Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण सहावे

पोलिसांनी गौतमचे शव आपल्या ताब्यात घेतले होते. ते त्यांचा तपास करत होते.

पण डॉक्टर आनंद वैशंपायन आणि विनय यांना पोलिसांपेक्षा प्रोफेसर ब्रिज  काय निष्कर्ष काढतात यात अधिक रस होता.

 आणि अखेर तो दिवस उजाडला प्रोफेसर ब्रिज  यांनी त्यांना प्रयोगशाळेत बोलावले होते.

“ तुम्ही सगळ्यात आधी हे सांगा डॉक्टर, गौतम तुम्हाला सर्वात आधी कुठे भेटला होता?” ब्रिज  

“ तो तर माझ्या प्रोजेक्टच्या सुरवातीपासूनच माझ्या बरोबर होता. त्याचं मास्टर्स पूर्ण झालं तेव्हापासून...” डॉक्टर

“ आणि तो नेहमी तुमच्या घरी जा ये करत असे का?” ब्रिज

“ होय प्रोजेक्ट सुरु झाले तेव्हापासून तो अधूनमधून माझ्या घरी यायचा.”

“ ओके....” ब्रिज   

“ काय ओके? मला काही कळले नाही “ डॉक्टर वैशंपायन आता अवधिरे झाले होते

“ ऐका डॉक्टर.तुमची पत्नी सुंदर आहे. मी देखील पहिल्या भेटीतच तिच्यावर भाळलो होतो. नाराज होऊ नका पण हे स्वाभाविक आहे. हेच गौतमच्या बाबतीत झाले असावे. पण पुढे काही करायची हिम्मत त्यांच्यात नव्हती. आणि त्याच्यात शक्तीही नव्हती. अखेर ती त्याच्या बॉसची पत्नी होती.

हे सगळे असे असून देखील त्यांच्या मनात तुमच्या पत्नीशी संबंध प्रस्थापित करण्याची प्रबळ इच्छा होती. आणि दोन वर्षानंतर जेव्हा त्याने तुमच्या पत्नीला तुमच्याबरोबर घटस्फोट घेण्याचा विचारात पहिले तेव्हा त्याला राहवले नाही.

हे उघड आहे कि तुम्ही घरी गेलात तेव्हा तुमचा आणि तुमच्या पत्नीचा समेट झाला असेल. परंतु त्याने स्वत:चे सूक्ष्म शरीर बनवून तुमच्या पत्नीचे शरीर अनुभवता येते का हे पाहण्याचा बालिश प्रयत्न केला. आणि तो चांगलाच फसला.” प्रोफेसर ब्रिज  यांचे म्हणणे  पोलीस, डॉक्टर आणि विनय ऐकत होते.

“ पण मग तसं करायला गेल्यावर तो मेला कसा?” विनयने विचारले

“ सूक्ष्म शरीराच्या रुपात त्याने मिसेस विषम पाईन यांच्या शरीरात शिरण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या शरीरात शिरताच तुमच्या पत्नीच्या शरीराने त्या फोरेन पल्स चा विरोध सुरु केला असेल. आणि अखेर तेच घडले जे अजून या प्रयोगात निश्चित झाले नव्हते.”

भौतिकशास्त्र कितीही प्रगत झाले तरी विधात्याने निर्माण केलेल्या रचना मात्र त्याला पुरून उरतात. गौतमचे सूक्ष्म शरीर तुमच्या पत्नीच्या शरीरात घुसखोरी करत आहे हे त्यांच्या शरीराने जाणताच त्यांच्या शरीराने केलेला विरोध हा गौतमच्या सूक्ष्म शरीरापुढे प्रचंड ताकतवान ठरला.

गौतमच्या सूक्ष्म शरीरातील विद्युत तरंग आपल्या पत्नीच्या शरीराने निर्माण केलेल्या प्रतीरोधी विद्युत तरंगापेक्षादुर्बल ठरले आणि इथे खुर्चीत बसलेला गौतम एका झटक्यात गतप्राण झाला आणि यावरून हे निश्चित झाले कि सूक्ष्म शरीराला इजा झाली तर ती इजा स्थूल शरीराला देखील होते.”

“अरे देवा.. म्हणजे या सगळ्या प्रकारात गौतम गिनी पिग झाला तर...”

घडलेल्या प्रकारावर डॉक्टर आनंद वैशंपायन यांना काय म्हणावे तेच कळत नव्हते.

..समाप्त....