मंगलमूर्ती मोरया....!!!
शूर्पकर्ण गजवदन तू अधिष्ठाता
सकल विद्यांचा दाता मंगलमूर्ती मोरया||
शेंदूरवर्ण कांती लंबोदर तू गजानन
सकल दुःखहर्ता मंगलमूर्ती मोरया||
हरे विपदा तव सकलांची तूच विघ्नहर्ता
सकल जनांचा श्वास तूच मंगलमूर्ती मोरया||
काया वाचा मनी तूच तू भाग्यविधाता
सकल कलांचा उगम तूच मंगलमूर्ती मोरया||
दिलास आधार मज सदा हरोनि संकट विघ्नहर्ता
सकल जन्माचे सार्थक घडो सेवा मंगलमूर्ती मोरया||
तूच दिलेले हे शब्दांचे कोंदण हे बुद्धीदाता
सकल विचारांचा प्रणिता मंगलमूर्ती मोरया||
राहो सन्मती मनीची मिळो शक्ति सदा शक्तीदाता
सकल संवेदनाची जाणीव तूच मंगलमूर्ती मोरया
सहजच सुचलेले मनीचे शब्द हे तूच त्याचा अधिष्ठाता
मिळे सर्व न मागता ही राहो सदैव कृपा मंगलमूर्ति मोरया||
©मधुरा धायगुडे