संत निवृत्तीनाथांचे अभंग
नसे तो ब्रह्मांडी नसे तो वैकुंठीं । दुजियाची गोष्टी नाहीं तेथें ॥१॥
तें रूप सुंदर देवकी उदरीं । वसुदेव घरीं कृष्ण माझा ॥२॥
ब्रह्मांडकडवा मनाचा वोणवा । साधितां राणिवा हारपती ॥३॥
निवृत्ति सुंदर कृष्णरूप सेवी । गयनीगोसावी उपदेशिलें ॥४॥