Get it on Google Play
Download on the App Store

दुर्गादेवी आणि परिवार

कोणताही प्राणी नियती टाळ शकत नाही. मृत्यू सुद्धा नियतीपासून मुक्त होऊ शकत नाही. जोपर्यंत आपण आपल्या कर्माचा आनंद घेत नाही, तोपर्यंत नशिबाचे चक्र आपल्याला दुसरे जीवन जगण्यास भाग पाडते. हेच कारण आहे की आपण पुन:पुन्हा पुनर्जन्म घेत आहोत.

आपल्या नशिबात शरीरासह आणि आपल्या सभोवतालच्या परिस्थितीसह आपण जगण्यास बांधीलआहोत. आपण पुरुष होणार की स्त्री हे ठरवणे आपल्या हातात नाही. आपले कुटुंब श्रीमंत किंवा गरीब, प्रेमळ किंवा कठोर असेल हे निवडण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपल्याकडे नशिबाच्या लाटांचा सामना करणे या शिवाय दुसरा पर्याय नाही.

हिंदू धर्मात, मृत्यूची देवता यम, नशिबाची देखरेख देखील यम करतो. यम रेड्यावर स्वार होऊन हातात फास घेऊन जातो. तो  एक वही ठेवतो, ज्यात आपली सर्व कामे नोंदवली जातात. प्रत्येक कृतीतून आपण पुण्य किंवा पाप कमावतो. आपण एकतर पुण्य उपभोगतो किंवा पापाचा त्रास सहन करतो. जोपर्यंत आपल्या पुस्तकांमध्ये खाती समान नाहीत तोपर्यंत यम आपल्याला त्याच्या फासाने बांधून ठेवतो.

या चित्रात देवी एका राक्षसाला मारत आहे. हा राक्षस एक रेडा देखील आहे. देवी नशिबाचा पहारेकरी यमाला मारत आहे का? कि ती  आपल्याला आपल्या नशिबापासून मुक्त करत आहे, जेणेकरून आपण आपल्या इच्छा पूर्ण करू शकू? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे कधीच मिळाली नाहीत.

चित्रात दाखवलेली देवी दुर्गा आहे. हे शक्तीचे सर्वात लोकप्रिय रूप आहे. तिची कथा 'देवी भागवत' या ग्रंथामध्ये दिली आहे. ती प्रेम आणि शक्ती दोन्हीची देवी आहे. तिचा चेहरा नववधूसारखा आहे, पण ती हातात शास्त्र धरण करून आहे. वधू म्हणून ती प्रेमाचे प्रतीक आहे, योद्धा म्हणून ती शक्ती आहे.

वधू म्हणून ती इच्छा तर पूर्ण करतेच, पण योद्धा म्हणून ती नशिबावर नियंत्रण ठेवते. तिच्या शस्त्रांनी ती आपले रक्षण करते, आपले पोषण करते, आपल्याला सुरक्षित ठेवते. अशाप्रकारे ती शक्ती आणि प्रेम या दोन्ही गोष्टींना मूर्त रूप देते आणि आपली काळजी घेते. याच कारणामुळे तिला 'आई' म्हटले जाते.

चित्रात लक्ष्मी आणि सरस्वतीला दुर्गेच्या मुली म्हणून दाखवले आहे. मूर्तींवरील छत्री आदर आणि दरारा दर्शवते.मूर्तींवर ठेवलेले वस्त्र परिपक्वता सूचित करते , कारण भक्तांना देवीचे दर्शन आईच्या रूपात घ्यायचे असते. तीन शिळा देवीच्या विद्या (सरस्वती), समृद्धी (लक्ष्मी) आणि शक्ती (दुर्गा) या तीन रूपांचे प्रतिनिधित्व करतात. पावलांचे ठसे शक्ती आणि सौभाग्य यांचे प्रतिक आहेत.