Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण २

११.आपल्‍या परसामध्‍ये विहिरी, फुलझाडे, फळे ई. पाहिल्‍यास- सु-स्‍वभावी बायको मिळेल आणि कीर्तिमान पुत्र होईल.
१२.नुकत्याच नांगरलेल्‍या जमिनीत उभे आहात असे पाहिल्‍यास- आपल्‍या मुलांबरोबर अगर दुस-या कोणाबरोबर शत्रुत्‍व येईल. 
१३.नांगरलेल्या जमिनीचे हे स्‍वप्‍न जर विवाह इच्छुकांना पडल्यास- त्‍यांचा विवाहसंबंध घडून येणार नाही. 
१४.हे नांगरलेल्या जमिनीचे स्वप्न व्‍यापा-याने पाहिल्‍यास- त्याला व्‍यापारात नुकसानी होईल.
१५.हिरव्यागार, धान्‍य उगवलेल्‍या शेतामधून चालत आहोत असे स्‍वप्‍नात पाहिल्‍यास- आपली भरभराट होईल.
१६.हिरव्‍या गवताचा भारा पाहिल्यास– शुभ समजले जाते. 
१७.वाळलेले गवत पाहिल्यास– अशुभ समजले जाते.
१८.शेतामध्‍ये धान्‍यांची कणसे दिसल्‍यास- कष्‍टार्जित पैशापासून सुख प्राप्ती होईल.
१९.जमीन आपणच नांगरत आहोत असे स्‍वप्‍नात पाहिल्यास– समाजात मान मिळेल.
२०.मोठ्या रस्‍त्‍यावरून किंवा महामार्गावरून चालत आहोत असे पाहिल्यास– माणसाला सौख्‍य प्राप्त होईल.

स्वप्नफल- भूमी संबंधी

रुद्रमुद्रा रमेश अणेराव
Chapters
प्रकरण १ प्रकरण २ प्रकरण ३ प्रकरण ४