्या तोंडावर शिंपडतो .अमोल शुद्धीवर येतो पण तो खूप घाबरलेला असतो .भीतीने तो इकडे तिकडे बघतो .

" अम्या तू इथे कसा आलास " अभय..

" अ ..अ अभ्या काल मी  त्या बाईला पाहिलं आणि.." अमोल भेदरल्या सारख बोलतो.

" आणि काय " समीर ही घाबरून विचारतो..

" आणि तो तिचा मालक पण होता तिथे "..अमोल

"मालक , तू पाहिलंस त्याला कोण आहे तो"?समीर

" नाही त्याचा चेहरा नव्हता तर फक्त रक्ता सारखे दोन लाल डोळे होते आणि ती बाई त्याला म्हणत होती की, मालक तुम्हाला नवीन शरीर मिळालं याच्यात प्रवेश करून आबासाहेबाच्या नातवाला संपवा" अमोल

"बापरे ,सम्या हे खूप भयंकर आहे म्हणजे नक्कीच त्या वरच्या खोलीत कोण तो मालक त्याचा आत्मा असणार ,आणि आपण ती खोली उघल्याने तो बंदिस्त आत्मा मुक्त झाला" अभय

" आणि आता एक नाही तर दोन दोन अमानवी शक्ती आहे,म्हणजे त्यांची ताकद नक्कीच जास्त आहे" निलेश

" पण अम्या तुझ्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे न म्हणून तू वाचलास" अभय

अमोल चा हात गळ्या कडे जातो त्याच्या गळ्यात ती माळ नसते तो घाबरतो.

" अरे माझ्या गळ्यात तर माळ नाही आहे" अमोल घाबरून सांगतो.

"काय?? अम्या कुठे गेली ती माळ तू काढली होती का?" समीर ही घाबरतो

" नाही रे काही आठवत नाही मला" अमोल

" अम्या तुला माहिती आहे न ती माळ किती महत्वाची आहे आणि तरी वेंधळेपणा केला" समीर अमोलवर चिडतो.

" पहिले ती माळ शोधू आपण ,चला वर" निलेश

चौघेही सगळा वाडा शोधून काढतात पण ती माळ कुठेही मिळत नाही.माळ कुठे गेली असेल या चिंतेत ते असतात. समीर जनाकाका ला फोन करतो त्यांचा पण फोन लागत नाही. आणि इतका वेळ होऊन गेला तरी जनाकाका वाड्यात आलेले नसतात.समीर स्वतःची माळ अमोलला देऊ करतो पण तो ती माळ घेत नाही.कारण त्याला माहिती असत की समीरने ही माळ गळ्यातून काढली तर त्या दृष्ट आत्मा त्याला जीवंत ठेवणार नाही. निलेश तर मनात सारखं देवाचा धावा करत असतो. वेळ पुढे पुढे जात राहते .जेवण बनवून चौघे जेवून घेतात आणि जनाकाका यायची वाट पाहत असतात.


      अमोलच्या गळ्यात माळ नसल्याने तो असुरक्षित असतो. संध्याकाळ होते तरी जनाकाका वाड्यावर येत नाही. शेवटी चौघे त्यांच्या कडे जायला निघतात च की तेवढयात..
अमोल तिथून जागचा हलत नाही. तो मान खाली घालून बसतो.
" अम्या काय झालं चल न " समीर

अमोल मान वर करतो त्याचे डोळे रागाने लालबुंद झालेले असतात. आणि तो विचित्र हसायला लागतो. त्याचे मित्र घाबरतात .त्याच्या जवळ जातात तसा अमोल दणकन भिंतीवर आदळल्या जातो..

" आपल्या मित्राचा जीव प्रिय असेल तर दूर व्हा माझ्यापासून" अमोलच्या तोंडून माणसाचा घोगरा आवज येतो.

"  मालक सोडू नका ह्यासनी . तुमचा लय दिसाचा बदला आता पूर्ण व्हनार"  त्या बाईची भयंकर आत्मा तिथे येते..

