Get it on Google Play
Download on the App Store

वसलसुत्तं 6

दिठ्ठेव धम्मे गारय्हा सम्पराये च दुग्गति |
न ने जाति निवारेति दुग्गच्चा गरहाय वा ||२६||


ते इहलोकीं निंद्य होतात, व परलोकीं दुर्गतीला जातात || त्यांचा जन्म दुर्गतीपासून किंवा निंदेपासून त्यांचे रक्षण करीत नाहीं ||२६||

न जच्चा वसलो होती, न जच्चा होति ब्राह्मणो ||
कम्मुना वसलो होति, कम्मुना होति ब्राह्मणो ति ||२७||

जन्मानें वृषल होत नाहीं, व जन्मानें ब्राह्मण होत नाहीं | कर्माने वृषल होतो, व कर्मानें ब्राह्मण होतो ||२७||

एवं वुत्ते अग्गिकभारद्वाजो ब्राह्मणो भगवन्तं एतदवोच अभिक्कन्तं भो गोतम अभिक्कन्तं भो गोतम | सेय्यथापि भो गोतम निक्कुज्जितं वा उक्कुज्जेय्य पटिच्छनं वा विवरेय्य मूळहस्स वा मग्गं आचिक्खेय्य अन्धकारे वा तेलपज्जोतं धारेय्य चक्खुमन्तो रूपानि दक्खिन्ती ति | एकमेव भोता गोतमेन अनेकपरियायेन धम्मो पकासितो || एसाहं भगवन्त गोतमं सरणं गच्छामि धम्मश्च भिक्खुसंघश्च || उपासंक मं भवं गोतमो धारेतु अज्जतग्गे पाणुपेतं सरणं गतं ति ||

असें बोलल्यावर आग्निक भारद्वाज ब्राह्मण भगवंताला म्हणाला, भो गोतम, फारच छान ! फारच छान ! जसें पालथे घातलेलें भांडे उलथें करावें, किंवा झांकलेली वस्तु उघडी करावी, अथवा वाट चुकलेल्यास मार्ग दाखवावा, किंवा डोळस लोकांना पदार्थ दिसावे म्हणून अंधारात मशाल पाजळवावी, त्याप्रमाणें आपण अनेक रीतीनें धर्म प्रकाशित केला आहे || हा मी भगवान् गोतमाला, धर्माला आणि भिक्षुसंघाला शरण जातों || आजपासून जिवंत असेपर्यंत शरण गेलेला मी उपासक आहे असें समज ||

||वसलसुत्तं निट्ठितं||