गिरिमानन्दसुत्तं 5
कतमा चानन्द आनापानसति | इधानन्द भिक्खु अरञ्ञगतो वा रुक्खमूलगतो वा सुञ्ञागारगतो वा निसीदति पल्लंकं आभुजित्वा उजुं कायं पणिधाय परिमुखं सतिं उपट्ठपेत्वा || सो सतोऽव अस्ससति सतोऽव पस्ससति | दीघं वा अस्ससन्तो दीघं अस्ससामी ति पजानाति | दीघं वा पस्ससन्तो दीघं पस्ससामी ति पजानाति | रस्सं वा अस्ससन्तोरस्सं अस्ससामी ति पजानाति | रस्सं वा पस्ससन्तो रस्सं पस्ससामी ति पजानाति | सब्बकायपटिसंवेदी अस्ससिस्सामी ति सिक्खति | सब्बकायपटिसंवेदी अस्ससिस्सामी ति सिक्खति | पस्संभयं कायसंखारं अस्ससिस्सामी ति सिक्खति | पस्संभयं कायसंखार पस्ससिस्सामी ति सिक्खति | पीतिपटिसंवेदी अस्ससिस्सामी ति सिक्खति | पीतिपटिसंवेदी पस्ससिस्सामी ति सिक्खति | सुखपटिसंवेदी अस्ससिस्सामी ति सिक्खति | सुखपटिसंवेदी पस्ससिस्सामी ति सिक्खति | चित्तसंखारपटिसंवेदी अस्ससिस्सामी ति सिक्खति | चित्तसंखारपटिसंवेदी अस्ससिस्सामी ति सिक्खति | चित्तसंखारपटिसंवेदी पस्ससिस्सामी ति सिक्खति | पस्संभयं चित्तसंखार अस्ससिस्सामी ति सिक्खति | पस्संभयं चित्तसंखार पस्ससिस्सामी ति सिक्खति चित्तपटिसंवेदी अस्ससिस्सामी ति सिक्खति चित्तपटिसंवेदी पस्ससिस्सामी ति सिक्खति | अभिप्पमोद्यं चित्तं पस्ससिस्सामी ति सिक्खति | समादहं चित्तं अस्ससिस्सामी ति सिक्खति | समादहं चित्तं पस्ससिस्सामी ति सिक्खति | विमोचयं चित्तं अस्ससिस्सामी ति सिक्खति | विमोचयं चित्तं पस्ससिस्सामी ति सिक्खति || अनिच्चानुपस्सी अस्ससिस्सामी ति सिक्खति | अनिच्चानुपस्सी पस्ससिस्सामी ति सिक्खति | विरागानुपस्सी अस्ससिस्सामी ति सिक्खति | विरागानुपस्सी पस्ससिस्सामी ति सिक्खति | निरोधानुपस्सी अस्ससिस्सामी ति सिक्खति | निरोधानुपस्सी पस्ससिस्सामी ति सिक्खति | पटिनिस्सग्गानुपस्सी अस्ससिस्सामी ति सिक्खति | पटिनिस्सग्गानुपस्सी पस्ससिस्सामी ति सिक्खति || अयं वुच्चतान्द अनापानसति ||
हे आनन्द, आनापानस्मृति कोणति ? एखादा भिक्षु अरण्यांत झडाखालीं किंवा एकान्त स्थळीं जाऊन देह सरळ ठेवून मोठ्या सावधगिरीनें बसतो || तो सावधपणें आश्वास घेतो व सावधान पणाने प्रश्वास सोडतो | दीर्घ आश्वास घेत असाला तर दीर्घ आश्वास घेत आहे असें जाणतो | दीर्घ प्रश्वास सोडीत असला तर दीर्घ प्रश्वास सोडीत आहे असें जाणतो | हृस्व आश्वास घेत असला तर हृस्व आश्वास घेत आहे असें जाणतो | हृस्व प्रश्वास सोडीत असला तर हृस्व प्रश्वास सोडीत आहे असें जाणतो | सर्व देहाची स्मृति ठेवून आश्वास करण्याचा व प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो | कायसंस्कार शांत करून आश्वास करण्याचा व प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो || प्रीतीचा अनुभव घेऊन आश्वास करण्याचा व प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो | सुखाचा अनुभव घेऊन आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो | चित्तसंस्कार जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो | चित्तसंस्कार शांत करून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो || चित्त जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो || चित्ताला प्रमुदित करून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो | चित्ताचें समाधान करून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो | चित्ताला विमुक्त करून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो || अनित्यता जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो | वैराग्य जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो | निरोध जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो | त्याग जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो || हे आनन्द, हिला आनापानस्मृति म्हणतात ||