Get it on Google Play
Download on the App Store

डार्क मॅटर म्हणजेच आदिशक्ती

आपल्या सर्वांना माहित आहे की आपण सर्व शून्यातून जन्माला आलो आहोत आणि एक दिवस शरीर मातीला मिळणार आहे. आपले शरीर उर्जेने बनलेले आहे आणि ज्या दिवशी ही उर्जा आपल्या शरीरातून निघून जाईल, त्या दिवशी आपले शरीर मृत होईल. मग ही उर्जा म्हणजेच शिव आहे का? शिव आपल्या सर्वांमध्ये आहे का?

विश्वातील प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या पदार्थापासून बनलेली आहे. पण विश्व कशापासून बनले आहे हे तुम्हाला माहिती आहे का? शास्त्रज्ञ या पदार्थाला डार्क मॅटर(Dark Matter) म्हणतात. डार्क मॅटरच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा अद्याप सापडला नाहीये तरी शास्त्रज्ञांच्या एका चमूने दावा केला आहे की ते लवकरच पृथ्वीवर त्याचे अस्तित्त्व सिद्ध करतील.

मग काय आहे डार्क मॅटर? जर आकाशगंगा आणि ताऱ्यांचे वस्तुमान मोजले तर ते विश्वाच्या केवळ चार टक्के आहे. बाकीचे घटक म्हणजे डार्क मॅटर. एका अभ्यासात शास्त्रज्ञांनी सांगितले की, बिग बँग पूर्वीच विश्वामध्ये डार्क मॅटर अस्तित्वात होता. विश्वाच्या एकूण वस्तुमानाच्या सुमारे 85 टक्के भाग हा डार्क मॅटर नावाच्या गूढ, अदृश्य पदार्थाचा बनलेला आहे असे मानले जाते. जो गुरुत्वाकर्षणाला मागे टाकते, ज्याला डार्क ऊर्जा (Dark energy) म्हणतात.

हेडलबर्ग येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटचे संशोधक गिरीश कुलकर्णी गेल्या दहा वर्षांत जमा झालेल्या डेटावर काम करत आहेत. त्यांच्या मते, प्रत्येकाला डार्क मॅटर म्हणजे काय हे समजून घ्यायचे आहे, परंतु डार्क मॅटर नक्की काय आहे हे कोणालाही माहित नाही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर नाही.

डार्क मॅटर प्रकाश किंवा किरणोत्सर्ग देत नाही, परंतु आपण केवळ पृथ्वीवरील रेणूंशी होणारी त्याची टक्कर अभ्यासू शकतो. पण शास्त्रज्ञांना ते पाहण्याचा मार्ग अद्याप सापडलेला नाही. संशोधनानुसार, डार्क मॅटर कोणत्याही प्रकारचे रेडिएशन उत्सर्जित करत नाही, इतकेच नाही तर त्यात कोणतेही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन देखील नाही, जे आपल्या सर्व अवकाश संशोधनाचा आधार आहे.असे असूनही, डार्क मॅटर शिवाय, आकाशगंगा किंवा त्यांचे समूह एकत्र राहू शकणार नाहीत आणि त्यांचे विघटन होईल.

आता हे आपल्याला शास्त्रात सापडते कि हिंदू ग्रंथांमध्ये आदिशक्ती किंवा देवी शक्तीलाच डार्क ऊर्जा (Dark energy)  म्हटले आहे. आदिशक्ती ही शिवाची अर्धांगिनी आहे, आदिशक्ती शिवाय शिव अपूर्ण आहे, शिवाची अमर्याद शक्ती आहे आदिशक्ती!