शिखंडीचा मृत्यू
युद्धाच्या अठराव्या दिवशी अश्वत्थाम्याने मृत्युपथावर असलेल्या दुर्योधनाला पांडवांची धडावेगळी मुंडकी आणून देण्याचे वचन दिले. वचनपूर्तीसाठी रात्रीच्या वेळी अश्वत्थामा पांडवांच्या छावणीत शिरला. तिथे त्याला द्रुपदाची दोन्ही मुलं, पांडवांची काही मुलं, शिखंडी आणि द्रिष्टद्युम्न झोपलेले दिसले. त्याने सगळ्यांना भीष्म आणि द्रोणांच्या मृत्यूचा प्रतिशोध घेण्यासाठी म्हणून तिथेच संपवले. अश्या प्रकारे शिखंडीनी किंवा अंबेचा जन्म सार्थकी आणि तिचा या पृथ्वी तलावरचा कार्यभाग संपला...!