राहुल देशपांडे
वसंतराव देशपांडे ह्यांचे नातू राहुल देशपांडे आपल्या आजोबांचा वारसा समर्थ पाने आधुनिक काळांत पुढे चालवत आहे. अतिशय धारधार आवाज, उत्तम तालीम आणि आधुनिक तंत्रज्ञनाचा प्रभावी वापर करून राहुल देशपांडे जगभर प्रसिद्ध झाले आहेत.
कट्यार काळजांत घुसली ह्या नाटकाचे चित्रपटांत सुरेख रूपांतरण करणे राहुल ह्यांच्यामुळेच शक्य झाले. ह्यांत महेश काळे आणि शंकर महादेवन सारख्यांच्या आपला आवाज दिला.
मी वसंतराव ह्या चित्रपटांत वसंतनरावांची भूमिका राहुल ह्यांनीच वठवली आहे. त्यांच्याच आवाजांत विविध जुनी गाणे ऐकताना आपण वसंतरावांनाच ऐकत आहोत असा भास होतो.