जलपरीची पहिली कथा
इ.स.पूर्व १००० मध्ये असिरिया मध्ये सापडलेल्या जलपरीची कथा ही जलपरीची पहिली कथा असल्याचे म्हटले जाते. सेमिरॅमिसची आई असिरियन राणी देवी अटारगाटिस, एका मेंढपाळावर मनापासून प्रेम करत होती, परंतु तिला तिच्या प्रियकराचा अनिच्छेने खून करावा लागला.
यामुळे ती इतकी खजील झाली की तिने तलावात उडी मारून माशाचे रूप धारण केले. पण पाणी देखील तिचे सौंदर्य लपवू शकले नाही आणि यामुळे तिचे अर्धे शरीर पूर्वीसारखेच राहिले तर शरीराचा खालचा भाग माशासारखा झाला.