Get it on Google Play
Download on the App Store

एक लिंबु झेलू बाई, दोन लिंबं झेलूं ।

एक लिंबु झेलू बाई, दोन लिंबं झेलूं ।
दोन लिंब झेलूं बाई, तीन लिंबं झेलूं ।
तीन लिंबं झेलूं बाई, चार लिंबं झेलू ।
चार लिंब झेलू बाई, पाच लिंबं झेलूं ।


पाचा लिंबांचा पानवडा , माळ घाली हनुमंताला ।
हनुमंताची निळी घोडी. येतां जातां कमळं तोडी ।
कमळाच्या पाठीमागं होती राणी ॥

अगं अगं राणी इथं कुठं पाणी ?
पाणी नव्हे यमुना जमुना,
यमुना जमुनेची बारिक वाळू, तिथं खेळे चिलारि बाळू ।
चिलारि बाळाला भूक लागली ।

सोन्याच्या शिंपेनं दूध पाजीलं, पाटावरच्या घडीवर निजवलं ।
नीज रे चिलारि बाळा, मी तर जाते सोनारवाड्‍या ।
सोनारदादा सोनारभाई, गौरीचे मोती झाले कां नाहीं ?


गौरीच्या घरीं तांब्याच्या चुली, मांडव घातला मखमख पुरी ।
लगीन लागलं सूर्योंदयीं, भोजन झालं आवळीखालीं ।


उष्ट्या पत्रावळी चिंचेखालीं, शेणगोळा आंब्याखालीं ।
पानसुपारी तुळशीवरी, वरात निघाली हत्तीवरी ।
 

भोंडला

सखी
Chapters
महाराष्ट्रातील जुन्या परंपरा आड बाई आडवणी, आडाचं पाणी काढवणी भोपळ्याच फुल बाई फुलरंजना माझ्या सुंद्रीचं लगीन भुलाबाई भुलाबाई सासरे कसे गं सासरे कसे? श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत काळी चंद्रकळा नेसु कशी? सासूबाई, सासूबाई मला आलं मूळ सोन्याचा करंडा बाई मोत्याचं झाकण आज कोण वार बाई।आज कोण वार? कृष्ण घालीतो लोळण, आली यशोदा धावून नणंदा भावजया दोघीजणी घरात नव्हतं तिसरं कोणी । अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं ऊठ ऊठ मुली चल ग घरला अक्कण माती चिक्कण माती आणा माझ्या सासरचा वैद्य 'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ? एक लिंबु झेलू बाई, दोन लिंबं झेलूं । आला चेंडू, गेला चेंडू, लाल चेंडू झुगारिला। शिवाजी आमुचा राजा ऐलमा पैलमा गणेश देवा । आधी नमुया श्री गणराया