दुहिता दुर्वा...!!
गणेश उपासनेत दुर्वा अर्पण करण्याचे महत्व सर्व परिचितच.
आज श्रावण संकष्टी ला माझ्या हातून दरवर्षी प्रमाणेच घडलेली कुंडीतील मातीची ही गणेश मूर्ती एक प्रयत्न ??
दुर्वा दुःखाचे निवारण करते ती दुर्वा.दुहिता.
भगवान गणेशाची आवडती दुर्वा. का आवडते दुर्वा. ब्राह्माडाची निर्मिती झाली पण विविध जीवांच्या अन्नाची समस्या समोर होती ब्राह्मादेवाच्या मनातून देवी दुर्वा प्रगट झाली असे शास्त्र दुर्वा ही सर्व अन्नाची मूळ आहे. म्हणून भगवान ब्राह्मादेवाने दुर्वेवर संपूर्ण विश्वाच्या उदरभरणाची जबाबदारी सोपवली आणि तिला अहंकार आला. देवी अन्नपूर्णेचा तिने अपमान केला म्हणून तिला गवत रूप मिळाले. अनलासूर राक्षस गिळल्यावर दाह झाला भगवान गणेशाला दहा दुर्वा अर्पण केल्यावर च ती शांत झाली.. तेव्हापासून गणेशाना दुर्वा प्रिय झाली गणेश उपासनेतून निर्माण होणारी उष्णता शांत करण्यासाठी दाहशमन दुर्वा अर्पित करतात.. दुःख हरिता ती दुर्वा म्हणून आपल्या चिंता गणेशचरणी समर्पित करण्याची ही प्रतिकात्मक दुर्वा.
मग 21दुर्वा चे ही महत्व आहेच. काय असेल एकवीस का असे ही मनात येतेच. त्यांचा ही अर्थ लावता येईल दुःखहरिता दुर्वा.. दुःख कशापासून तर षडरिपू काम, क्रोध लोभ,मोह,मत्सर, मद येतात ते आपले जीवन गाणे त्यामुळे हा प्रपंच.. पाचा चा एकत्र त्याचा प्रपंच. मग त्यात मन, बुद्धी, अहंकार चित्त हे चार स्थान तर सत्व रज तम हे गुण जे स्वार होतात द्वैत आणि अ द्वैत या दोन खांबावर असे म्हटले तर अशा अ द्वैतपासून आपण दूर जातो म्हणून तर दुःख. मग बघा षडरिपू पाच प्रपंच चार वृत्ती दोन खांब आणि तीन गुण अशा वीस गोष्टी एकत्र केल्या म्हणजे आपण आपली अ द्वैत वृत्ती तयार झाली ती गणेश चरणी दुर्वार्पण करण्याची प्रतिकात्मक पद्धत ती ही 21दुर्वांची जुडी श्री गणेश चरणी अर्पण. श्री गजानन!!
©मधुरा धायगुडे