Get it on Google Play
Download on the App Store

श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं

श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेडं माझ्या कपाळी आलं

वेडयाच्या बायकोने केले होते लाडू
तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिले
चेंडू चेंडु म्हणून त्याने खेळायला घेतले ॥१॥

श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेडं माझ्या कपाळी आलं

वेडयाच्या बायकोने केला होता चिवडा
तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिला
केरकचरा म्हणून त्याने फेकून दिला ॥२॥

श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेडं माझ्या कपाळी आलं

वेडयाच्या बायकोने केल्या होत्या करंज्या
तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिल्या
होडया होडया म्हणून त्याने पाण्यात सोडल्या ॥३॥

श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेडं माझ्या कपाळी आलं

वेडयाच्या बायकोने केल्या होत्या चकली
तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिली
चक्रं चक्रं म्हणून त्याने फेकून दिली ॥४॥

श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेडं माझ्या कपाळी आलं

वेडयाच्या बायकोने केले होते श्रीखंड
तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिले
स्नो स्नो म्हणून त्याने अंगाला फासले ॥५॥

श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेडं माझ्या कपाळी आलं

वेडयाच्या बायकोने केल्या होत्या शेवया
तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिल्या
अळ्या अळ्या म्हणून त्याने टाकून दिल्या ॥६॥

श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेडं माझ्या कपाळी आलं

वेडयाची बायको एकदा पलंगावर झोपली
तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिली
मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकली ॥७॥

भोंडला

सखी
Chapters
महाराष्ट्रातील जुन्या परंपरा आड बाई आडवणी, आडाचं पाणी काढवणी भोपळ्याच फुल बाई फुलरंजना माझ्या सुंद्रीचं लगीन भुलाबाई भुलाबाई सासरे कसे गं सासरे कसे? श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत काळी चंद्रकळा नेसु कशी? सासूबाई, सासूबाई मला आलं मूळ सोन्याचा करंडा बाई मोत्याचं झाकण आज कोण वार बाई।आज कोण वार? कृष्ण घालीतो लोळण, आली यशोदा धावून नणंदा भावजया दोघीजणी घरात नव्हतं तिसरं कोणी । अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं ऊठ ऊठ मुली चल ग घरला अक्कण माती चिक्कण माती आणा माझ्या सासरचा वैद्य 'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ? एक लिंबु झेलू बाई, दोन लिंबं झेलूं । आला चेंडू, गेला चेंडू, लाल चेंडू झुगारिला। शिवाजी आमुचा राजा ऐलमा पैलमा गणेश देवा । आधी नमुया श्री गणराया