Get it on Google Play
Download on the App Store

अणु संरचना आणि शिवलिंग

शिव लिंगाचा अर्थ  सोर्स इंटरनेट

अणूंमध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन आहेत असे जर आपण मानतो, तर हा इंग्रजी शब्द आहे जो केवळ गेल्या शतकातच दिला गेला आहे, तर मग प्राचीन कालखंडात आपण त्यांना कोणत्या नावाने ओळखत होतो? प्राचीन काळी हे शब्द ब्रह्मा, विष्णू आणि महेश या नावाने ओळखले जात होते, प्राचीन ऋषींनी शिवलिंगाची व्याख्या ब्रह्मा, विष्णू, महेश या शब्दांत केली आहे. शिवलिंगाचा खालचा भाग ब्रह्मदेवाचे प्रतिनिधित्व करतो, मधला भाग विष्णूचे आणि वरचा भाग शिवाचे प्रतिनिधित्व करतो.

विष्णू

विष्णूचे चित्र पाहिल्यास विष्णूच्या नाभीतून कमळाचा जन्म झाल्याचे दाखवले आहे आणि कमळावर ब्रह्मा बसलेले दाखवले आहे. कमळ हे उर्जेचे प्रतीक आहे ज्यामध्ये आकर्षण शक्ती आहे. कमळाचे देठ त्याच्या लवचिकतेमुळे वाकू शकते जे ब्रह्मा विष्णूभोवती फिरत असल्याचे सूचित करते.  विजातीय विद्युत प्रभारामुळे इलेक्ट्रॉन प्रोटॉनकडे आकर्षित होत असल्याचा हा संदेश आहे.

या शिवाय, न्यूट्रॉनला शिव म्हणून चित्रित केले आहे ज्यावर कोणताही प्रभार नाही. अणूच्या केंद्रकातही न्यूट्रॉन असतात. न्यूट्रॉन हे प्रोटॉन सारखेच आकाराचे असतात, परंतु त्यांच्यावर कोणताही विद्युत प्रभार नसतो. न्यूट्रॉन अणूच्या केंद्रकात प्रोटॉनशी घट्ट बांधलेले असतात. जेव्हा अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन्सइतके न्यूट्रॉन असतात, तेव्हा अणू स्थिर असतो.

तुमच्या कधी लक्षात आले असेल किंवा नसेल पण तुम्ही नीट विचार केला  तर तुम्हाला कळेल की, शिवलिंगाची स्थापना अनेकदा अशा ठिकाणी असते की त्याभोवती नदी असते, त्यामागील रहस्य काय आहे? आता ते आपण वैज्ञानिक दृष्टीकोनातून ते समजून घेऊया.

भाभा परमाणु अनुसंधान केंद्र, मुंबई

सोबतच्या आकृतीमध्ये, मुंबईच्या बाहेरील भाभा अणु संशोधन केंद्राचे (BARC) हवाई दृश्य दाखवले आहे. जर तुम्ही बारकाईने पाहिले तर तुम्हाला दोन चित्रांमधील समानता दिसेल. BARC च्या आकृतीवरील दंडगोलाकार रचना ही मुख्य अणुभट्टी (Core Nuclear Reactor) आहे. त्याचा आकार चित्रामधील शिवलिंगाच्या सिलिंडर सारखा आहे, अणुभट्टीला देखील थंड होण्यासाठी नियमित पाण्याचा पुरवठा आवश्यक आहे कारण ती ऊर्जा निर्मिती प्रक्रिये दरम्यान गरम होते.

शिवमंदिरातील लिंगातून वाहणारे पाणी पवित्र मानले जाते पण ते का सेवन केले जात नाही?

शिवलिंगातून वाहणारे पाणी पिऊ नये कारण जसे अणुभट्टीतील पाणी पिण्यायोग्य नाही, कारण हे पाणी प्रभारीत केले जाते. तसेच बहुतेक शिव मंदिरे नेहमी जसे आपण नदी किंवा तलाव म्हणू शकतो अशा पाण्याच्या स्त्रोताजवळ आढळतात, याचे कारण असे की, आधुनिक काळातील अणुभट्ट्यांप्रमाणे शिवलिंगांनाही 'कोलिंग कोर' साठी पाण्याची आवश्यकता असते.शिवलिंगाच्या प्रदक्षिणे दरम्यान शिवलिंगाचे तीर्थ ओलांडू का दिले जात नाही याचा कधी तुम्ही विचार केला आहे? तीर्थाजवळ जाताच प्रदक्षिणा मार्गावरून लोकांना मागे वळावे लागते कारण तीर्थ प्रभारीत पाण्याचे प्रतिनिधित्व करते.

म्हणून आपण असे म्हणू शकतो की शिवलिंग हे एक प्राचीन प्रतीक आहे जे अशा सर्वोच्च शक्तीचे प्रतिनिधित्व करते ज्या उर्जेला आपल्या पूर्वजांनी शिव म्हटले होते. ही उर्जा 'विस्म' नामक दुसर्‍या उर्जेच्या अगदी उलट होती. सरस्वती संस्कृतीतील लोकांना या प्रकारची उर्जा माहित होती. अण्वस्त्रे आजकाल मोठ्या प्रमाणावर संहार करणारी सर्वात प्राणघातक शस्त्रे अस्तित्त्वात आहेत आणि हिंदू धर्मग्रंथांमध्ये आपण शिवाला संहारक म्हणतो.