Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण ३

२१.अरूंद गल्‍ली किंवा गुहेत चालताना पाहिल्यास- संकटे येतील. याच स्वप्नात चालताना आपल्‍या बरोबर आपले मित्रमंडळी आहेत असे दिसल्यास– त्या मित्र-मंडळीबरोबर भांडणे होतील.
२२.गुहेमधून प्रकाशात बाहेर आलो असे पाहिल्‍यास- संकटे नाहीशी होतील.
२३.कुंभाराच्या मातीच्या तलावात पडले आहोत पाहिल्‍यास-  विधवेबरोबर संभोग होईल.
२४.स्वप्नात स्‍मशानभूमी पाहिल्‍यास– माणसाची अभिवृद्धि होईल.
२५.आपले घर गाईच्‍या शेणाने सारवलेले स्‍वप्नात पाहिल्‍यास- घरात चोरी होण्याची शंका असते.
२६.स्वप्नात घर बांधताना पाहिल्यास- कार्यसिद्धीला जाईल. ते घर आपले आहे असे वाटल्‍यास धनलाभ होतो. 
२७.बागेमध्‍ये आपण शिकार करत आहोत असं स्‍वप्‍नात पाहिल्‍यास- भोग आणि संपत्ती यांची पूर्णता होईल.
२८.फुलांच्या बगिच्‍यांतून आपण फिरत आहोत असे पाहिल्‍यास- सौख्‍यलाभ होतो.
२९.घरात फिरताना पाहिल्‍यास- दूर देशाचा प्रवास होईल. 
३०.जंगलामध्‍ये फिरताना पाहिल्‍यास- कष्‍ट प्राप्‍त होतील.

स्वप्नफल- भूमी संबंधी

रुद्रमुद्रा रमेश अणेराव
Chapters
प्रकरण १ प्रकरण २ प्रकरण ३ प्रकरण ४