" कोण आहेस तू?? सोड माझ्या मित्राला .तुला माझा जीव हवा आहे न तर थांब मी गळ्यातली माळ काढतो" समीर अमोलच्या अंगातील आत्म्याला म्हणतो

" थांब सम्या, नको काढू माळ" अभय समीरला अडवतो..

" अरे अम्या चा जीव धोक्यात आहे ,मला ही माळ काढू दे" समीर

" नाही सम्या तो काही करणार नाही अम्या ला पण तू माळ काढलीस तर तुझा जीव घेईल " निलेश.

" हो सम्या ऐक आमचं" अभय

हे बघून त्या दोन्ही आत्मा चिडतात आणि भयंकर रूप धरतात ते बघून तिघेही घाबरतात..अमोलच्या अंगातली ती आत्मा अमोल पुन्हा भिंतीवर आदळते , त्याला डोक्याला लागतं .

" सोताचा जीव लय प्रिय हाय रं तुला, मित्राला मरु देत व्हय ,आर त्याचा बळी देनार ह्याय काय ,काढ ती माळ अन  वाचीव जीव त्याचा" ती स्त्री आत्मा समीरकडे बघून रागाने बोलते..

तो पुरुषाचा आत्मा अमोलच्या शरीरावर रागाने जखमा करत असतो. ती स्त्री भयंकर हसत असते .समीर, अभय,निलेश हतबल होऊन त्यांच्या मित्रांवर होणारे वार बघत असतात. अभय हळूच सगळ्यांच लक्ष चुकवून वरच्या मजल्यावर जातो आणि जनाकाकांनी दिलेली अंगाऱ्याची पुडी घेऊन येतो ,मोठ्या धीटपणे तो अंगारा अमोलच्या आणि त्या स्त्रीच्या अंगावर टाकतो .जसा तो अंगारा त्या अमानवी शक्तीवर पडतो तसे ते तडफडायला लागतात .ती स्त्री अदृश्य होते आणि अमोल खाली कोसळतो. त्याचे धावत त्याच्या जवळ जातात .अमोल जखमी झाला असतो . समीर अमोलच्या तोंडावर पाणी शिंपडतो तो शुद्धीवर येतो.अभय अमोलला मलमपट्टी करून देतो .सगळे अजून खालीच असतात..अमोलला नीट उभ ही राहता येत नाही. चौघे वर जाणारच की तेवढ्यात त्या दोन भयंकर आत्मा पुन्हा येतात .घाबरून हे चौघे खाली असलेल्या एका बंद खोलीचे दार उघडून आत शिरतात आणि पटकन दरवाजा लावून घेतात. त्या दोन अमानवी शक्ती आत प्रवेश करू शकत नाही. त्यांच्या गुरगुरण्याचा भयानक आवज मात्र येत असतो.  आश्चर्य म्हणजे ती त्या भयंकर आत्मा खोलीत येत नाही..अमोलला सावकाश खाली बसवतात

" सम्या आपण त्यादिवशी वाड्यातील सगळ्या खोल्या तपासल्या पण ही खोली कशी काय सुटली" अभय त्या खोलीकडे बघत बोलतो..

वाड्याच्या इतर खोल्यांपेक्षा ती खोली खूप प्रसन्न असते. त्या भयाण उदासीन वाड्यात ही एकमेव खोली असते जिथे शांत आणि सुरक्षित वाटतं. तिथे भिंतीवर एका स्त्रीचा फोटो असतो. समीरला आठवते की वरच्या खोलीत जो फोटो मिळतो त्यात असणारी अनोळखी स्त्री हीच असते.अतिशय प्रसन्न,तेजस्वी असा तो चेहरा असतो.त्याच्या कडे समीरला आपुलकी वाटायला लागते. पुन्हा सगळयांच्या मनात प्रश्न निर्माण होतात की कोण असेल ही फोटोतील  तेजस्वी स्त्री जिच्या तेजामुळे वाड्यातील त्या भयंकर आत्मा इथे येण्यापासून रोखल्या जात आहे??